चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी शहातील विविध चौकात पत्रकारांची सामूहिक बदनामी करणारे ङ्कलक लावण्यात आले. त्याला परवानगी दिल्याविरुद्ध चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाने महानरगपालिकेचा निषेध केला आहे. असे फलक लावून पत्रकार आणि वृत्तपत्रसृष्टीच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न पत्रकार संघ खपवून घेणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.
दोन ऑक्टोबर रोजी शहरातील वरोरा नाका, गांधी चौक, जटपुरा गेट, गिरणार चौक या परिसरात पत्रकारविरोधी ङ्कलक लावण्यात आले. त्यावरील मजकूर आक्षेपार्ह आणि पत्रकारांना सामूहिक बदनाम करणारा होता. चंद्रपूर शहरात खंडणीखोर पत्रकारांचे नाव सांगा आणि दहा हजार रुपये मिळवा या आशयाचे फलक लागले. या फलकामुळे कोण्या एका पत्रकाराची नव्हे, तर सर्व पत्रकारांची मान शरमेने मान खाली गेली आहे. हे फलक लावण्यासाठी महानगरपालिकेची रितसर परवानगी घेण्यात आली होती. त्यावर एका प्रकाशकाचे नावही लिहले होते. बदनामीकारक फलक लावणा-या आणि त्याला परवानगी देणा-या महानगरपालिकेचा चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाने जारी केलेल्या पत्रकातून निषेध करण्यात आला आहे. पोलिसांनी हे फलक लावणा-या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.