नागपूर : शहरात गेल्या १०-१५ दिवसांत धुळीचे कण, धूर, थंड हवामान, धूम्रपान अशा विविध बाबींमुळे अलीकडे अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व थंडीत झालेली वाढ आहे.
ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवेदनशील, प्रभावित होणारी आणि नाजुक असते. यामुळे धूळ, धूराच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येते. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात.