সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 13, 2012

डाकपालावर टपालाचे ओझे


देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 13, 2012 AT 03:00 AM (IST)
चंद्रपूर - खासगी कुरिअर, ई-मेल, एसएमएस आणि सोशल नेटवर्किंगने झपाटलेल्या युगातही पोस्टातील टपालांची संख्या कमी झालेली नाही. सुमारे साडेतीन लाख लोकवस्तीच्या शहरात दररोज किमान 20 हजार टपालांची आवक आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील टपाल पोहोचविण्याचे काम केवळ वीस "पोस्टमन' करीत आहेत. 
देशात इंग्रजी राजवट असताना टपालसेवेला प्रारंभ झाला. तेव्हा दर 15 किलोमीटरमागे एक पोस्टमन असायचा. आता स्वातंत्र्यानंतरही भारतीय टपालसेवेने तोच नियम ठेवलेला आहे. सुरुवातीच्या काळात अंतर फारसे नव्हते. मात्र, आता लोकसंख्या वाढली. शहराचे झपाट्याने नागरीकरण झाले आणि घरांची संख्याही वाढली. परिणामी पोस्टमनला एका दिवसात 15 किलोमीटरचे अंतरही आता मोठे वाटायला लागले आहे. 15 किलोमीटरच्या अंतरात सध्याच्या काळातील इमारतींचे मजले मोजण्यात येत नाहीत. यामुळे सध्या एका पोस्टमनला किमान 400 पत्रे पोहोचविण्यासाठी 20 ते 25 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर रोज मोजावे लागते. चंद्रपूर शहरात मुख्य टपाल कार्यालय आणि सिटी पोस्ट कार्यालय आहे. सिटी कार्यालयाकडे गोंडकालीन परकोटाचा भाग, तर मुख्य कार्यालयाकडे उर्वरित शहराची जबाबदारी आहे. दोन्ही कार्यालये मिळून एकूण 20 पोस्टमन कार्यरत आहेत. येथे सुमारे 30 पदे भरण्याची गरज आहे. मात्र, पोस्ट कर्मचाऱ्यांची भरती 1983 पासून बंद करण्यात आली. पोस्ट विभागाने सेवा सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. साधारणत: दोन वर्षांपूवी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली; पण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे कार्यरत पोस्टमनवर कामाचा व्याप वाढत आहे.

दृष्टिक्षेपात टपाल एक लाख 53 हजार 423
देशभरातील टपाल कार्यालये 12 हजार 423
चंद्रपूर शहर 
25 चौ.कि.मी.मागे
एक टपालकचेरी
15 किलोमीटरमागे एक पोस्टमन
400 पत्रे एका पोस्टमनकडे

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.