रामटेक/प्रतिनिधी- पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या रंगेल प्रणालीचीविषयी थेट जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. त्यावर चौकशी करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2017 रोजी समीतीच्या निता ठाकरे (कार्य. अभियंता, जि.प. नागपुर ) आपल्या अन्य पाच सहकारी सदस्यांसह रामटेकच्या पंचायत समीती कार्यालयांत सुमारे पाच तास उपस्थित होत्या . यावेळी संबधित विस्तार अधिकारी हजर झाले नाहीत.
यावेळी स्थानीक बातमीदारांशी संवाद साधतांना श्रीमती ठाकरे यांनी सांगीतले की विस्तार अधिकारी यांच्याविरूद्ध अनेक तक्रारी असल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी आम्ही रामटेकला आलो होतो. सुमारे 19 जणंाचे तोंडी व लेखी बयाण यावेळी नोंदविण्यांत आले.यामध्ये महीला ग्रा.पं. कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांचा समावेश आहे.या सर्वांचे बयाण रामटेक पं.च.च्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात बंदद्वार नोंदविण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पश्ट केले. विस्तार अधिकारी हे वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांची बाजू ऐकून घेता आली नाही. विस्तार अधिकारी यांना त्यांचे म्हणने मांडण्याची संधी समीतीच्या वतीने देण्यांत येईल व त्यांचे बयाण आल्यानंतर चौकशी समीती आपला अहवाल मुकाअ यांना सादर करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. ते ग्रामसेवक नंतर ग्रामविकास अधिकारी व आता विस्तार अधिकारी म्हणून सेवेत आहेत.