http://www.facebook.com/chandrapur.citybus
चंद्रपूर, ता. २० : येथे शहर बससेवा सुरू केल्यास नागरिकांच्या अनेक गैरसोयी दूर होतील. यासह दर महिन्याला सुमारे पाच कोटींहून अधिक रकमेची बचत होणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था, वैद्यक संस्था तसेच प्रशासकीय अधिकाèयांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात बससेवा सुरू केल्यास पेट्रोल, आरोग्यावर होणारा खर्च, वाहतुकीची कोंडी, वाहतूक पोलिसांवर पडणारा ताण तसेच बèयाच अंशी पार्किंगची समस्या निकाली निघू शकते.
बससेवा सुरू झाल्यास दुचाकी वाहनांचा वापर आपोआप कमी होईल. शहरात सुमारे ७० हजारांहून
अधिक दुचाकी आहेत. यातील बहुतेक वापर हा महाविद्यालयीन मुले, शासकीय कर्मचारी आणि स्वयंरोजगार
करणाèया युवकांकडून होतो. बससेवा
सुरू झाल्यास किमान २० हजार दुचाकींचा वापर थांबेल. एका दुचाकीच्या माध्यमातून किमान
२० ते ३० किलोमीटर प्रवास आणि त्यास किमान ०.३ लिटर पेट्रोलचा वापर गृहीत धरल्यास दरदिवशी
चार लाख २६ हजार रुपयांच्या इंधनाची बचत होऊ शकते. महिन्याकाठी हा खर्च एक कोटी २७
लाख होतो. त्यामुळे ऑटो आणि दुचाकीच्या माध्यमातून एका महिन्यात सुमारे तीन कोटी रुपयांची
बचत होऊ शकते.
चंद्रपूर, ता. २० : येथे शहर बससेवा सुरू केल्यास नागरिकांच्या अनेक गैरसोयी दूर होतील. यासह दर महिन्याला सुमारे पाच कोटींहून अधिक रकमेची बचत होणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था, वैद्यक संस्था तसेच प्रशासकीय अधिकाèयांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात बससेवा सुरू केल्यास पेट्रोल, आरोग्यावर होणारा खर्च, वाहतुकीची कोंडी, वाहतूक पोलिसांवर पडणारा ताण तसेच बèयाच अंशी पार्किंगची समस्या निकाली निघू शकते.
सध्याची मनपा हद्द आणि आजूबाजूच्या १५ ते १८ गावांचा विचार केल्यास शहर बससेवा
नागरी सुविधेचा उत्तम मार्ग ठरू शकते, असा आशावाद आज (ता.२०) अनेकांनी
व्यक्त केला. प्रशासकीय अधिकाèयांसह सामाजिक संस्थांनीही
शहर बससेवेच्या पर्यायाचे कौतुक केले आहे. शहर बससेवा सुरू केल्यास आर्थिक बचतीचा अनेक
अधिकाèयांनी आज लेखाजोखाच मांडला.
उपप्रादेशिक परिवहन विभाग, शहरातील सेवानिवृत्त अधिकारी मंडळी, सामाजिक संस्था, आरोग्यक्षेत्रातील मंडळींनी
शहरबससेवा सुरू केल्यास होणाèया ङ्कायद्यांची आज मसकाळङ्कला
माहिती दिली. या माहितीनुसार ढोबळमानाने प्रतिमहिना पाच कोटींहून अधिक रकमेची बचत होणार
आहे. यासोबतच पार्किंग, वाहतुकीची कोंडी, प्रदूषणाच्या समस्या नियंत्रणात येऊ शकते.
इंधन बचत
शहरात सुमारे अडीच हजारांहून अधिक ऑटो नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत नसलेल्या ऑटोंची
संख्या सुमारे दीड हजार इतकी आहे. या ऑटोंच्या माध्यमातून चंद्रपूर शहर आणि लगतच्या
बारा ते पंधरा गावांत सेवा पुरविली जाते. शहर बससेवा सुरू झाल्यास सुमारे दोन हजार
ऑटोधारकांना रोजगाराचा दुसरा पर्याय स्वीकारावा लागेल. ऑटोचालकांनी दिलेल्या माहितीनुसार
दरदिवशी सरासरी प्रतिऑटोवर तीन लिटर पेट्रोलचा खर्च होता. सध्याचा पेट्रोलचा दर गृहीत
धरल्यास पेट्रोलच्या माध्यमातून दरदिवशी सुमारे चार लाख २८ हजार रुपयांची बचत होऊ शकते.
मासिक खर्च काढल्यास सुमारे एक कोटी २८ लाख रुपयांची बचत होऊ शकते.
आरोग्यावरचा खर्च
चंद्रपूर शहरातील प्रदूषणात ऑटो, दुचाकींमधून होणाèया वायुप्रदूषणाचा बराच मोठा सहभाग आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही ही बाब अनेक
अहवालांतून मान्य केली आहे. डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार
प्रदूषणामुळे होणाèया आजारांवर चंद्रपूर शहरातील
प्रत्येक नागरिकाला दरमहिना किमान ५० रुपये खर्च होतो. हा खर्च प्रत्यक्ष qकवा अप्रत्यक्ष स्वरूपात
होत असल्याने हा खर्च याहून कितीतरी अधिक असू शकतो. प्रामुख्याने श्वसननलिकेचे आजार,
ङ्कुफ्ङ्कुसाचा आजार,
हृदयरोगावर हा खर्च
होतो. त्यामुळे किमान चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणात आल्यास या खर्चाची बचत होऊ
शकते. किमान तीन लाख लोकसंख्येचा विचार करता ही रक्कम प्रतिमहिना दीड कोटी रुपये
होते.
वाहतूक पोलिस
ऑटो आणि दुचाकीची वाहतूक कमी झाल्यास वाहतूक पोलिसांवरचा ताण कमी होईल. वाहतूक
विभागातील अधिकाèयांनी दिलेल्या माहितीनुसार
ऑटो आणि दुचाकींचा वापर कमी झाल्यास किमान २० ते २५ वाहतूक पोलिसांची गरज कमी होईल.
पर्यायाने त्यावर होणारा वेतनाच्या व इतर भत्त्यांच्या खर्चात बचत होईल. वाहतूक पोलिसांची
संख्या कमी झाल्यास दर महिन्याला किमान पाच लाख रुपयांचा खर्च वाचेल.
अपघाताची संख्या
दुचाकी आणि ऑटोंची बेसुमार संख्या वाढल्याने गंभीर तसेच किरकोळ अपघात कमी होणार
आहेत. साधारणपणे सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच ते सात या काळात होणारे किरकोळ
अपघात कमी होतील. पर्यायाने जीवितहानी आणि संपत्तीची हानी कमी होऊ शकते.
कोंडी कमी होईल
दुचाकी आणि ऑटोंमुळे महत्त्वाच्या अनेक चौकांत कोंडी होते. शहर बससेवेमुळे ही कोंडी
कमी होईल. पर्यायाने नागरिकांना अनेक ठिकाणी अडकून पडावे लागणार नाही. वेळेसोबतच इंधनाची
बचत होईल.
पार्किंग
चंद्रपुरातील पार्किंगच्या बहुतेक ठिकाणी ऑटो असतात. त्यामुळे इतर वाहनांना पार्किंगला
जागा मिळत नाही. दुचाकी आणि ऑटोंची संख्या कमी झाल्यास पार्किंगची समस्या नियंत्रणात
येऊ शकते. पर्यायाने बाजार, शाळा, महाविद्यालयांसमोर होणारी गर्दी कमी होऊ शकते.
ऑटो इंधन बचत
प्रतिऑटो पेट्रोल वापर : तीन लिटर
ऑटोची कमी होणारी संख्या : दोन हजार
दरदिवशीची बचत : चार लाख २८ हजार
इंधनाच्या माध्यमातून मासिक बचत : एक कोटी २८ लाख
दुचाकी इंधन बचत
प्रती दुचाकीच्या इंधन वापर : किमान ०.३ लिटर
दुचाकीची कमी होणारी संख्या : २० हजार
दरदिवशीची इंधन बचत : चार लाख २६ हजार
महिन्याकाठी होणारी इंधन बचज : एक कोटी २७ लाख
मनुष्यबळ बचत
वाहतुक पोलिसांत होणारी घट : २० ते २५
वेतनाच्या माध्यमातून होणारी बचत (महिना) : किमान पाच लाख