সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 09, 2017

मुलगी झाली म्हणून आजीने घोटला नातनीचा गळा

चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
चंद्रपूर:ललित लांजेवार /(जिवती)
आजच्या २१ व्या शतकात सुद्धा जेव्हा मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत असतांनाही मुली या ओझं वाटत असण्याची सडकी मानसिकता अजूनही जिवंत असल्याचे ताजे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे बघायला मिळाले. जिवती तालुक्यातील सोमलगुडा या गावातील एका विकृत मानसिकतेच्या आजीने सत्तावीस दिवसांच्या नातनीचा गळा घोटून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुनेच्या पोटी तिसरीहि मुलगीच झाल्याने नाराज आजीने सत्तावीस दिवसाच्या आपल्या नातनीलाच गळा घोटून संपवलं,या संदर्भात संपूर्ण माहिती प्राप्त होत नसून प्राथमिक माहितीच्या आधारे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून हा संपूर्ण प्रकार रविवारी घडला असल्याचे सांगण्यात येत आहे,आरोपी आजी हि मुलगी झाली तेव्हा पासून नाराज होती मात्र या आजीच्या मनात काय शिजत होते हे कोणालाच ठाऊक नव्हते,जिचे  डोळेही नीट उमलले नव्हते अश्या तान्हुलीच्या जन्मानंतर तब्बल सत्तावीस दिवसांनी तिच्याच आजीनी तिचा खून केला.या प्रकरणात आरोपी आजी विरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नुकताच हरियाणा सरकारने मुलींच्या लिंग गुणोत्तरात वाढ होण्यासाठी एक आशादायी पाऊल उचलले आहे. तिसरी मुलगी ज्या कुटुंबात जन्माला येईल त्या कुटुंबाला २१ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. ज्यांचा जन्म ऑगस्ट २०१५ नंतर झाला आहे, अशा सर्व कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हि घडलेली विकृत मानसिकता बदलविण्याची महाराष्ट्र सरकारला देखील अश्या प्रकारे मुलींच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यासाठी जनगागृतीची आवश्यकता भासणार असल्याचे चित्र दिसत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.