नागपूर - पारशिवणी तालुक्यातील शिंगोरी येथे वानराच्या शिकारीसाठी पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला. वनाधिकाऱ्यांनी मजुरांच्या मदतीने बिबट आणि वानरास बाहेर काढले.
शिंगोरा येथे प्रकाश सिताराम आसोले यांचे शेत आहे. ते आज शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा आत बिबट आणि वानर पडलेले आढळून आले. पोलिस पाटील मधुकर रांगणकर यांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. पारशिवणीच्या वनपरिक्षेत्राधिकारी एस.आर. जयस्वाल, वनरक्षक के. ए. कोठेकर हे पथकासह दाखल झाले. त्यांनी मजुरांच्या मदतीने दोन्ही प्राण्यांना बाहेर काढण्यात आले. गेल्या दोन दिवसांपूर्वी खापा परिसरातदेखील एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.