समस्या सोडविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार
चंद्रपूर, ता. १३ : ३८२ खाटांची व्यवस्था असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ५००हून अधिक रुग्ण दाखल होतात. मात्र, डॉक्टरांची संख्या अत्यल्प असल्याने गैरसोय होत असल्याचे वृत्त म सकाळने प्रकाशित केल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी गुरुवारी (ता. १३) रुग्णालयाची पाहणी केली. राज्याच्या टोकावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची वाईट स्थिती बघून दु:ख वाटल्याची खेदजनक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. ही सर्व सम स्या दूर करण्यासाठी आरोग्यम ंत्री सुरेश शेट्टी यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली, यवतमाळ, आंध्रप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे ३८२ खाटा वर्षभर कमी पडतात. विविध उपचारासाठी येणा-या रुग्णांवर डॉक्टर उपचार करीत नाहीत, असे या पाहणीतून दिसून आल्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्म णराव ढोबळे म्हणाले. यावेळी त्यांनी सांगितले, की म सकाळने वृत्त प्रकाशित केल्यानंतर येथील सम स्या पुढे आल्या. राज्याचे आरोग्य खाते साम ान्य रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमतून सर्व गोरगरिबांना म हागड्या उपचाराच्या सुविधा मोङ्कत देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा सामान्य रुग्णालयांत सोनोग्रॉङ्, सिटीस्कॅन या सुविधा सुरू आहेत. मात्र, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या सुविधा सात वर्षांपासून बंद असल्याचे पाहून आश्चर्य वाटले. ऑपरेटर नसल्याने डायलिसिस म शीन बंद आहे. शासनाकडून मोङ्कत औषधांचा पुरवठा होतो. मात्र, येथे रुग्णांना हजारो रुपये खर्च करून मेडिकलमधून औषधे खरेदी करावी लागतात. हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. ५० खाटांच्या क्षमतेच्या वॉर्डात १०० हून अधिक रुग्ण दिसून आले. यावेळी अनेक वृद्ध महिला रुग्ण खाली झोपून उपचार घेत असल्याचे पाहून दु:ख वाटले. जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत रुग्णांना पोहोचविण्यासाठी शववाहिकाच नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. येथील डॉक्टर, परिचारिकांची रिक्त पदे भरण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वच्छता आणि जेवणाचे कौतुक
जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता अत्यंत चांगली आहे. कुठेही घाण दिसली नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. रुग्णांना देण्यात येणारे जेवण तपासले, तेसुद्धा चांगल्या दर्जाचे आहे.
Devnath Gandate
Reporter Sakal Newspaper
chandrapur
9922120599
http://kavyashilpa.blogspot.in