সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 30, 2017

अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या

*चंद्रपूर-नागपूर महामार्गा बाजूचे सर्विस रोडवरील अतिक्रमण हटविण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत.

*लवकरच कारवाईला सुरूवात

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :भद्रावती
नगरपरिषद क्षेत्रातील चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या ले-आऊट मधील सर्विस रोडवर केलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी मुख्याधिका-यांनी अतिक्रमणधारकांना नोटिस बजावल्या आहेत. नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.
                  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये तथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1966 अन्वये सदर नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.
                 सदर नोटिस प्राप्त होताच सात दिवसाचे आंत कच्चे-पक्के अतिक्रमण काढुन सर्व्हिस रोड मोकळा करुन दयावा, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता, नगरपरिषदद्वारा अतिक्रमण काढुन घेण्यात येईल. या कार्यवाहीत झालेल्या नुकसानीची व तुटफुटीची जवाबदारी अतिक्रमणधारकांची असेल, व कारवाईसाठी लागणारा सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येईल, असे नोटिसमधे नमूद केलेले आहे.
                  नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण फार जुने आहे. सदर अतिक्रमण कायमस्वरुपी हटल्यास शहराचा चेहरामोहरा बदलेल. अपघातांची शक्यता कमी होणार आहे. महामार्गाच्या बाजुच्या संताजी नगर, गुरुनगर, कुणबी सोसायटी, गौतमनगर ही ले-आऊट अतिक्रमणापासून मोकळी होतील. अतिक्रमणामुळे होणारे उपद्रव कमी होतील. पानठेले, खर्रा विक्री केन्द्र, बंद होतील. अवैध दारुविक्रीला आळा बसेल. रोडरोमीओंची संख्या कमी होईल. पैदल चालणा-यांना सुरक्षा मिळेल. महामार्गाशेजारची गर्दी व वर्दळ कमी होईल. शहर महामार्गाला लागुन असल्यामुळे शहराची ओळख बदलून महामार्गाने जाणा-यांचा शहराकडे पाहण्याचा द्रुष्टिकोण बदलेल.
                प्रभु गॅरेज ते पंचशील नगर, वांढरे फ्रुट्स स्टॉल ते होटल पैराडाईज, कोंबे यांचे घर ते बस स्टॉप पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजुचा सर्व्हिस रोड मोकळा होण्यासाठी भद्रावतीकर वाट बघत आहे व नगरपरिषदेकडुन मोठी अपेक्षा लावुन बसले आहे. आता नगरपरिषदेच्या या निर्णयात कोणता अडथळा येवुन, अतिक्रमण हटविण्याचे काम थांबू नये, असे नागरीकांचे म्हणने आहे.
----------------------------------------
नगरपरिषदेने कोणतेही हितसंबंध न जोपासता, लहान-मोठे व्यवसायिक न बघता सगड्या अतिक्रमणधारकांना नोटिस पाठवुन न.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर अतिक्रमण हटवून सर्व्हिस रोड मोकळे करावे. -

मुश्ताक अली, व्यवसायिक, भद्रावती।


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.