चंद्रपूर |
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या नागपूर विभागामध्ये पूर्वेकडील टोकामध्ये स्थित आहे आणि विदर्भ प्रदेशाचा पूर्वेकडील भाग बनलेला आहे. चंद्रपूर जे पूर्वी चांदा म्हणून ओळखले जात असे ते शहर मध्य भारतात महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेच्या ठिकाणी आहे. शहराजवळ वर्धा नदी वाहते. चंद्रपूर ही 12 व्या पासून ते 15 व्या शतकापर्यंत गौड राजवंशाची राजधानी होती आणि त्यानंतर ती नागपूरच्या मराठा भोसलेव्दारा जिंकण्यात आली. 1854 पासून ते 1947 मधील भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत तो ब्रिटीश मध्यवर्ती प्रांताचा भाग बनलेला होता. शहरामध्ये गौड राजांची थडगी आणि कित्येक देवळे आहेत. परंपरेनुसार चंद्रपूर जिल्हा या अगोदर ‘चांदा’ म्हणून ओळखला जात असे आणि दंतकथेत त्या जागेचे नाव ‘ लोकपूरा ’ होते जे प्रथम ‘इंदपूर ’ म्हणून आणि पुढे चंद्रपूर म्हणून बदलले गेले. चंद्रपूर शहरामध्ये भगवान शंकराची रूपे असलेली महाकाली देवी आणि अचलेश्र्वर यांची प्राचीन देवालये आहेत. चंद्रपूर हे चांदा म्हणून देखील ओळखले जाते. हा प्रदेश कच्चे लोखंड, चूनखडी आणि कोळसा अशा खनिज संपत्तीने अत्यंत संपन्न आहे. सिमेंटचे अनेक कारखाने या प्रदेशाच्या ठिकाणी आहेत. शहरा सभोवती मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कोळशांच्या खाणींमुळे हे शहर काळ्या सोन्याचे शहर असेही ओळखले जाते. चंद्रपूर जिल्ह्यात 15 तालुके समाविष्ट आहेत ते असे : चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीडल (हे रेल्वेचे जंक्शन सुध्दा आहे), ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, सावली, गोंडपिपरी, कोरपाना, पांभुरणा आणि जिवती. रेल्वेमार्गाव्दारे तो भोपाळ, ग्वालियर, इंदोर, नागपूर, झाँसी, आग्रा, नवी दिल्ली, जम्मू तावी, वारंगळ, विजयवाडा, चेन्नई, कन्याकुमारी, वडोदरा, बंगलोर, सिंकदराबाद, हैदराबाद, पुरी, अहमदाबाद, जयपूर, मुंबई-बंगलोर, म्हैसूर, लखनऊ, अलाहाबाद, कानपूर, झाँसी, वाराणसी, गोरखपूर, पटना, गया यांना जोडलेले आहे. चंद्रपूर हे जिल्ह्यातील अभियांत्रिकी/ तंत्रानिकेतन/ वैद्यकीय/ कायदा विद्यालये अशा शैक्षणिक सुविधांसाठी ख्यातनाम आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेच्या बाजूने वहाणारी वैनगंगा नदी ही जिल्ह्याची मुख्य नदी आहे. जिल्ह्यामध्ये वर्धा ही एकमेव बारमाही नदी आहे, जिचा प्रवाह मार्ग इतर दोन मुख्य नद्यांशी तुलना केली असता सर्वांत लांब आहे. हे शहर ‘इराई’ नदीच्या तरावर वसले आहे, शहरातून वाहणारी ‘झारपथ’ ही दुसरी नदी आहे. प्रदेशविषयक नकाशानुसार शहराचा उत्तरेकडील भाग उंच आणि दक्षिणेकडील खोलगट म्हणजे 56 मी. आहे. जुने शहर हे अत्यंत मोठ्या अशा 4 भीतींद्वारे वेढलेले आहे. सीटीपीएस ची उच्चभूमी गावठीदेव नाल्याचे उगमस्थान बनले आहे. रेंजर महाविद्द्यालयाची उच्चभूमी मुच्ची नाल्याचे उगमस्थान बनली आहे. हे नाले शहराचे हृद्यस्थानी असलेला तलाव “रामलू तलाव” यामध्ये विलिन झाले आहेत. इराई नदीला पुराचा मोठा इतिहास आहे, पुराच्या खुणा शहराच्या गडाच्या भिंतींवर म्हणजे पठाणपुरा प्रवेशव्दारावर दिसत आहेत. चंद्रपूर शहराची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे 10 किमी. आणि पूर्व-पश्चिम ही 7 किमी आहे. शहराच्या उत्तरेमध्ये इराई नदीवर धरण बनविले असून क्षमता 207 मिलीयन क्युबीक मीटरची आहे |
क्षेत्र (चौ.किमी.) | 11443 | |
तालुक्यांची संख्या (उप जिल्हे) | 15 | |
नगरांची संख्या | सांविधिक नगरे | 7 |
प्रगणित नगरे | 16 | |
महसुली गावांची संख्या | 1792 | |
लोकसंख्या | एकूण | 2194262 |
पुरूष | 1120316 | |
स्त्री | 1073946 | |
दशकातील वाढीची टक्केवारी (2001-2011) | 5.95 | |
लोकसंख्येची घनता (व्यक्ती प्रति चौ.किमी.) | 192 | |
लैगिंकतेचे प्रमाण | 959 | |
बालकांचे लैगिंकतेचे प्रमाण(0-6 वर्षे) | 945 | |
एकूण लोकसंख्येशी लोकसंख्येची टक्केवारी | अजा | 14.3 |
अज | 18.1 | |
ग्रामीण | 35.08 | |
साक्षरतेचा दर (7 वर्षे आणि त्यावरील) | व्यक्ती | 81.35 |
पुरूष | 88.73 | |
स्त्री | 73.65 |
शैक्षणिक आकडेवारी : | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
व्यवस्थापन आणि प्रवर्गनिहाय शाळा | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
नावनोंदणी : | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
व्यवस्थापन निहाय शाळांतील नावनोंदणी | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|