डास मारण्याच्या रॅकेटमध्ये रिमोट
चंद्रपूर- महावितरणच्या नागपूर परिमंडळातील एका पथकाने छापा घातला आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. एम. जे. खान यांची रिमोट वीज चोरी उघड झाली.
डॉ. खान हे चक्क रिमोटचा वापर करून वीजचोरी करायचे. हा रिमोट त्यांनी डास मारण्याच्या रॅकेटमध्ये लपविला होता. त्यामुळे आजवर कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र, अखेर त्यांची चोरी पकडली गेली.
येथील जिल्हा परिषदेसमोर डॉ. खान यांचे रुग्णालय आहे.
. त्यांनी वीज मीटरची तपासणी केली, तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. वीजचोरी रिमोटने होत होती. तो रिमोट मोठ्या शिताफीने डास मारण्याच्या रॅकेटमध्ये लपविण्यात आला होता. परंतु, महावितरणच्या अभियंत्यांनी तो शोधून काढला. डॉ. खान यांनी 18 हजार 256 युनिटची वीजचोरी केल्याचे उघड झाले. वीजचोरीचे 2 लाख 67 हजार व दंडाची रक्कम 40 हजार रुपये आता डॉ. खान यांना भरावी लागणार आहे. या वीजचोरीमुळे डॉ. खान यांच्यासह शहरातील अनेक वीजचोरांना शॉक बसला आहे.