काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 23, 2012

सचिन तेंदुलकर

सचिन तेंदुलकर


सचिन तेंदुलकर

 जन्म: 24 अप्रैल 1973, मुम्बईक्रिकेट के इतिहास में विश्व के सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों में गिने जाते हैं। सन् १९८९ में अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट में पदार्पण के पश्चात् वे बल्लेबाजी में कई कीर्तिमान स्थापित कर चुके हैं। उन्होंने टेस्ट व एक दिवसीय क्रिकेट, दोनों में सर्वाधिक शतक अर्जित किये हैं। वे टेस्ट क्रिकेट में सबसे ज़्यादा रन बनाने वाले बल्लेबाज़ है। इसके साथ ही टेस्ट क्रिकेट में १४००० से अधिक रन बनाने वाले वे विश्व के एकमात्र खिलाड़ी हैं। एकदिवसीय मैचों में भी उन्हें कुल सर्वाधिक रन बनाने का कीर्तिमान प्राप्त है। उन्होंने अपना पहला प्रथम श्रेणी क्रिकेट मैच मुंबई के लिये १४ वर्ष की उम्र में खेला। उनके अन्तर्राष्ट्रीय खेल जीवन की शुरुआत १९८९ में पाकिस्तान के खिलाफ कराची से हुई।
सचिन राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार से सम्मानित एकमात्र क्रिकेट खिलाड़ी हैं। वे सन् २००८ में पद्म विभूषण से भी पुरस्कृत किये जा चुके है। वे क्रिकेट जगत के सर्वाधिक प्रायोजित खिलाड़ी हैं और विश्वभर में उनके अनेक प्रशंसक हैं। उनके प्रशंसक उन्हें प्यार से लिटिल मास्टर व मास्टर ब्लास्टर कह कर बुलाते हैं। क्रिकेट के अलावा वे अपने ही नाम के एक सफल रेस्टोरेंट के मालिक भी हैं।
राजापुर के मराठा परिवार में जन्मे सचिन का नाम उनके पिता रमेश तेंडुलकर ने उनके चहेते संगीतकार सचिन देव बर्मन के नाम पर रखा था। उनके बड़े भाई अजीत तेंडुलकर ने उन्हें खेलने के लिये प्रोत्साहित किया था। सचिन के एक भाई नितिन तेंडुलकर और एक बहन सवितई तेंडुलकर भी हैं। १९९५ में सचिन तेंडुलकर का विवाह अंजलि तेंडुलकर से हुआ। सचिन के दो बच्चे हैं - सारा व अर्जुन।
सचिन ने शारदाश्रम विद्यामंदिर में अपनी शिक्षा ग्रहण की। वहीं पर उन्होंने प्रशिक्षक (कोच) रमाकांत अचरेकर के सान्निध्य में अपने क्रिकेट जीवन का आगाज किया। तेज गेंदबाज बनने के लिये उन्होंने एम०आर०एफ० पेस फाउंडेशन के अभ्यास कार्यक्रम में शिरकत की। पर वहाँ तेज गेंदबाजी के कोच डेनिस लिली ने उन्हें पूर्ण रूप से अपनी बल्लेबाजी पर ध्यान केन्द्रित करने को कहा।
सचिन तेंदुलकर उभयहस्त हैं। वे गेंदबाज़ी और बल्लेबाज़ी दायें हाथ से करते हैं किंतु लिखते बाये हाथ से हैं। वे नियमित तौर पर बायें हाथ से गेंद फेंकने का अभ्यास करते हैं। उनकी बल्लेबाज़ी उनके बेहतरीन संतुलन व नियंत्रण पर आधारित है। वे भारत की धीमी पिचों की बजाय वेस्ट इंडीज़ और ऑस्ट्रेलिया की सख्त व तेज़ पिच पर खेलना ज्यादा पसंद करते हैं [1]। वे अपनी बल्लेबाजी की अनूठी पंच शैली के लिये भी जाने जाते हैं।
ऑस्ट्रेलिया के पूर्व प्रशिक्षक जॉन ब्यूकैनन का मानना है कि तेंदुलकर अपनी पारी की शुरुआत में शार्ट गेंद के ग्रहणशील हैं। उनका मानना यह भी है कि बायें हाथ की तेज गेंद तेंदुलकर की कमज़ोरी है [2] । अपने करियर के शुरुआत में सचिन की खेल शैली आक्रमणकारी हुआ करती थी। सन् २००४ से वे कई बार चोटग्रस्त रहे हैं। इस वजह से उनकी बल्लेबाजी की आक्रामकता में थोड़ी कमी आई है। पूर्व ऑस्ट्रेलियाई खिलाड़ी ईयन चैपल का मानना है कि तेंदुलकर अब पहले जैसे खिलाड़ी नहीं रहे। किन्तु २००८ में भारत के ऑस्ट्रेलिया दौरे पर तेंदुलकर ने कई बार अपनी आक्रामक बल्लेबाज़ी का परिचय दिया।
तेंडुलकर नियमित गेंदबाज़ नहीं हैं। किन्तु वे मध्यम तेज, लेग स्पिन व ऑफ स्पिन गेंदबाज़ी में प्रखर हैं। वे कई बार लम्बी देर से टिकी हुई बल्लेबाजों की जोडी को तोड़ने के लिये गेंदबाज़ के रूप में लाए जाते हैं। भारत की जीत पक्की कराने में अनेक बार उनकी गेंदबाज़ी का प्रमुख योगदान रहा है[3]
पूरा नामसचिन तेंदुलकर
जन्म24,अप्रैल 1973
बल्लेबाज़ी का तरीक़ादाये हाथ के बल्लेबाज
गेंदबाज़ी का तरीक़ादाये हाथ का मध्यम गति और स्पिन के गेंदबाज़
टेस्ट क्रिकेटएकदिवसीय अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट
मुक़ाबले१७१442
बनाये गये रन१४०१७17,598
बल्लेबाज़ी औसत55.5645.12
100/5051/5449/94
सर्वोच्च स्कोर248*200*
फेंकी गई गेंदें3,9828,020
विकेट44154
गेंदबाज़ी औसत52.2244.26
पारी में 5विकेट02
मुक़ाबले में 10 विकेट0नहीं है
सर्वोच्च गेंदबाज़ी3/105/32
कैच/स्टम्पिंग104/-132/-

सचिनची कारकीर्द -

सचिनची कारकीर्द -


सचिनची कारकीर्द -


 नाव - सचिन रमेश तेंडुलकर

जन्म - २४ एप्रिल १९७३ (ठिकाण - मुंबई)

आताचे वय - ३७ वर्षे, १९४ दिवस

उंची - ५ फुट ५ इंच

शिक्षण - शारदाश्रम विद्यामंदिर शाळा, मुंबई

कुटूंब - आई, भाऊ - अजित, नितीन, बहिण - सविता, पत्नी - अंजली, मुलगा - अर्जुन, मुलगी - सारा



कसोटी कारकीर्द - (या मालिकेपूर्वीची कामगिरी)

धावा - १४ हजार ३६६

सामने - १७४

डाव - २८४

सरासरी - ५६.५५

सर्वाधिक धावा - नाबाद २४८

अर्धशतके - ५९

शतके - ४९

द्विशतके - ६

मिळवलेले बळी - ४४



एकदिवसीय कारकीर्द -

धावा - १७ हजार ५९८

सामने - ४४२

सरासरी - ४५.१२

सर्वाधिक धावा - नाबाद २००

अर्धशतके - ९३

शतके - ४६

मिळवलेले बळी - १५४



ट्वेंटी-२० कामगिरी -

सामने - १

धावा - १०



कर्णधारपदाची कारकिर्द -

कसोटी - १९९६ ते २०००, २५ सामने - २०५४ धावा, ७ शतके, ७ अर्धशतके, सरासरी ५१.३५.

एकदिवसीय - १९९६ ते २०००, ७३ सामने - २४५४ धावा, ६ शतके, १२ अर्धशतके, सरासरी - ३७.७५.



पुरस्कार -

- कॅस्ट्रॉल क्रिकेट ऍवॉर्ड - डिसेंबर २००६ (सुनिल गावसकर यांच्या ३४ शतकांचा विक्रम मोडीत काढल्याबद्दल गावसकर यांच्या हस्ते जोहान्सबर्ग येथे प्रदान.

- १०० वी कसोटीपूर्ण - सप्टेंबर २००२ मध्ये बीसीसीआयकडून सन्मान.

- महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०००-०१ वर्षासाठी) - महाराष्ट्र सरकारकडून सन्मान - १० किलोग्रॅम चांदीची बॅट आणि अडीच लाखाचा धनादेश - मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

- अर्जुन पुरस्कार - वर्ष १९९४ - ५० हजार रूपये आणि अर्जुन प्रतिमा प्रदान

- विस्डेन क्रिकेट ऑफ दि ईयर - १९९७ मध्ये पुरस्कार (११ वा भारतीय खेळाडू)

(विस्डेनने आपल्या २००२ मधील लेखात सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वश्रेष्ठ खेळाडूचा दर्जा दिला आहे.)

- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - १२ ऑगस्ट १९९८ - भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान.

- पद्‌मश्री पुरस्कार - वर्ष १९९९ - क्रिकेटमधील योगदानाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सोहळ्यात प्रदान.

- पद्‌मभूषण पुरस्कार - २००८ - राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

- २०१० मध्ये एलजी क्रीडा चाहत्यांचा आवडता खेळाडूचा सन्मान मिळाला

- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) २०१० मध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कारात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान.

सचिन तेंडुलकरमध्ये किती जिगर आहे, याची चुणूक १९८९ मध्येच बघायला मिळाली. पाकिस्तान दौऱ्यात या खेळाडूने वयाच्या सोळाव्या वर्षी ज्या पद्धतीने इम्रान, अक्रम, वकार यांच्या गोलंदाजीचा सामना केला, त्याला तोड नव्हती. तेव्हाच खात्री पटली होती, की हा महान खेळाडू होणार. 
चंदू बोर्डे



भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा. साल होते १९८९. भारतीय संघाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष. प्रसिद्धिमाध्यमात आणि क्रिकेट समीक्षकांमध्ये त्या वेळी खूपच चर्चा झाली. इम्रानखानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघात वसिम अक्रम, वकार युनुस, जावेद मियॉंदाद यांसारखे दिग्गज खेळाडू असल्याने, भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागणार, असे भाकीत काही मंडळींनी केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध सौहार्दाचे नव्हते. या पार्श्‍वभूमीवर भारतीय संघ पाकिस्तानला निघाला होता. या पारंपरिक संघात पुन्हा एकदा सामने सुरू होणार असल्याने सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. या दोन संघांतील सामने म्हणजे निकराची लढाईच असते. अशा परिस्थितीत एका सोळा वर्षाच्या मुलाची भारतीय संघात निवड झाली आणि त्याबद्दल निवड समितीला टीकेचा सामनाही करावा लागला होता. हा सोळा वर्षांचा मुलगा म्हणजे, सचिन तेंडुलकर. संघाचा कर्णधार होता, कृष्णम्माचारी श्रीकांत आणि मी व्यवस्थापक. या दौऱ्यात आमची खरी कसोटी लागणार होती. त्यामुळे स्वाभाविकच मानसिक दडपण होते; परंतु सचिनच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही दडपण दिसत नव्हते. एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे तो धीरोदात्त होता.



आज सचिनने साऱ्या जागतिक क्रिकेटला जिंकले असताना मला तो वीस वर्षांपूर्वीचा काळ आणि कोवळ्या वयातील हा खेळाडू अजूनही डोळ्यांसमोर येतो. साध्या साध्या गोष्टीत महान खेळाडूची महानता दिसून येते, तशी ती सचिनमध्ये सुरवातीलाच दिसली. पाकिस्तानात दाखल झाल्यावर सरावासाठी मैदानावर जाण्यासाठी आम्ही सर्व जण तयार होत असताना सचिन केव्हाच तयार होऊन बसमध्ये जाऊन बसायचा. मैदानावर जाऊन कधी एकदा सराव सुरू करतो, असे त्याला व्हायचे. त्याची देहबोली खूप काही सांगून जायची. मैदानावरही तो कधी एके ठिकाणी थांबत नसे. क्षेत्रक्षणाचा सराव करताना प्रत्येक चेंडूवर तो झेपावायचा. सर्व वरिष्ठ खेळाडू गोलंदाजी करून थकले, की हा पोरगा गोलंदाजी करायचा. विशेष म्हणजे अगदी शेवटपर्यंत न थकता तो गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करायचा. आपल्यामध्ये क्रिकेट किती भिनले आहे, किंबहुना क्रिकेट हेच आपले सर्वस्व आहे, हे त्याने लहान वयातच दाखवून दिले. संघातील सर्वांत लहान वयाचा खेळाडू असूनही त्याची प्रगल्भता वाखाणण्याजोगी होती. सराव सत्र संपल्यावर त्याला नेटमधून बाहेर काढणे अवघड जायचे. याबाबत एक प्रसंग मला चांगला आठवतो. सामना ज्या दिवशी होता, त्या वेळी आम्ही सकाळी सराव करीत होतो. सामन्याची वेळ जवळ आल्यानंतर नेट प्रॅक्‍टिस बंद करायची असते. त्यामुळे आम्ही सराव बंद करून पॅव्हेलियनमध्ये जायला लागायचो; परंतु सचिन मात्र नेटमधून काही केल्या हलायचा नाही. शेवटी ग्राऊंडसमन मला येऊन सांगायचा, "सर अभी नेट निकालना चाहिये, क्‍योंकी हमे तय्यारी करनी है.' अशा वेळी सचिन आणि त्याचा साथीदार सलील अंकोला यांना जवळजवळ ओढून बाहेर काढावे लागे.



काही दिवसांच्या सरावानंतर प्रत्यक्ष मालिकेला प्रारंभ झाला. सुरवातीला भारतीय फलंदाजी म्हणावी तशी बहरत नव्हती, त्यामुळे सियालकोटच्या सामन्यासाठी आम्ही सचिनला खेळवायचे ठरविले. या सामन्यासाठी पाकिस्तानने त्यांना अनुकूल ठरणारी खेळपट्टी तयार केली होती. "ग्रीन टॉप' खेळपट्टीवर त्यांच्या वेगवान माऱ्याचा सामना करण्याचे आमच्यापुढे आव्हान होते. या कसोटीसाठी इंग्लंडचे शेफर्ड आणि हॅम्पशायर हे पंच होते. त्यांनी विचारले, की खेळपट्टी कुठे आहे? त्यावर ग्राऊंडसमनने "ही काय खेळपट्टी' असे म्हणून ती दाखवली. सांगायचे तात्पर्य, की आजूबाजूचे मैदान आणि खेळपट्टी यामध्ये काहीच फरक नव्हता. अशा खेळपट्टीवर सचिन प्रथमच खेळणार होता. सामना सुरू झाला आणि जे व्हायचे तेच झाले. पहिले चार फलंदाज झटपट बाद झाले. अतिशय बिकट परिस्थितीत सचिन मैदानावर उतरला, तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंचा चेहरा "आला आपला बकरा आला,' असाच काहीसा बोलका होता. कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच षटकात त्याला वकारच्या माऱ्याला तोंड द्यावे लागत होते. पहिलाच चेंडू उसळी घेऊन आला. तो सचिनच्या तोंडावर आदळला. हेल्मेट असतानाही त्याला मार लागला. त्याच्या दातातून रक्त येऊ लागले. मी आणि फिजिओ मैदानावर धावत गेलो. आम्ही त्याला म्हणालो, "ड्रेसिंग रूममध्ये चल,' पण सचिन भयानकच खंबीर आणि जिगरबाज. मी खेळणारच, असे त्याने ठामपणे सांगितले. दातातून रक्त येत असतानाही तो खेळण्यासाठी सज्ज झाला आणि आश्‍चर्य म्हणजे पुढील तीन चेंडू त्याने लीलया सीमापार केले. एवढेच नाही, तर त्याने अर्धशतक झळकावले आणि "वंडर बॉय' म्हणजे काय असते, ते त्याने दाखवून दिले. तेथपासून सर्वत्रच त्याचे कौतुक सुरू झाले.



सचिनची जिद्द, खेळण्याची तळमळ, धावा करण्याची भूक न संपणारीच. कठोर परिश्रम आणि तंत्रशुद्ध फलंदाजी ही त्याची खासीयत. शंभर टक्के तंदुरुस्त राहण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. आपल्यावर होणाऱ्या टीकेकडे तो लक्ष देत नाही. त्याला उत्तर देतो, ते बॅटनेच. पंचांनी चुकीचा निर्णय दिला, तरी त्याबद्दल तो नाराजी व्यक्त करीत नाही. पुढील सामन्यात खणखणीत खेळाने तो त्याला उत्तर देतो. वरिष्ठ खेळाडूंबद्दल त्याच्या मनात कमालीचा आदर. त्यांचे सल्ले तो शिरसावंद्य मानतो. चुकीच्या पद्धतीने खेळून बाद झाल्यानंतर ती चूक पुढील सामन्यात होणार नाही, याची तो सतत काळजी घेतो, त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. याची प्रचिती इंग्लंड दौऱ्यात आली. २००७ मध्ये मी पुन्हा भारतीय संघाचा व्यवस्थापक झालो, तेव्हाचा हा दौरा. स्कॉटलंड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होता. या सामन्यात जॅक कॅलिसने सचिनला त्रिफळाबाद केले. तेव्हा पॅव्हेलियनमध्ये तो थोडासा निराश होऊन बसला होता. काही वेळाने मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो, ""मिडल स्टंपवर चेंडू पडल्यावर तो मिडविकेटच्या दिशेने खेळायचा नाही; सरळ गोलंदाजाच्या दिशेने मारायचा.'' दुसरे दिवशी आम्ही दोघे नेटमध्ये गेलो आणि थोड्या अंतरावरून मी त्याला चेंडू टाकत राहिलो. तेव्हा सचिनने मिडल स्टंपवरील सर्व चेंडू गोलंदाजाच्या दिशेने मारण्याचा सराव केला. पुढील सामन्यात त्याने त्याच पद्धतीने फलंदाजी करून दौऱ्यात सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केली.

सचिनची ही वाटचाल अशीच चालू आहे; किंबहुना वय वाढत असतानाही त्याची फलंदाजी अधिकाधिक बहरत आहे. ३७व्या वर्षीही तो तीच जिद्द दाखवत आहे. विक्रमांमागून विक्रम करणे, ही त्याची जणू काही सवयच होऊन बसली आहे. त्याच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीपैकी जवळजवळ अठरा वर्षांच्या कारकिर्दीचा मी जवळचा साक्षीदार आहे. व्यवस्थापक, निवड समिती अध्यक्ष अशा विविध भूमिकांतून मी त्याला पहिलेय. त्याने असेच खेळत राहावे आणि भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर न्यावे, ही सदिच्छा.
शहर बससेवेमुळे ६० कोटींची बचत

शहर बससेवेमुळे ६० कोटींची बचत

http://www.facebook.com/chandrapur.citybus

चंद्रपूर, ता. २० : येथे शहर बससेवा सुरू केल्यास नागरिकांच्या अनेक गैरसोयी दूर होतील. यासह दर महिन्याला सुमारे पाच कोटींहून अधिक रकमेची बचत होणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था, वैद्यक संस्था तसेच प्रशासकीय अधिकाèयांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात बससेवा सुरू केल्यास पेट्रोल, आरोग्यावर होणारा खर्च, वाहतुकीची कोंडी, वाहतूक पोलिसांवर पडणारा ताण तसेच बèयाच अंशी पार्किंगची समस्या निकाली निघू शकते.
सध्याची मनपा हद्द आणि आजूबाजूच्या १५ ते १८ गावांचा विचार केल्यास शहर बससेवा नागरी सुविधेचा उत्तम मार्ग ठरू शकते, असा आशावाद आज (ता.२०) अनेकांनी व्यक्त केला. प्रशासकीय अधिकाèयांसह सामाजिक संस्थांनीही शहर बससेवेच्या पर्यायाचे कौतुक केले आहे. शहर बससेवा सुरू केल्यास आर्थिक बचतीचा अनेक अधिकाèयांनी आज लेखाजोखाच मांडला. उपप्रादेशिक परिवहन विभाग, शहरातील सेवानिवृत्त अधिकारी मंडळी, सामाजिक संस्था, आरोग्यक्षेत्रातील मंडळींनी शहरबससेवा सुरू केल्यास होणाèया ङ्कायद्यांची आज मसकाळङ्कला माहिती दिली. या माहितीनुसार ढोबळमानाने प्रतिमहिना पाच कोटींहून अधिक रकमेची बचत होणार आहे. यासोबतच पार्किंग, वाहतुकीची कोंडी, प्रदूषणाच्या समस्या नियंत्रणात येऊ शकते.

इंधन बचत                                                                        
शहरात सुमारे अडीच हजारांहून अधिक ऑटो नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत नसलेल्या ऑटोंची संख्या सुमारे दीड हजार इतकी आहे. या ऑटोंच्या माध्यमातून चंद्रपूर शहर आणि लगतच्या बारा ते पंधरा गावांत सेवा पुरविली जाते. शहर बससेवा सुरू झाल्यास सुमारे दोन हजार ऑटोधारकांना रोजगाराचा दुसरा पर्याय स्वीकारावा लागेल. ऑटोचालकांनी दिलेल्या माहितीनुसार दरदिवशी सरासरी प्रतिऑटोवर तीन लिटर पेट्रोलचा खर्च होता. सध्याचा पेट्रोलचा दर गृहीत धरल्यास पेट्रोलच्या माध्यमातून दरदिवशी सुमारे चार लाख २८ हजार रुपयांची बचत होऊ शकते. मासिक खर्च काढल्यास सुमारे एक कोटी २८ लाख रुपयांची बचत होऊ शकते.
 बससेवा सुरू झाल्यास दुचाकी वाहनांचा वापर आपोआप कमी होईल. शहरात सुमारे ७० हजारांहून अधिक दुचाकी आहेत. यातील बहुतेक वापर हा महाविद्यालयीन मुले, शासकीय कर्मचारी आणि स्वयंरोजगार करणाèया युवकांकडून होतो. बससेवा सुरू झाल्यास किमान २० हजार दुचाकींचा वापर थांबेल. एका दुचाकीच्या माध्यमातून किमान २० ते ३० किलोमीटर प्रवास आणि त्यास किमान ०.३ लिटर पेट्रोलचा वापर गृहीत धरल्यास दरदिवशी चार लाख २६ हजार रुपयांच्या इंधनाची बचत होऊ शकते. महिन्याकाठी हा खर्च एक कोटी २७ लाख होतो. त्यामुळे ऑटो आणि दुचाकीच्या माध्यमातून एका महिन्यात सुमारे तीन कोटी रुपयांची बचत होऊ शकते.

आरोग्यावरचा खर्च                                                                    
चंद्रपूर शहरातील प्रदूषणात ऑटो, दुचाकींमधून होणाèया वायुप्रदूषणाचा बराच मोठा सहभाग आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही ही बाब अनेक अहवालांतून मान्य केली आहे. डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदूषणामुळे होणाèया आजारांवर चंद्रपूर शहरातील प्रत्येक नागरिकाला दरमहिना किमान ५० रुपये खर्च होतो. हा खर्च प्रत्यक्ष qकवा अप्रत्यक्ष स्वरूपात होत असल्याने हा खर्च याहून कितीतरी अधिक असू शकतो. प्रामुख्याने श्वसननलिकेचे आजार, ङ्कुफ्ङ्कुसाचा आजार, हृदयरोगावर हा खर्च होतो. त्यामुळे किमान चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणात आल्यास या खर्चाची बचत होऊ शकते. किमान तीन लाख लोकसंख्येचा विचार करता ही रक्कम प्रतिमहिना दीड कोटी रुपये होते.

वाहतूक पोलिस                                                   
ऑटो आणि दुचाकीची वाहतूक कमी झाल्यास वाहतूक पोलिसांवरचा ताण कमी होईल. वाहतूक विभागातील अधिकाèयांनी दिलेल्या माहितीनुसार ऑटो आणि दुचाकींचा वापर कमी झाल्यास किमान २० ते २५ वाहतूक पोलिसांची गरज कमी होईल. पर्यायाने त्यावर होणारा वेतनाच्या व इतर भत्त्यांच्या खर्चात बचत होईल. वाहतूक पोलिसांची संख्या कमी झाल्यास दर महिन्याला किमान पाच लाख रुपयांचा खर्च वाचेल.


अपघाताची संख्या                                                     
दुचाकी आणि ऑटोंची बेसुमार संख्या वाढल्याने गंभीर तसेच किरकोळ अपघात कमी होणार आहेत. साधारणपणे सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच ते सात या काळात होणारे किरकोळ अपघात कमी होतील. पर्यायाने जीवितहानी आणि संपत्तीची हानी कमी होऊ शकते.

कोंडी कमी होईल                                                      
दुचाकी आणि ऑटोंमुळे महत्त्वाच्या अनेक चौकांत कोंडी होते. शहर बससेवेमुळे ही कोंडी कमी होईल. पर्यायाने नागरिकांना अनेक ठिकाणी अडकून पडावे लागणार नाही. वेळेसोबतच इंधनाची बचत होईल.

पार्किंग                                                              
चंद्रपुरातील पार्किंगच्या बहुतेक ठिकाणी ऑटो असतात. त्यामुळे इतर वाहनांना पार्किंगला जागा मिळत नाही. दुचाकी आणि ऑटोंची संख्या कमी झाल्यास पार्किंगची समस्या नियंत्रणात येऊ शकते. पर्यायाने बाजार, शाळा, महाविद्यालयांसमोर होणारी गर्दी कमी होऊ शकते.

ऑटो इंधन बचत                                                  
प्रतिऑटो पेट्रोल वापर : तीन लिटर
ऑटोची कमी होणारी संख्या : दोन हजार
दरदिवशीची बचत : चार लाख २८ हजार
इंधनाच्या माध्यमातून मासिक बचत : एक कोटी २८ लाख

दुचाकी इंधन बचत                                                
प्रती दुचाकीच्या इंधन वापर : किमान ०.३ लिटर
दुचाकीची कमी होणारी संख्या : २० हजार
दरदिवशीची इंधन बचत : चार लाख २६ हजार
महिन्याकाठी होणारी इंधन बचज : एक कोटी २७ लाख

मनुष्यबळ बचत                                                    
वाहतुक पोलिसांत होणारी घट : २० ते २५
वेतनाच्या माध्यमातून होणारी बचत (महिना) : किमान पाच लाख

Thursday, December 20, 2012

http://www.facebook.com/chandrapur.citybus

http://www.facebook.com/chandrapur.citybus



शहरामधला प्रवास म्हणजे एक अग्निदिव्यच! या प्रवासात नागरिकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. परंतु, याला काही पर्याय नसल्याने हा संघर्षमय प्रवास टाळता येत नाही. परंतु, या त्रासातून नागरिकांना सुटका करून घ्यायची असेल, तर सार्वजनिक वाहतूकव्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. ती शहर बससेवेच्या माध्यमातून सोडविणे शक्य आहे.
गेल्या काही वर्षांत शहर झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नागरिकांचे प्रश्नही वाढताहेत. शहरामधल्या वाहतूकव्यवस्थेचा प्रश्नही वाढत्या शहरीकरणाचा परिणाम आहे. ही वाहतूकव्यवस्था सुधारावी, यासाठी अनेक प्रयत्न झालेत. मात्र, या प्रश्नावर समाधानकारक पर्याय महानगरपालिकेने शोधलेला नाही.
दररोज सकाळी जिवाचा आटापिटा करीत घराबाहेर पडणाèया शहरातील नागरिकांसाठी प्रवास म्हणजे तारेवरची कसरत असते. शहरातील नागरिकांना प्रवासासाठी सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. हा प्रवास अत्यंत खर्चिक आणि त्रासदायक झालेला आहे. कारण वाहनांची संख्या वाढत चालल्याने शहरांमधील वाहतुकीची आणि प्रदूषणाची समस्या बिकट झालीय. या प्रवासासाठी पैसे तर जातातच, शिवाय मानसिक आणि शारीरिक त्रासाचा संघर्षमय प्रवास करावा लागतो.
या संघर्षमय प्रवासातून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी शहर बससेवा हा पर्याय होऊ शकतो.
सर्वांत महत्त्वाची नागरी सुविधा अपेक्षित आहे. ती वेगवान, सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीची. वाहनांची संख्या जितकी मर्यादित राहील, तितकी वाहतुकीची गती अधिक आणि तितके शहर प्रदूषणमुक्त, हे साधे तत्त्व आहे. गाड्यांची संख्या मर्यादित राहण्यासाठी सार्वजनिक वाहतूकव्यवस्थाच उपयोगी ठरते. या यंत्रणेकडे आतापर्यंतच्या सत्ताधाèयांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने खासगी वाहनांची संख्या भरमसाठ वाढली. 
शास्त्रीय निकषांनुसार दर एक लाख लोकसंख्येमागे पंचावन्न बसगाड्या धावल्या पाहिजेत. याचाच अर्थ चंद्रपूर शहरातील साडेतीन लाख लोकसंख्येनुसार दीडशेहून अधिक बसङ्केèयांची गरज आहे.
इंधनाची बचत करण्यासाठी आणि वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. शहरातील रस्ते, वेगाने वाहने दामटण्याची प्रवृत्ती चालकांत वाढीस लागल्याचे आढळते. महामार्गांवर मओव्हरटेकङ्क करण्याची तर स्पर्धाच लागलेली असते. बेदरकार आणि वेगमर्यादा झुगारून वाहने चालविल्यामुळे काही वर्षांत रस्त्यांवरील अपघातांत प्रचंड वाढ झाली आहे.

ङ्कायदा कोणाला?
कार्यालयांत जाणारे कर्मचारी
महाविद्यालयाचे विद्यार्थी
बाहेरून येणारे पर्यटक
शहराबाहेर जाणाèयांना
जवळच्या खेड्यांना

ङ्कायदा कसा?
इंधन वाचेल, पैशांची बचत होईल
शरीराला आराम
देखभाल, पार्किंगची qचता नाही.
प्रदूषणाला आळा बसतो
वेळेची बचत होते
मार्गावरील अपघातांना लगाम
प्रवासातील सुरक्षिततेत वाढ
ऑटोरिक्षांना लगाम

--------------------
अडचणी व उपाय
चंद्रपूर शहरातील वाहतुकीची सर्वांत मोठी अडचण म्हणजे जटपुरा गेट. अनेकांनी अनेक उपाय सुचविलेत. मात्र, तोडगा निघालेला नाही. गेटमध्ये होणाèया कोंडीला मोठ्या वाहनांसह दुचाकीदेखील कारणीभूत आहेत. चारचाकी वाहनांच्या रांगेत दुचाकी आल्यास वाहन बाहेर काढताना गैरसोय होते. शिवाय जागाही व्यापते. ऑटोरिक्षा आणि दुचाकींची संख्या कमी झाल्यास बसगाड्या सहज धावू शकतील.
दुसरी अडचण म्हणजे पार्किंग. शहरातील दोन्ही मार्ग अरुंद आहेत. त्यामुळे बसगाड्यांना थांबे देताना गैरसोय होईल, असा युक्तिवाद आहे. मात्र, बससेवेमुळे दुचाकी आणि ऑटोंची संख्या कमी होऊन पार्किंगची समस्या सुटेल.
-----------------------
बससेवा कुठे असावी?

शहर बससेवेचे टप्पे आणि थांबे
पठाणपुरा गेट ते बसस्थानक
(गांधी चौक, जयंत टॉकीज, जटपुरा गेट, जिल्हा परिषद)

जुनोना चौक ते बसस्थानक
(जुनोना चौक, बायपास, बंगाली कॅम्प, वन कार्यालय)

बसस्थानक ते घुग्घुस
(प्रियदर्शिनी चौक, प्रेस क्लब चौक, जनता कॉलेज, हॉटेल कुंदन प्लाझा, पडोली, नागाळा, एमआयडीसी चौक)

बसस्थानक ते ऊर्जानगर
(तुकूम, शिवाजी चौक, विधी महाविद्यालय, खत्री कॉलेज, कोंडानाला, दुर्गापूर, शक्तिनगर)

ऊर्जानगर ते बल्लारपूर
(शक्तिनगर, दुर्गापूर, तुकूम, बसस्थानक, जटपुरा गेट, गिरनार चौक, अंचलेश्वर गेट, महाकाली मंदिर, बागला चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय, विसापूर ङ्काटा)

लोहारा ते पडोली
(एमईएल, कृष्णनगर, इंदिरानगर, बंगाली कॅम्प, बसस्थानक, जुना वरोरा नाका, पडोली)
------------------
नवीन बससेवा सुरू करण्याची कार्यपद्धती
नागरिकांसाठी कार्यक्षम प्रवासी वाहतूक सेवा निर्माण करण्याचा मुख्य उद्देश केंद्रीभूत ठेवूनच एसटी महामंडळ कामकाजाची दिशा निश्चित करीत असते. परिणामी रस्ते प्रवासी वाहतुकीसंदर्भात समाजातील विविध घटकांची मागणी, त्यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने, त्याचप्रमाणे महामंडळाकडे उपलब्ध असलेली माहिती इत्यादीचे शास्त्रीय पद्धतीने संकलन करण्यात येऊन राज्यातील विविध मार्गांवर नवीन बससेवा सुरू करणे qकवा कार्यरत असलेल्या सेवा स्थगित करणे, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतात. सर्वसाधारणपणे नवीन बससेवा सुरू करण्याबाबत महामंडळाकडे मागणी आल्यास मार्गावर उपलब्ध असलेल्या बससेवा, त्यांना मिळणारा प्रवासी प्रतिसाद, त्या मार्गांवर उपलब्ध असलेली प्रवासी क्षमता, व्यापारी/ औद्योगिक केंद्रे, शैक्षणिक संस्था इत्यादी घटक विचारात घेऊन नवीन बस सुरू करण्याची आवश्यकता पडताळली जाते आणि तद्नंतर नवीन बस सुरू करण्याच्या मागणीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येतो.
नवीन बसगाड्यांची मागणी नागरिकांनी माहे डिसेंबरपूर्वी करणे आवश्यक आहे. तथापि, नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता दरम्यानच्या कालावधीत प्राप्त झालेल्या निवेदनाची दखल महामंडळाकडून तत्काळ घेण्यात येते.
--------------------
शहरातील वाहनांची संख्या
(आकडेवारी मार्च २०११)

मोटारसायकल- ५९ हजार ४७२
स्कूटर- १४ हजार ५६८
मोपेड- १७ हजार ८७९
एकूण- ९१ हजार ९१९
------------------
कार- सहा हजार ४६८
जीप- दोन हजार ३७४
स्टेज व्हॅन- २७
एकूण- आठ हजार ८६९
-----------------
टॅक्सी- ३८२
ऑटो- ४ हजार
-------------
स्टेज कॅरिगेज- ३५८
मालवाहू कॅरिगेज-६२
स्कूल बस- ७९
खासगी वाहन- ३९
एकूण- ५३८
------------------
गुड्स गॅरेज
ट्रक- चार हजार ५३
टँकर- ८४
चारचाकी मालवाहू- एक हजार ३१८
तीन चाकी मालवाहू- ७६९
एकूण-सहा हजार २२४
---------
ट्रॅक्टर- एक हजार ५३७
ट्रेलर- एक हजार ९६४
रुग्णवाहिका- १३८
इतर- १९३
एकूण- ३३१
---------------
शहरातील एकूण वाहने- एक लाख १५ हजार ९१

Wednesday, December 19, 2012

वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारकडून हिरवी झेंडी

वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारकडून हिरवी झेंडी


 चंद्रपूर, : तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीला राज्य शासनाने अखेर हिरवी झेंडी दिली आहे. २८ सप्टेंबर रोजी या स्वरूपाचा अधिकृत प्रस्ताव अखिल भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. विधानसभेत आरोग्यमंत्री विजय गावित यांनी यासंबंधित अधिकृत माहिती दिल्याने सर्वसामान्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर हा जिल्हा आदिवासी क्षेत्रात मोडतो. येथे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या रुग्णालयात जिल्ह्यासह गडचिरोली, आंध्रप्रदेशातील काही गावांतील रुग्णांवर इलाज केला जातो. अलीकडच्या काळात जिल्ह्याचे झपाट्याने औद्योगिकीकरण झाले. त्यामुळे प्रदूषणात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यात कर्करोग, ङ्कुफ्ङ्कुसाचे आजार, अस्थिरोगाचे प्रमाण अधिक आहे. जिल्हा आदिवासीबहुल असल्याने येथे सिकलसेलचे प्रमाण अधिक आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली जात होती. तथापि, राज्य शासनावर राजकीय दबाव टाकण्यात येथील मंडळी कमी पडल्याने मागणी पूर्ण होण्यात अडथळे येत गेले. मात्र, यावर्षीच्या प्रारंभीपासून राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आयएमए ही मागणी सातत्याने रेटण्यात आली. त्यामुळे अखेर राज्य शासनाने या मागणीला अनुकूलता दर्शविली आहे. या आशयाची माहिती आज(ता. १८) विधानसभेच्या एका प्रश्नाच्या उत्तरात आरोग्यमंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. या मागणीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर समाज निरोगी ठेवून चालणार नाही, केवळ वैद्यकीयच नव्हे तर इतर अनेक व्यवसायांचा हाच पायाभूत सिद्धांत झाला आहे. वास्तविक वैद्यकीय, शिक्षकी अशा क्षेत्रांकडे सेवाभावी वृत्तीचा पेशा म्हणून बघितल्या जाते. पैसा कमाविण्याला या व्यवसायात दुय्यम स्थान दिले जाते. परंतु ज्या काळात हे व्यवसाय सेवाभावी वृत्तीचे होते, ज्या काळात पैशापेक्षा सेवा महत्वाची मानली जायची तो काळ केव्हाच इतिहासजमा झालेला आहे. बाजारु व्यावसायिक वृत्तीने या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. सरकारी मेडिकल कॉलेजऐवजी खाजगी मेडिकल कॉलेजेस राजकारण्यांनी सुरु केल्यामुळे सर्व गणितच बिघडले आहे. व्यवसायाचा qकवा पेशाचा धंदा झाला की नीतिमत्तेची सगळी गणिते कोलमडून पडतात. या वैद्यकीय महाविद्याजयामुळे गरिबांना ङ्कायदा होईल.
-------------
जिल्ह्यातील एका सर्वेक्षणात हत्तीरोगाचे २५ हजार रुग्ण आढळले. चंद्रपूर जिल्ह्यात या आजारावर नियंत्रणासाठी उपाययोजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र त्या उपयोजनेसाठी असलेल्या पथक पदांपैकी ११५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपाययोजना पथके पंगू झाली आहे. या आजारावर योग्य ते उपाय योजणारी प्रभावी यंत्रणा नाही.
----------
२०११ ते ऑक्टोबर २०१२पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार ३४४ एचआयव्ही बाधित रुग्ण असल्याची माहिती समोर आली. मागील पाच वर्षात ८११ जणांचा एड्सने मृत्यूही झाला. संपूर्ण जिल्ह्यात चंद्रपूर शहर, qसदेवाही व बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक एचआयव्ही बाधीत रुग्ण आहेत. जिल्ह्यात २००७ पासून एचआयव्ही बाधितांवर औषधोपचार मोहीम सुरू आहे. बल्लारपुरात, बिल्टतङ्र्के एआरटी केंद्र स्थापन करण्यात आले. जिल्ह्यतील एचआयव्ही बाधीतांची संख्या लक्षात घेत २००८ ला जिल्हा सामान्य रुग्णालयातच एआरटी केंद्र सुरू करण्यात आले. चार हजार ७७१ एचआयव्ही बाधीत रुग्णांवर सध्या औषधोपचार सुरू आहेत.
--------------
जिल्हा सामान्य रुग्णालय
खाटांची संख्या-३००
चंद्रपुर
प्राथमिक आरोग्य केंद्रे....५८
ग्रामीण रुग्णालय........१३
जिल्हा रुग्णालय.....१
स्त्री रुग्णालय.....१ नियोजित
वैद्यकीय महाविद्यालये- नियोजित
इलेक्ट्रोङ्कोरेसीस चाचणी केंद्र...४

वैद्यकीय महाविद्यालय का?
प्रदूषण : मागील दशकभरात चंद्रपुरात अनेक मोठे उद्योग आलेत. विशेषकरून कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, कच्चे लोखंड, मॅगनीज, वीजनिर्मिती करणारे उद्योग येथे आलेत. त्यामुळे प्रदूषणात झपाट्याने वाढ झाली. सर्वाधिक प्रदूषित शहरात चंद्रपूरचा देशात चौथा क्रमांक आहे. प्रदूषणामुळे येथे आजारांचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारांवर उपचार करणारी यंत्रणा नाही. मोठा आजार असल्यास येथील रुग्णांना नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता होती.

आदिवासीबहुल क्षेत्र
येथील नागरिकांचा उत्पन्नगट कमी आहे. त्यामुळे मोठ्या शहरात जाऊन औषधोपचार करणे परवडत नाही. जिल्ह्यातील सध्याची शासकीय आरोग्यव्यवस्था मोठ्या आजारांवर उपचार करण्यास पुरेशी नाही. आदिवासीबहुल क्षेत्र असल्याने या भागात कुपोषण, सिकलसेलचे प्रमाण अधिक आहे. गडचिरोली जिल्ह्यात हे प्रमाण चंद्रपूरपेक्षा अधिक आहे. हत्तीरोग, श्वसन आजाराचेही प्रमाण अधिक आहे.

कामगारांचे प्रमाण अधिक
मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने येथे कामगारांची संख्या अधिक आहे. येथे आंध्रप्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात कामगार येत आहेत. बहुतेक कामगारा दैनिक मजुरीच्या स्वरूपात काम करतात. कोळसा खाण, सिमेंट उद्योग, एमआयडीसीमधील उद्योग येथे हे कामगार काम करीत आहेत. या कामगारांत आजारांचे प्रमाण अधिक आहे. एचआयव्ही, कर्करोग यासारखे दुर्धर आजाराचे रुग्णही अधिक आहेत. या गटाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना मोठ्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसते. या वर्गासाठी वैद्यकीय महाविद्यालय ङ्कायद्याचे ठरणार आहे.

अपघात
औद्योगिकीकरणामुळे एकीकडे प्रदूषण वाढले, तर दुसरीकडे वाहतुकीचा पसारा वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले. अपघातग्रस्तांवर चांगल्या दर्जाचे उपचार करणारी यंत्रणा स्थानिकस्तरावर उपलब्ध नाही. औद्योगिक अपघाताचेही प्रमाण अधिक आहे. अनेकदा नागपूरला हलविताना रुग्णांचा मृत्यू होता. वैद्यकीय महाविद्यालयामुळे तातडीने आणि चांगल्या दर्जाचे उपचार होण्याची सोय होणार आहे.

Sunday, December 16, 2012

प्रत्येक तालुक्यात क्रिंडा संकुल उभारणार

प्रत्येक तालुक्यात क्रिंडा संकुल उभारणार


 क्रिडामंत्री पद्माकर वळवी
    चंद्रपूर दि.16- जिल्हयातील युवकांच्या क्रिडा गुणांना वाव देण्याचे शासनाचे धोरण असल्याने प्रत्येक तालुक्यात सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेले क्रिडा संकुल उभारण्याचा शासनाचा निर्णय असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.पद्माकर वळवी यांनी चंद्रपूर जिल्हयातील कोरपना येथे बहुउद्येशिय क्रीडा संकुलाच्या भुमिपूजन प्रसंगी व्यक्त केले. 
     यावेळी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, जैनुद्दीन जव्हेरी, क्रिडा व युवक सेवा नागपूरचे उपसंचालक जयप्रकाश दुबळे, राजू-याचे उपविभागीय अधिकारी  एम.ए.राऊत, कोरपना येथील तहसिलदार कुमरे,जिल्हा क्रिडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, सुभाष गौर, विनायक बांगडे, आबेद अली, मनोहर पाऊनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 जिल्हयात क्रिडा संकुलामध्ये विविध प्रकारच्या सोयी व सुविधा निर्माण करण्यासाठी आलेल्या अनुदानाचा उपयोग कामाचे प्राधान्य ठरवून  खर्च करण्याची जबाबदारी जिल्हा मंडळाची असल्याचे प्रतिपादन क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.पद्माकर वळवी यांनी चंद्रपूर येथील जिल्हा क्रिडा स्टेडीयम येथे आयोजित परिसंवादाला संबोधित करतांना व्यक्त केले.  यावेळी माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूकर, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रिडा अधिकारी घनश्याम राठोड, सुभाष गौर, विनोद अहीरकर व इतरही मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी क्रिडा मंत्री म्हणाले की, प्रत्येक जिल्हयात वेगवेगळया खेळाचे चार प्रशिक्षक (कोच) शासनातर्फे नियुक्त करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्हयातील प्रशिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले असून त्यांना तालुक्यामध्ये सुध्दा जावून युवकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.  त्याचप्रमाणे जिल्हयातील युवक खेळामध्ये कसे जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी सुध्दा शासन स्तरावर धोरण ठरविण्याचे काम सुरु आहे असेही ते म्हणाले. 
     या परिसंवादामध्ये महेश डोंगरे क्रीडा संघटक, श्री.बलकी, राजेश नायडू यांनी सहभाग घेवून आपले मनोगत व्यक्त केले. या परिसंवादाचे संचालन हरिभाऊ पाटोळे यांनी केले असून परिसंवादास मोठया संख्येने खेळ प्रेमी व खेळाडू उपस्थित होते.
धानाचा भाव सरकारने नाही, तर शेतकर्‍यांनी ठरवावा

धानाचा भाव सरकारने नाही, तर शेतकर्‍यांनी ठरवावा


सावली, शेतात मेहनत आम्ही करायची, राबराब राबून पिकाचे उत्पन्न आम्ही घ्यायचे आणि त्या कृषीमालाला भाव सरकारने द्यायचा हा कुठला न्याय आहे. शेतकर्‍यांनो, जागे होऊन एक दिवस रस्त्यावर या म्हणजे भाव तुमच्याच मनासारखा मिळेल, असे आवाहन प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी सावली येथील विदर्भस्तरीय धान परिषदेत केले.

प्रहार संघटनेच्या वतीने सावली येथील खादी ग्रामोद्योगच्या भव्य पटांगणावर विदर्भस्तरीय धान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी बच्चू कडू होते. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजगडचे उपसरपंच चंदू पाटील मारकवार, श्रमिक एल्गारच्या संस्थापिका पारोमिता गोस्वामी होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ धान उत्पादक संघाचे अध्यक्ष अरविंद चिंतावार, भास्कर पाटील गड्डमवार, संतोष तंगडपल्लीवार, गोपाल रायपुरे, समय्या पसुला, बंडू भडके, मुर्लीधर स्वामी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, जिल्हा संघटक फिरोजखान पठाण, महेंद्र दुपारे, वेलादी आदी उपस्थित होते. राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला सूतमाला अर्पण करून या धान परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
देवाजी तोफा म्हणाले, आपल्या गावामध्ये आपलेच सरकार हवे यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. पीक आम्ही काढतो अन् भाव ठरविणारे ते कोण, असा प्रश्‍न करीत धानाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, असे त्यांनी म्हटले. प्रमुख मार्गदर्शक चंदू पाटील मारकवार म्हणाले की, शेतीचे चित्र बदलले पाहिजे. आजही या क्षेत्रामध्ये सिंचनाची पुरेशी सोय नाही. फक्त लालीपॉप दाखविण्यामध्ये सरकार पुढे असून, धानाची शेती ही भाव न मिळत असल्याने माती झाली आहे. शेतकरी काही दिवसांनी आत्महत्या करेल, मात्र आत्महत्या करण्यापेक्षा रस्त्यावर एकत्रित येऊन लढलो तर योग्य भाव देण्यासाठी भाग पाडू. उस व कापूस उत्पादक शेतकरी हा संघटित आहे.
पारोमिता गोस्वामी यांनी, ग्रामसभेला महत्त्व देणार्‍या शासनाने दारूबंदीचा ठराव घेऊनही जिल्हा दारूमुक्त का करीत नाही, असा प्रश्‍न करीत धान उत्पादक महिला ही पुरुषांच्या बरोबरीने असतानाही त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे महिलांना पेन्शन सुरू करावे, अशी मागणी त्यांनी परिषदेत केली.
विदर्भात आत्महत्या करीत असलेला शेतकरी याचा शासनाकडून खून होत असल्याचा गंभीर आरोप आमदार कडू यांनी केला. ते पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांना योग्य भावासाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करून त्यातील तरतुदी पूर्ण कराव्या, धानाची पेरणी ते काढणीपर्यंतची पूर्ण कामे एमआरईजीएमच्या माध्यमातून करावी व ज्याप्रमाणे कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येतो, त्याच धर्तीवर शेतकर्‍यांना बोनस देण्यात यावा, अशी भूमिका व्यक्त करीत धानाला एकरी १२ ते १६ हजार रुपये खर्च येतो, मात्र उत्पन्नानुसार भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने नियमानुसार प्रतिक्विंटल ३ हजार ५१७ रुपये भाव द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
जिप शाळांना ग्रंथालये पुस्तके खरेदीसाठी निधी मिळणार

जिप शाळांना ग्रंथालये पुस्तके खरेदीसाठी निधी मिळणार


चंद्रपूर, गटसाधन केंद्र, पंचायत समिती सिंदेवाही मार्फत सर्व शिक्षा अभियान शालेय ग्रंथालय समृद्धीकरण योजना सन २०१२-१३ अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शालेय ग्रंथालय पुस्तके खरेदीकरिता निधी मिळणार आहे.

 विद्यार्थ्यांत अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, पुरक वाचनातून ज्ञान समृद्ध करणे व जीवनात ग्रंथालयाचा उपयोग करणे हा या योजनेमागील उद्देश आहे. या योजनेंतर्गत शैक्षणिक सत्राकरिता तालुक्यातील निवडक ३२ जिल्हा परिषद लाभार्थी शाळांना शालेय ग्रंथालयाची पुस्तके खरेदी करण्यासाठी प्राथमिक शाळेला ३ हजार रुपये व उच्च प्राथमिक शाळेला १० हजार रुपये निधी शाळेच्या सर्व शिक्षा अभियानाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या रकमेतून लाभार्थी शाळांनी शासकीय व शासन मान्यता प्राप्त प्रकाशनाची ग्रंथालय पुस्तके शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन खरेदी करावयाची आहेत. या योजनेतून शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचनाची आवड वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथालय पुस्तकावर आधारित लेखन वाचन उपक्रम राबविण्यात येणार आहे.
 उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांना वस्तू रूपात प्रोत्साहनपर बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. या ग्रंथालयाचा लाभ शाळेतील विद्यार्थी शिक्षकांबरोबरच गावातील वाचनप्रेमी व्यक्ती व पालकांनाही देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शाळांच्या यादीत जाटलापूर, लोनवाही, कारगाटा, गोविंदपूर, नवेगाव, लोनखैरी, मुरपार, सरडपार चक, कोंढा, मोहबोडी, कुकडहेटी, जामसाळा, नैनपूर, नाचनभट्टी, इंदिरानगर, पळसगाव जाट, भेंडाळा, खैरीचक व पवना चक आदी ३२ शाळांचा या योजनेत समावेश आहे.
पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटी मंजूर

पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटी मंजूर


चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेटजवळील पूल २०१० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेला होता. या पुलाची उंची वाढविण्यात यावी व पुलाचे बांधकाम मजूबत व्हावे यासाठी आमदार नाना श्यामकुळे यांनी ६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीसाठी त्यांच्याकडून मागील दोन वर्षापासून सातत्याने होत असलेल्या प्रयत्नामुळे हिवाळी अधिवेशनात हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

चंद्रपूर मतदार संघातील ताडाळी, सोनेगाव, उसगाव, धानोरा पिपरी, मार्डा रस्ताच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ७९.८६ लाख, चंद्रपूर तालुक्यातील प्रजिमा ११ ला जोडणार्‍या घुग्घुस वळण रत्यावर लहान पुलाच्या बांधकामासाठी ७८.०२ लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, ताडाळी, सोनेगाव उसेगाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ७४.७७ लाख, चंद्रपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळा व शौचालयाच्या नूतनीकरणासाठी ५०.४८, जिल्हा कारागृहाच्या भिंतीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी १८.२८ लाख व मुख्य भितींच्या बांधकामासाठी ३९.०८ तर, चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ३ कोटी रुपये जिल्हा बजेटमधून प्राप्त झाले आहे. तसेच चंद्रपुरातील शासकीय अधिकारी यांच्या निवासासाठी २ कोटी रुपये मिळाले आहे.
 झरपट नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे माना, नांदगाव या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू होईल, असे आमदार श्यामकुळे यांनी सांगितले. चंद्रपूर शहरातील महिलांच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी २६ कोटी निधी मार्च २०१२ मध्ये मंजूर झाला असून, या रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. तसेच वरोरा नाका उड्डाण पुलाचे काम २०१३ च्या अखेरपर्यंत संपवून हा उड्डाण पुल वाहतुकीस सूरू होणार असल्याचेही श्यामकुळे यांनी सांगितले आहे.

Friday, November 30, 2012

एड्सबाधितांना मिळाला कौंटुंबीक जीवनाचा आधार

एड्सबाधितांना मिळाला कौंटुंबीक जीवनाचा आधार


वाहतूक शाखा आणि स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारातून यंदाही तिन जोडप्यांचा विवाह
 चंद्रपूरता. ३० : एड्स या महाभयंकर रोगाची लागण झाल्यानंतर रुग्ण मानसिक आजारानेच अर्धमेला होऊन जातो. घरातील लोकही त्याची उपेक्षा करतात. नातेवाईक भेटण्यास टाळतात. अशी अवहेलना सहन करावी लागते आणि मग सुरू  होतो एक जीवघेणा प्रवास. मात्रअशा रुग्णांच्या जीवनाला नवीन आकार देण्याचे काम एनएमपी पुणे आणि पृथ्वीआधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एचआयव्हीबाधित मुला-मुलींचा विवाह सोहळ्यातून केला जात आहे. आजवर या संस्थांनी पाच जोडप्यांचे विवाह केले असूनयंदा तीन जोडप्यांचा विवाह होईल.
एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन आणि २६/११ या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी वाहतूक शाखेच्या पुढाकारातून एनएमपी पुणे आणि पृथ्वीआधार बहुउद्देशीय संस्थेने उद्या ता. एक डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता या विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.
१९९२ च्या काळात चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून हेमंत करकरे होते. त्यावेळी वाहतूक पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे हे महाकाली पोलिस चौकीत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी करकरे यांनी एड्स या रोगाबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. त्यानुसार सपकाळे यांनी महाकाली मंदिर परिसरात देहविक्रय करणाèया महिलांच्या पाल्यांसाठी शाळा सुरू केली.
एड्स रुग्णांच्या प्रवासात महत्वावाची गरज असते ती या रुग्णांना मानसिक आधार देण्याची. त्या दृष्टिकोनातून हेमंत करकरे आणि पुंडलिक सपकाळे यांनी पावले उचलली होती. एचआयव्हीबाधित रोगावर अद्यापही औषध अथवा लस निर्माण झालेली नाही. मोठ्या शहरातील या रोगाने ग्रामीण भागातही पाय पसरले आहेत. अशा एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. दरम्यानज्यांच्या पुढाकारातून एड्स जनजागृती सुरू केली होतीते हेमंत करकरे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी
एड्सने बाधित झालेल्या रुग्णांना कौटुंबिक जीवन जगता यावेयासाठी पुंडलिक सपकाळे यांनी विवाहाची कल्पना मांडली. त्यानुसार २००८ पासून एनएमपी पुणे आणि पृथ्वीआधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एचआयव्हीबाधित मुला-मुलींचा विवाह सोहळा सुरू आहे. पहिल्या दोन वर्षांत प्रत्येकी एक आणि गतवर्षी दोन जोडप्यांचा विवाह करून देण्यात आला. यंदाही एक डिसेंबर रोजी हा सोहळा होत असूनतीन जोडप्यांचा विवाह होईल. याशिवाय वाहनचालकांमध्ये एड्सविषयी जागृती होण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यानआजवर विवाहित झालेल्या जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील एक डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

-- 
Devnath Gandate
Reporter Sakal Newspaper
chandrapur
9922120599

https://kavyashilp.wordpress.com

Thursday, November 29, 2012

ताडोबा वाचवायचे असेल,तर...

ताडोबा वाचवायचे असेल,तर...


उन्हाळ्यामध्ये ताडोबा अभयारण्याकडे पर्यटकांची रीघ लागते. येथील दाट झाडी असलेले जंगल, फुले व फळांचे विविध प्रकार, अनेक जातींचे पक्षी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील वाघ हे पर्यटकांचे आकर्षण. मात्र, ताडोबाचे जंगल, वाघ, तेथील आदिवासी व वनाधिकारी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. अभयारण्यातील या प्रत्येक घटकाच्या आजच्या स्थितीचा व भवितव्याचा हा आढावा...
वनरक्षकांच्या समस्याही महत्त्वाच्या!वनरक्षकांच्या प्रयत्नांमुळे जंगलातील वाघ सुरक्षित.
जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यांवर नियंत्रणासाठी प्रयत्न.
शिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवल्याने वाघांचे संरक्षण.
आदिवासींना कायदा समजावून सांगत जंगलाचे रक्षण करण्याचा प्रयत्न.

साधनसामग्री अपुरीसंरक्षणास पुरेसे कर्मचारी नाहीत.
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा अनुशेष.
अंतर्गत भागात काम करण्यास चांगल्या अधिकाऱ्यांची तयारी नाही.
अभयारण्यात राहण्यास वन कर्मचारी धजावत नाहीत. या कर्मचाऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न.
गस्ती पथके पुरेशी नाहीत.
ताडोबातील जखमी वन्य जीवांवर उपचारासाठी सोय नाही. पशुवैद्यकीय अधिकारी नाही.
वेळप्रसंगी हिंस्र जनावरांना बेशुद्ध करून ताब्यात घेण्यासाठी "टर्नाक्‍युलायझर' नाही.
ताडोबा व्यवस्थापनाकडे वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही.

काय करायला पाहिजे?वनरक्षकांना अधिक अधिकार.त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सोयी.
वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठीची अद्ययावत यंत्रणा.
गस्ती पथकांच्या व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ.

वाघ वाचला, तरच...२००७च्या प्रगणनेनुसार ४३ पट्टेदार वाघ, २२ बिबटे.
वाघांच्या वाढीसाठी बांबूचे वन उपयुक्त. त्यामुळे त्यांची संख्या टिकून.
जंगलामध्ये मोठे चढ-उतार नसल्याने वाघ सहज दृष्टीस पडतात व हेच पर्यटकांचे आकर्षण.

... पण शिकार येते मुळावरवाघांच्या संख्येच्या मानाने खाद्याचे प्रमाण कमी.
शिकारीमुळे तृणभक्षक जनावरांची संख्या कमी होत आहे. याचा थेट परिणाम वाघांवर.
जंगलातील नैसर्गिक जलसाठे कोरडे पडल्यावर शिकार आणि पाण्यासाठी वाघ मानवी वस्तीकडे येतात.
पाणवठ्यांवर अधिकार गाजविण्याच्या प्रयत्नात मानव आणि वाघांचा संघर्ष.
अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, त्या काळात वाघ पाण्यासाठी कोठे येऊ शकतात, याचा शिकारी टोळ्यांना अंदाज. त्यामुळे शिकारींत वाढ.

काय करायला पाहिजे?शिकाऱ्यांपासून वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न.
वर्षभर पाणी मिळण्यासाठी पाणवठे वाढविणे.
मनुष्याचा हस्तक्षेप होणार नाही यासाठी प्रयत्न.

जंगलाला दृष्ट लागतेय...प्राणी वैज्ञानिकांना, वन्य जीव अभ्यासकांना, तसेच हौशी पर्यटकांनादेखील ताडोबा अभयारण्याचे आकर्षण.
भारतीय वन कायदा ७ अन्वये, फेब्रुवारी १८७९पासून "संरक्षित वन'.
१९९५पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता.
अभयारण्याची व्याप्ती ५७८.५१ चौरस किलोमीटर (११६.५५ वर्ग किलोमीटर ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि ४६१.९६ वर्ग किलोमीटर अंधारी वन्य जीव अभयारण्य)
वन्य प्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी कोलसा येथील तलावाखेरीज १० तलाव.
उच्च दर्जाच्या बांबूची पैदास.
स्थानिक आदिवासींच्या मते, "तारू' नावाचा त्यांचा पूर्वज येथे वाघाशी लढताना मारला गेला. त्याच्या स्मरणार्थ या भागाचे नाव ताडोबा.
अभयारण्यातील नैसर्गिक जलाशयाच्या काठावर "तारू'चे मंदिर.

कशामुळे?सध्या उपलब्ध क्षेत्र वन्य जीव व वाघांसाठी पुरेसे नाही.
मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्य जीव असताना पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकलेले नाही.
बांबू तस्करीत वाढ. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्‍यात.
पर्यटकांसाठी सोयींचा अभाव.
तीव्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता मर्यादित.

काय करायला हवे?वन्य प्राण्यांच्या वावरासाठीची जागा वाढविणे.
जंगल वाढण्यासाठी प्रयत्न.
जंगलांना वणवे लागू नयेत यासाठी योजना.
बांबूची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न.
जलसाठा वाढविण्यासाठी योजना.

मूळ रहिवाशांवर अन्याय का?ताडोबातील मूळ रहिवासी असल्याने जंगलावर अधिकार.
पैसा ही गरज नाही, तर शिकार करून मांस खाणे ही नैसर्गिक गरज.
जंगलावर प्रेम असल्याने जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न.
जंगलावर आयुष्य अवलंबून असल्याने त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न.

वन विभागाशीच वादाचे प्रसंग१९९६मध्ये संरक्षित क्षेत्र घोषित झाल्याने आदिवासींना जंगलापासून दूर व्हावे लागले.
काम मागण्यासाठी गेलेल्या आदिवासींचे व्यावसायिकांकडून शोषण.
शाळा, वीजपुरवठा, रस्ते व पाण्यापासून वंचित.
रानमेवा मिळविण्यासाठी आदिवासी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे बांबू व तृणभक्षक जनावरांसाठी आवश्‍यक झाडांची राखरांगोळी.
जंगलाला लागलेल्या आगींचा परिणाम तृणभक्षकांच्या वाढीवर व वाघांच्या संख्येवर.
ताडोबा अभयारण्य झाल्यानंतर परिसरातील आदिवासी आणि वन विभागाचा संघर्षात वाढ.
रानडुकरे व नीलगाईंमुळे पिकांचे नुकसान.
वनहक्क कायद्यानुसार आदिवासी आपल्या अधिकारांचा वापर करतात, तर याच कायद्याचा आधार घेऊन त्यांच्या नावाने इतरांकडून वनांचे नुकसान.याचा त्रास आदिवासींना. त्यामुळे आदिवासींमध्ये वन विभागाप्रती नेहमीच असंतोष.
रानमेव्यातून मिळणारी खनिजे कमी झाल्याने आदिवासींचे कुपोषण.

काय करायला पाहिजे?आदिवासींच्या प्रगतीसाठी जंगलातील संपत्तीमध्ये त्यांना भागीदार करवून घेणे गरजेचे.
विस्थापित आदिवासींच्या प्राथमिक गरजा शासनाने पूर्ण कराव्यात.
जंगलातील संपत्तीवर आदिवासींचा हक्क हवा.
अभयारण्यासंदर्भातील कायद्यांची योग्य माहिती त्यांना द्यावी.
जनावरांमुळे पिकांची हानी झाल्यास त्वरित भरपाई मिळावी.
रानमेवा मिळणे अशक्‍य झाल्याने त्यांच्या पोषणासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
पर्यटकांसाठी गाइड म्हणून काम करणे, वनातील फुले, फळे व मधासारख्या गोष्टी विकण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे.

पर्यटक तर यायलाच हवेत..सोयी, गैरसोयी
अभयारण्यामध्ये चढ-उतार नसल्याने वाघांना पाहणे सोपे.
ताडोबाचा प्रमुख जलाशय पक्षिनिरीक्षकांचे आवडते ठिकाण. संपूर्ण जलाशयाला परिक्रमा करता येईल, असा जीपने प्रवासयोग्य मार्ग.
ताडोबापासून १८ किलोमीटरवर असलेल्या मोहर्ली येथे काही खासगी रिसॉर्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राहण्याची व्यवस्था.
"मगर प्रजनन केंद्रा'तून सोडलेल्या मगरी काठावर पहुडलेल्या पाहायला मिळतात.
ताडोबाच्या आतील पर्यटकांसाठी असलेले रिसॉर्ट व्याघ्रसंरक्षणासाठी आता बाहेर.
खासगी रिसॉर्ट सामान्य पर्यटकांना परवडत नाही.
चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकापासून ताडोबाचे अंतर ४५ किलोमीटर. ताडोबाला जाण्यासाठी वन विभागातर्फे सोय नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस. त्यांच्या वेळा सकाळी आणि सायंकाळी. (ताडोबामध्ये पर्यटकांना सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ३ ते ५ या वेळात प्रवेश.)
खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट.
ताडोबाच्या पर्यटकांसाठी सुरू केलेली डेक्कन ओडीसी ही रेल्वेसुद्धा सेवाग्रामपर्यंतच.
ताडोबाच्या आत पर्यटकांना फिरविण्यासाठी खासगी वाहने आहेत; मात्र त्यांचेही दर ठरलेले नाहीत.
व्यवस्थापनाने सर्वसामान्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वाहतूक आणि राहण्याचा प्रश्‍न प्रथम सोडविण्याची गरज.
बस आणि रेल्वे स्थानकांवरून पर्यटकांना ताडोबाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचविण्याची व्यवस्था नाही.

... पण, हे तारतम्यही हवेजंगलातील झाडे व फुलांना बाधा पोचवू नये.
वन्य प्राणी बिथरतील असे वर्तन करू नये.
मोठ्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आदिवासींच्या सहवासात राहिल्यास त्यांना रोजगार मिळेल.
अभयारण्यामध्ये प्लास्टिकचा कचरा करू नये.

प्रश्‍न बफर झोनचा ताडोबा अभयारण्य वाचविण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोनभोवती बफर झोन प्रस्तावित. हे ११०१.७७ चौ.कि.मी क्षेत्र राखीव. यात ७९ गावांचा समावेश.
व्याघ्रप्रकल्पाच्या प्रस्तावित क्षेत्रात मोठी खनिजसंपत्ती. या खाणी झाल्यास त्याचा परिणाम सरळ व्याघ्रप्रकल्पावर.
बफर झोन झाल्यास वन्य जीव सुरक्षित.

संकलन : प्रमोद काकडे
प्रतिक्रिया
On 4/25/2010 10:48 AM Ashutosh Joshi said:
अतिशय उत्तम आणि मुद्देसीद लेख आहे. फक्त खाणकामाचा मुद्दा फारच गंभीर असल्याने तो अजून थोडा ठळक पाने मांडला गेला असता तर अधिक चांगले झाले असते असं मला वाटते. पण माझी सरकार आणि निधी देणाऱ्या कंपन्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे कि अशी प्रक्टीकॅल संवर्धन करणाऱ्या लोकांना तुमचे निधी जाऊ द्यात. तरच वाघ वाचतील.
On 4/22/2010 10:36 AM Jitendra Kulkarni said:
धन्यवाद प्रमोद... अतिशय माहितीपूर्ण आणि मुद्देसूद लेख आहे. मी ताडोब्याला गेली २५ वर्षे जात आहे आणि लेखातील सगळेच मुद्दे तेव्हापासून पाहत आहे. कदाचित त्याच्या हि आधी पासून ते तसेच असतील. माझा इ मेल सोबत दिला आहे. जर काही योजना ताडोब्या साठी आखली जात असेल तर कृपया संपर्क करणे हि विनंती.
On 4/22/2010 9:54 AM Dr.Manoj Prabhavat said:
थान्क्स प्रमोद ! हा लेख वाचून ताडोबा प्रकल्पाची पूर्ण कल्पना आली ! खरच वाघांना वाचावाय्साठी खूप काही करायचं आहे आणि मला वाटत कि सरकार ने ह्या बाबत लवकरच काही तरी उपाय करायला पाहिजेत.
On 4/22/2010 9:15 AM Bhagyesh Jain said:
धन्यवाद ! प्रमोद, यासाठी काही योजना आखल्या गेल्यास, आमच्यासारखी सर्व तरुण मंडळी या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत.
On 22/04/2010 08:57 प्रशांत said:
वरील सुचविलेल्या उपायांपैकी काही उपाय सोपे आहेत कमीतकमी ते तरी पूर्ण व्हावेत एवढी सरकार कडून अपेक्षा आहे. मागील अंकात जंगल तोडी बद्दल ऐकून फार वाईट वाटले होते. मिझी सरकारला विनंती आहे कि माणसांची नाही तर कमीतकमी जंगली प्राण्यांची तरी काळजी घ्या. काही तरी निर्णय (दिल्लीला विचारून नाही) घ्या.
On 4/22/2010 8:14 AM Rupesh Pansare said:
खूप छान प्रोजेक्ट. सरकारने याकडे लक्ष्य द्यायला हवे.... धन्यवाद प्रमोद.
On 4/22/2010 5:26 AM atul kumthekar said:
ताडोबा प्रकल्प पुण्यात आणावा ! मग बिल्डर्स हळू हळू त्याचे कोन्क्रेतिज़तिओन करतील आणि पर फमिली एक वाघ पाळलाच पाहिजे असा नियम राष्ट्रवादी सरकार करेल !
On 4/22/2010 4:50 AM sandeep said:
धन्यवाद ! मुद्देसूद लेख वाचून लवकर व प्रखरपणे समजले.
On 4/22/2010 1:34 AM satish patil said:
केंद्रीय पर्यावरण मंत्र्याच्या पासून , झाड तोडणार्या गुन्हेगारापर्यंत ची भ्रष्टाचाराची लिंक नष्ट केली तरच भारतातले झाड वने विसरा झाड वाचेल . व्याघ्रप्रकल्प वागिरे लांबच्या गप्पा आहेत .