সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 28, 2017

दोन लहान मुलांचे अपहरण

पारशिवणी (कन्हान)::  : आंबेडकर चौकातुन दोन लहान मुलांचे दुपारी ३ वाजता दरम्यान अपहरण करण्यात आले. मुलीच्या प्रसंगावधानाने आरडाओरडा केल्यानंतर कामठी नविन पोलीस स्टेशन परिसरात तिला सोडुन अपहरणकर्ताने पोबारा केला. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक हाके यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेने ही मुले सुखरूप सापडली.


ट्यूशन साठी घरुन निघालेल्या दोन बहीण भावंडाणा एक दुचाकी चालक कन्हान येथून अपहरण करून लंपास झाला.दोघांपैकी भावाला  कामठी रोड स्थित साई मंदीर नजीक सोडून आरोपी पसार झालेत तर नाबालिक मुलीला आपल्या सोबत घेऊन कामठी मार्गे लागले असते उलीने आरडा ओरड करताच तिला अपहरण कर्त्यांनी कामठी पोपीस स्टेशन समोर सोडून पसार होण्याची घटना 
मंगळवार दि.२८ च्या दुपारी ३:१५ ला घडली अपहरण कर्त्यांनी मुलांना कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील जवाहर नगर येथून उचलल्याची माहिती पुढे आलेली आहे.कन्हान पोलीस व परिवाराच्या सदस्यांच्या सतर्कतेने अपहृत दोन्ही मुलं घरी सुखरूप पोचलेत.

माहीती नुसार पीडित दोघेही  परिसरातच ट्यूशन क्लासेस साठी निघाले होते.तेवढ्यात एक लूना वर स्वार होऊन दोन व्यक्ति आले व मुलांच्या नजीक पोचून त्यांना त्याच्या वडिलांनी तुम्हाला आणायला पाठविल्याचा सांगितले त्यानंतर दोन्ही मुलांना आरोपी आपल्या लूना गाड़ी वर बसवून त्यांना कामठी च्या दिशेने न्यायला लागले. अपहरण कर्त्यांनी  कामठी रोड वर्ती असलेल्या आड़ा पुला नजीक असलेल्या साई मंदिर जवळ उतरवून दिले
तर दुसऱ्याला घेऊन कामठी कडे कूच केली मुलाने त्वरित सूद दाखवत साई मंदिर मध्ये एका व्यक्ति ला आपली आपबीटी सांगितली व आपल्या काका लुनेश्वर यांच्या फोन पर फोन लावून मागितला ज्यांतर त्याच्या काकाने साई मंदिर येथे पोचून त्वरित कन्हान पोलीस स्टेशन पोचुन अपहरण झोयाच्या घटनेची नोंद कन्हान पोलिसात केली.
त्यानंतर पीएसआई हाके, एएसआई अशोक जाधव, शरद गीते सह स्टाफ ला घेऊन कामठी कडे नवाब झालेत कामठी ऑटो स्टैंड चौका कर लागलेल्या सीसीटीवी फुटेज चेक केल्यावर  लूना ने एक व्यक्ति अपहरन झालेल्या मुलीला घेऊन जाताना दिसला मुलीने आरडा ओरड करायला सुरुवात केली असता आरोपीने मुलीला कामठी येथे गर्दीत सोडून पसार झाला ज्यांतर तपास व शोध घेता मुलगी कामठी येथे सुखरूप सापडली कन्हान पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून सामोरील तपास सुरू आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.