घुग्गुस /प्रतिनिधी :
घुग्गुस वेकोलि
आणि एसीसी सिमेंट कंपनीतून भंगार चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांना
अटक केली आहे परिसरातील एका कोळसा खाणीतून ओम प्रसाद खिलारे जगन नाईक,
सुशील वाघ आणि असलम शहादतउल्ला कुरेशी यांनी भंगार चोरी केले.या प्रकरणाची
पोलिसात तक्रार करण्यात आली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून या आरोपींना
अटक केली व यांचेकडून दोन लाख 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला एसीसी सिमेंट कंपनी ट्रांसफार्मरचा तांबा चोरन नेल्याप्रकरणी
पोलिसांनी जमला जहीर शेख, सद्दाम मुस्ताक शेख, विजय शाहू थोरला तेजा
कंचला,परवेज इदरीस सय्यद, अनिल वासु वाघ ,दिघेश साहू, सूर्यभान ठाकरे यांना
अटक करण्यात आली आहे