সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 07, 2012

आदिवासींची 'अंधारवाट' येणार चित्रपटात

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी स्वातंत्र्याच्या 50 वर्षांनंतरही मूळ प्रवाहात येऊ शकला नाही. उलट तो माओवादी आणि पोलिसांच्या बंदुकीचा शिकार बनला. या आदिवासींच्या समस्या आणि शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ यावर प्रकाश टाकणाऱ्या "अंधारवाट' या कथेवर लवकरच चित्रपटनिर्मिती होत आहे. 
झाडीपट्टीतील कलावंत अनिरुद्ध वनकर यांनी ही कथा लिहिली. मुंबईच्या सार्थक मोशन पिक्‍चर प्रा. लिमिटेड यांनी चित्रपट तयार करण्याची घोषणा कोहिनूर हॉल, दादर येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केली. सार्थक मोशनने यापूर्वी मराठीतील पहिला थ्रीडी असलेल्या "आई मला मारू नको' या चित्रपटाची निर्मिती केली. त्या चित्रपटाच्या 50 व्या दिनानिमित्त सोहळा पार पडला. त्या वेळी अनिरुद्ध वनकर यांनी लिहिलेल्या कथेवर चित्रपट निर्मितीची घोषणा निर्माता अविनाश जाधव, सुनील झोडे यांनी केली. या वेळी "शक्तिमान'फेम मुकेश खन्ना, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी निदेशक पद्‌मश्री रामगोपाल बजाज, अभिनेते विजू खोटे, ललित कला अकादमीचे डॉ. प्रकाश खांडके उपस्थित होते. 
"अंधारवाट' या चित्रपटात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शासनाकडून आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना येतात; मात्र प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांमुळे या योजना मूळ आदिवासींपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे दररोज एक माओवादी जन्माला येतो. 
या चित्रपटात उपेंद्र लिमये, चिन्मय मंडलेकर, किशोर कदम आदी मराठीतील प्रसिद्ध कलावंत भूमिका वठविणार असून, विदर्भातील नवोदित कलावंतांनाही संधी देण्यात येणार आहे. चित्रीकरण वाडा (जि. ठाणे), गोरेगाव (मुंबई) येथे होणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.