देवनाथ गन्डते : सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 17, 2011 AT 03:15 AM (IST)
चंद्रपूर - मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एका कार्यक्रमानिमित्त नागपूरहून चंद्रपूरला येत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रकृती बिघडली. त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर यांना बरे वाटू लागले. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात त्यांनी थेट कार्यक्रमातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची कानउघाडणी केली.
येथील ज्येष्ठ नाट्यकलावंत शिवप्रसाद उपाख्य बाबू कक्कड यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा 14 ऑगस्टला नवोदिता संस्थेतर्फे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते रमेश देव मुंबईहून विमानाने नागपूरला आले. तिथून खासगी वाहनाने चंद्रपूरकडे निघाले. जाम ते चंद्रपूर या मार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यांना नीट प्रवास करता आला नाही. शिवाय खड्ड्यांमुळे प्रकृतीवर परिणाम झाला. चंद्रपुरात पोचल्यानंतर त्यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेचा उल्लेख करून "आपण संपूर्ण महाराष्ट्र बघता, जरा जिल्ह्याकडेही लक्ष द्या,' असे म्हणत आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कानउघाडणी केली.