नागपूर - -नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज भाजपकडून देशभरात ‘काळा पैसा
विरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदीच्या
निर्णयाचे समर्थन केले.
नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी साडेपंधरा लाख कोटी
रूपयांची माहिती आपल्याकडे नव्हती. हे पैसे कोणाकडे आहेत आणि त्याचा उपयोग
कशाप्रकारे होत आहेत, याची कोणतीही नोंद नव्हती. मात्र, नोटाबंदीमुळे
असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात
आला. नोटाबंदी झाली नसती तर ही रक्कम कधीच सापडली नसती. यापैकी काही रक्कम
संशयातित असून त्याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे यामध्ये काळा पैसा
सापडल्यास त्याच्यावर करवसुली करणे शक्य होईल, असे फडवणीस यांनी म्हटले.
तसेच नोटाबंदीमुळे बेहिशोबी पैसा मोठ्या प्रमाणावर समोर आला. हे पैसे
बँक खात्यामध्ये आल्यामुळे त्याचा नेमका स्त्रोत कळाला. त्या आधारे आयकर
विभागाने कारवाईला सुरूवात केली. या कारवाईदरम्यान आपल्याकडील बेकायदा
संपत्ती स्वत:हून उघड करण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले. तर कारवाई करून
पकडण्यात आलेल्या बेहिशोबी रक्कमेचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले. काळा
पैसा हुडकून काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईत एकूण
२९, २१३ कोटी रूपये हाती लागल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तत्पूर्वी केंद्र सरकारनेही नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि
काळ्या पैशावर लगाम लावण्यात यश आल्याचा दावा केला आहे. नोटाबंदीनंतर
लोकसंख्येपैकी ०.०००११ % लोकांनी देशातील उपलब्ध एकूण रकमेच्या ३३ टक्के
रक्कम जमा केल्याचे सरकारने म्हटले आहे. हा आकडा ५ लाख कोटींच्या घरात
असल्याचा दावा सरकारने केला.
नोटाबंदीमुळे खूप सकारात्मक बदल घडले आहेत, या काळात सर्वसामान्य जनतेने जी साथ त्याबद्दल सर्वांचे आभार, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मनमोहन सिंग मोठे अर्थशास्त्री असले तरी भारतीय अर्थशास्त्राची बदनामी त्यांच्याच काळात झाली, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मनमोहन सिंग मोठे अर्थशास्त्रज्ञ असले तरी भारतीय अर्थशास्त्राची बदनामी त्यांच्याच काळात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नोटाबंदीचे गोडवे गात या काळातील आकडेवारी सादर केली. नोटाबंदी नंतर १५ कोटी २८ लाख रुपये परत आले, तर १५ हजार कोटी रुपये परत आले नाही. तसेच २.६९ लाख कोटीचे व्यवहार संशयस्पद आढळले. नोटाबंदीमुळे हा पैसा समोर आला आहे. मोदी सरकार येण्याआधी ३ कोटी लोक टॅक्स भरायचे त्यांचे प्रमाण आता ६ कोटीपर्यंत गेले आहे.
जे साडे पंधरा लाख कोटी रुपये बॅंकेत जमा झाले आहे. या पैशांचा स्त्रोत सापडला आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :- गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र...
नागपूर : येथील माजी महापौर आणि माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. 22) निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. 1970 साली त्यांनी नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर, 1971 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम बघीतले. बारा वर्ष त्यांनी विधानपरिषदेत आमदार म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. नगरसेवक ते आमदार या राजकीय प्रवासात त्यांनी प्रदेश कॉग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविली. सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. गरीब होतकरु आणि मागासवर्गातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देण्यासाठी या संस्थेमार्फत जवळपास 45 शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना करुन भरीव कार्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वंसतराव साठे, निर्मलाबाई देशपांडे यांचेसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या मागे गिरीश आणि किरण अशी दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी (ता. 23) बारा वाजता धंतोली येथील निवासस्थानातून निघू...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...