चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारत देश स्वातंत्र झाल्यानंतर काही संस्थानांचे विलीनिकरण करणे बाकी होते. विलणीकरण करण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेव्हा महत्वाची भुमिका बजावली आहे. सन 2014 पासुन केंद्र सरकारने 31 ऑक्टोम्बर या दिवशी ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणुन साजरा करण्याचे जाहीर केले. त्यामुळे संपुर्ण देशभर 31 आॅक्टोंबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर या दिवशी रॅली व 'रन फाॅर युनिटी" यांचे सुध्दा आयोजन करण्यात येऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात येतो.
चंद्रपुर जिल्हा पोलीस दलातर्फे सुध्दा 31 आॅक्टोंबर 2017 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंती निमित्य ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात येऊन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता दिनानिमित्य काढलेल्या रॅलीस गांधी चौक येथुन सुरूवात झाली. सदर रॅलीचे पथसंचलन श्री. एम.व्ही. इंगवले पोलीस उपअधीक्षक(मुख्यालय)चंद्रपुर यांनी केले. या रॅली मध्ये स्थानिक पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालयामधील एकुण 13 अधिकारी, 94 पोलीस कर्मचारी, सीआयएसएफ चे 01 अधिकारी व 30 कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 60 जवान, भवानजीभाई विद्यालय येथुन आरएसपी आणि स्काॅउट गाईडचे विद्यार्थी मोठया संख्येने सहभाग घेवुन पोलीस दलाचे बॅंड पथकाने सुध्दा रॅली चे अग्रभागी राहुन एकात्मतेचा संदेश दिला. सदर रॅली चंद्रपुर शहरातील मुख्य मार्ग गांधी चौक, जयंत टाॅकीज, जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, बस स्टॅंड या प्रमुख मार्गाने येवुन पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.