सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - महाकाली ही विदर्भातील अष्टशक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या मंदिराची कोणतीही "फिक्स' संपत्ती नसलीतरी आर्थिक उलाढाल मोठी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मूर्तीवर कोणतेही दागदागिने ठेवले जात नाही. दानातून आलेली रोख रक्कम त्याच दिवशी बॅंकेत जमा केली जाते. दानधर्मातून महिन्याकाठी 80 हजार रुपये धन गोळा होते. यातील 40 हजार रुपये चॅरिटी फंडात जमा आहे. या गोंडकालिन मंदिराच्या रक्षणासाठी आठ सीसीटीव्ही कॅमेरे आणि आठ सुरक्षा कर्मचारी तैनात असतात.चंद्रपूरची आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या मंदिराची स्थापना राणी हीराईच्या काळात झाली. यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. अडीचशे वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेत नांदेड, परभणी, उस्मानाबाद, माहूर आणि आंध्र प्रदेशातील भक्त मोठ्या संख्येने येतात. सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाकाले कुटुंबाकडे आहे. दानधर्मातून मिळणाऱ्या रकमेतूनच देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. या कामावर वर्षाला 15 ते 20 लाख रुपये खर्च होतो. शिवाय चार लाख रुपये यात्रा काळात खर्च होतात. शासनाची कोणतीही मदत मिळत नाही.
मंदिराच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. एकदा एक चोर गाभाऱ्यात शिरला होता. मंदिराची वेळ संपल्याने दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे त्याला बाहेर निघता आले नाही. दुसऱ्या दिवशी द्वार उघडल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मंदिराच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. एकदा एक चोर गाभाऱ्यात शिरला होता. मंदिराची वेळ संपल्याने दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे त्याला बाहेर निघता आले नाही. दुसऱ्या दिवशी द्वार उघडल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मंदिराच्या गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीवर केवळ मंगळवारीच पहाटे अभिषेक करून दागिन्यांचा साजश्रुंगार असतो. रात्री दहाला ते उतरविण्यात येतात. सुरक्षेच्या दृष्टीने इतर दिवशी दागिने घातले जात नाहीत. यात्रेच्या वेळी 16 कॅमेरे लावण्यात येतात. सध्या आठ कॅमेरे सुरू आहेत.
-सुनील महाकाले
अध्यक्ष, महाकाली मंदिर व्यवस्थापन ट्रस्ट
-सुनील महाकाले
अध्यक्ष, महाकाली मंदिर व्यवस्थापन ट्रस्ट