সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 07, 2017

चंद्रपुरात विविध शाळेत विद्यार्थी दिवस साजरा

चंद्र्पुर /प्रतिनिधी :
भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.चंद्रपूर जिल्ह्यात हा दिवस आज सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला . त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र्यविषयीची जाण सर्व लहान विद्यार्थ्यांना व्हावी , त्यांच्या प्रेरणेतून आदर्श विद्यार्थी घडतील. हा आजच्या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
शहरातील एस पी कॉलेज, जनता महाविद्यालय, खत्री कॉलेज, एफईएस गर्ल्स कॉलेज, माउंट कार्मेल , माउंट कॉन्व्हेंट,यासह अनेक शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात पाळण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या जगताचे आदर्श विद्यार्थी होते. ते आजन्म विद्यार्थी राहिले. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून चांगले आदर्श विद्यार्थी घडावेत हि जनभावना आहे. परंतु शासन स्तरावर सर्व शाळा महाविद्यालयातून हा दिवस साजरा व्हावा, अशी जनतेतून मागणी होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शालेय जीवनाची सुरुवात ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, सातारा येथे त्यांचा शाळा प्रवेश झाला. सुभेदार रामजी मालोजी सपकाळ (बाबासाहेबांचे वडील ) हे सैन्यातून महु येथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी रेल्वे कॉन्ट्रक्टर, सातारा यांच्याकडे खासगी नोकरी पत्करली. त्यानिमित्ताने ते साताऱ्याला वास्तव्यास आले होते. तेव्हा बाल भीमाचे नाव या शाळेत घातले गेले. तो दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. याच शाळेत त्यांंना वर्गाबाहेर बसविण्यात येत होते. पिण्याचे पाणीही सार्वजनिक ठिकाणी पिण्याची मनाई होती. तरीही त्यांनी निमूटपणे शिक्षण घेतले. जातीवादाचे हे चटके सहन करीत त्यांनी विद्याव्यासंगाला सदैव जपले. त्यातून ज्ञान संपादित करून समाजाची व राष्ट्राची सेवा केली. देशात व जगात समाजाच्या अनेक घटकांचे दिवस साजरे केले जातात. परंतु समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक विद्यार्थी याचा कुठलाही दिवस नाही. आता या घटकाची दखल घेतली गेली विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचा दिवस मिळाला आहे. आज देशातील तर उद्या जगातील सर्व विद्यार्थी एकाच धाग्यात गुंफले जातील. विद्यार्थ्यांचा मान-सन्मान होईल, सत्कार होईल. शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या सोबतीप्रमाणे वागण्यासाठी, शिक्षक-विद्यार्थी या नात्यातील तणाव दूर करण्यासाठी एक चांगला दिवस प्राप्त झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवचेतना मिळेल. शिक्षणाची ओढ व ऊर्जा निर्माण होईल. याच दिवसाचे औचित्य साधून आज चंद्रपुरात मोठ्या उत्साहात विद्यार्थी दिवस पाळण्यात आला. विद्यार्थी दिवस उपक्रमांतर्गत सर्व शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्र्तृत्व स्पर्धा,काव्यवाचन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.