चंद्रपुर/प्रतिनिधी:
पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत फिर्यादीचा खुन करणाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दिनांक 31/10/2017 रोजी श्री. गौतम जिल्हा सत्र न्यायाधीश, वरोरा जि. चंद्रपुर यांनी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन शेगाव अर्तंगत दिनांक 10/01/2008 रोजी यातील आरोपी नामे प्रकाश चरणदास नगराळे वय 51 वर्षे. रा. वायगाव जि. ता. वर्धा, याने आपल्या पत्नी फिर्यादीस रामदेगी दाखवतो म्हणुन मोटारसायकलवर नेऊन मौजा रामदेगी जंगल परिसर येथे तिचेवर धारदार शस्त्राने हल्ला करून जिवानिशी ठार करण्याच्या प्रयत्न केला. फिर्यादीच्या अशा तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन शेगाव येथे अप.क्र. 08/2008 कलम 307, 201, 498(अ), 364 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. वसंता गंधारे यांनी पुर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 31/10/2017 रोजी आरोपी नामे प्रकाश चरणदास नगराळे वय 51 वर्ष. रा. वायगाव जि. ता. वर्धा, यास कलम 307 भादंवि मध्ये 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 5,000/-रू दंड न भरल्यास 06 महिने शिक्षा ठोठावली आहे. तर सरकार तर्फे अॅड. श्री. एम.एम. देशपांडे, सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर तर कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा. देशपांडे पोस्टे शेगाव यांनी काम पाहीले आहे.