सिन्देवाही/ प्रतिनिधी -दि.
3 नोव्हेंबर 2017 रोजी सिन्देवाही वनपरिक्षेत्र कार्यालयावर श्रमिक
एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात
शेतक—यांच्या प्रश्नावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यात वनालगतच्या
शेतक—यांना वनप्राण्यांपासून पिकांची झालेली नुकसान भरपाई द्या. व
सरपणासाठी जळावू लाकूड उपलब्ध करून द्या.
1. रानटी डुक्करापासून होत असलेल्या शेत पिकाची नुकसान भरपाई द्या.
2. शेतक—यांना सरपनासाठी ग्रामपंचायत स्तरावर जळावू लाकूड उपलब्ध करा.
3. वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करा.
4.
सरडपार येथील बांबु कारागीरांना हिरवा बांबू व गॅस कनेक्शन देण्यात यावे.
अशा विविध मागण्या घेण्यात आल्या. मोर्चा शिवाजी चौक ते वनपरिक्षेत्र
कार्यालयावर धडकला. मोर्चात सिन्देवाही तालुक्यातील आंबोली, घोट, चिटकी,
कळमगावा, पळसगाव, विसापूर, जांबसाळा, नवरगाव, अंतरगाव अशा अनेक गावातून
शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी श्रमिक एल्गारच्या
अध्यक्षा अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले की, वन्यप्राण्यांच्या
हैदोसामुळे शेतकरी जागली जाण्यासाठी सुध्दा भीत आहेत. व तूर, तीळ, हळद इ.
कटानमाल लावणेच बंद केले आहे ही त्यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय
उत्पनात नुकसान होत आहे. तसेच वन्यप्राण्यांची वन विभागाने तात्काळ
बंदोबस्त करावा अन्यथा शेतकरी त्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करेल. असा
इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून वन विभागाला दिला. यावेळी श्रमिक एल्गारचे
उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी वनविभागाकडून शेतक—यांवर होत असलेला
अन्याय संघटना कधीच खपवून घेणार नाही. हे यावेळी ठणकावून सांगितले.
वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण गोंड यांना निवेदन देण्यात आला. त्यांनी वरीष्ठ
अधिका—याकडे पाठपुरावा करणार अशी ग्वाही मोर्चेकरूना दिली. श्रमिक
एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम व संचालन रवी नैताम यांनी केले. तसेच
मोर्चात श्रमिक एल्गारची महासचिव छाया सिडाम, संगीता गेडाम, वंदना
मांदाळे, सपना कामडी, अनिल मडावी, अमर कड्याम, राणी भोयर, रेश्मा गेडाम व
इतर सिन्देवाही तालुक्यातील शेतकरी सहभागी होते.