भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री. सुधीर मुनगंटीवार २६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे भूतपूर्व अध्यक्ष, संघाच्या कार्यकर्त्यांशी एकरूप होणारे नेते श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. उच्चविद्याविभूषित सुधीरजी यांनी एम.कॉम., एल.एल.बी., एम.फिल., डी.बी.एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि सार्वजनिक जीवनाला आरंभ केला. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीस पदी निवडून आले. यानंतर लवकरच म्हणजे १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. आता चंद्रपूरच्या लोकांच्या समस्या सोडवणे हेच आपले ध्येय मानून त्यांनी तेथील अनेक सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांचे चंद्रपूरचे सहयोगी असे म्हणतात की, ‘सतत लोकांच्या संपर्कात असणारा व कामामध्ये स्वतःला झोकून देणारा हा एकमेव नेता आहे.’
चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे सतत चार वेळा राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे सुधीरजी १९९५ मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. यावेळी त्यांनी ५५ हजाराचे विक्रमी मताधिक्य मिळविले होते. लगोलग ते भाजपा-सेनेच्या युती सरकार मध्ये पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री देखील झाले. विधीमंडळाचे १९९८ सालचे उत्कृष्ट वक्त्याला दिले जाणारे पारितोषिक सुद्धा त्यांना मिळाले आहे. याखेरीज समाजातील अंध-अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी वैधानिक लढा देणाऱ्यास दिला जाणारा जी.एल.नार्देकर स्मृती पुरस्कार सुधीरजीना मिळाला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेले गोंडवन विद्यापीठ उभे करण्यात सुधीरजींचा मोठा वाटा आहे.
२००९ ते २०१३ या काळात त्यांनी भाजपाचे महाराष्ट्रप्रदेशाध्यक्ष पद भूषविले. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपाचा आलेख उंचावला.

“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२, महाराष्ट्र राज्य | |||||||
स्वीय सहायक - अजय
धवणे(चंद्रपूर) : ०९८२२५६५९२६
ऑफिस-(०७१७२)२५२५८२, २५६०६९ फॅक्स -(०७१७२)२५८८०० |
|||||||
sudhir.mungantiwar@mahabjp.org
|