वाहतूक शाखा आणि स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारातून यंदाही तिन जोडप्यांचा विवाह
एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन आणि २६/११ या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी वाहतूक शाखेच्या पुढाकारातून एनएमपी पुणे आणि पृथ्वीआधार बहुउद्देशीय संस्थेने उद्या ता. एक डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता या विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.
१९९२ च्या काळात चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून हेमंत करकरे होते. त्यावेळी वाहतूक पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे हे महाकाली पोलिस चौकीत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी करकरे यांनी एड्स या रोगाबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. त्यानुसार सपकाळे यांनी महाकाली मंदिर परिसरात देहविक्रय करणाèया महिलांच्या पाल्यांसाठी शाळा सुरू केली.
एड्स रुग्णांच्या प्रवासात महत्वावाची गरज असते ती या रुग्णांना मानसिक आधार देण्याची. त्या दृष्टिकोनातून हेमंत करकरे आणि पुंडलिक सपकाळे यांनी पावले उचलली होती. एचआयव्हीबाधित रोगावर अद्यापही औषध अथवा लस निर्माण झालेली नाही. मोठ्या शहरातील या रोगाने ग्रामीण भागातही पाय पसरले आहेत. अशा एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. दरम्यान, ज्यांच्या पुढाकारातून एड्स जनजागृती सुरू केली होती, ते हेमंत करकरे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी
एड्सने बाधित झालेल्या रुग्णांना कौटुंबिक जीवन जगता यावे, यासाठी पुंडलिक सपकाळे यांनी विवाहाची कल्पना मांडली. त्यानुसार २००८ पासून एनएमपी पुणे आणि पृथ्वीआधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एचआयव्हीबाधित मुला-मुलींचा विवाह सोहळा सुरू आहे. पहिल्या दोन वर्षांत प्रत्येकी एक आणि गतवर्षी दोन जोडप्यांचा विवाह करून देण्यात आला. यंदाही एक डिसेंबर रोजी हा सोहळा होत असून, तीन जोडप्यांचा विवाह होईल. याशिवाय वाहनचालकांमध्ये एड्सविषयी जागृती होण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आजवर विवाहित झालेल्या जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील एक डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
Devnath Gandate
Reporter Sakal Newspaper
chandrapur
9922120599
https://kavyashilp.wordpress.com