ते येथील दीक्षाभूमिवरील ५७ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळय़ाच्या उद््घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. समारंभाच्या उद््घाटनाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अशोक घोटेकर अध्यक्षस्थानी होते तर मंचावर भदन्त महापंथ महाथेरो, भदन्त विनय बोधीप्रिय थेरो, भदन्त धम्मज्योती, भदन्त आनंद, भदन्त सुमंगल, भदन्त शुद्धारक्षित, संघवंश, प्राचार्य राजेश दहेगावकर, कुणाल घोटेकर, वामनराव मोडक, स्वागताध्यक्ष मारोतराव खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.
धम्मचक्रप्रवर्तन महोत्सवाचा प्रारंभ विश्वशांती व विश्वबंधुत्व वाहन रॅलीने झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाला माल्यार्पण व सामूहिक बुद्ध वंदनेनंतर या भव्य वाहन रॅलीचे जटपुरा गेट मार्गाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातून वरोरा नाका मार्गाने दीक्षाभूमीवर प्रस्थान झाले. यामध्ये समता सैनिक दलाची चार वाहने, शंभर मीटरवर वाहनधारक पायलट, लाउडस्पीकर, आयोजकांची वाहने अशी मिरवणूक होती.
त्यानंतर बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेण्यात आली. या समारंभाचा प्रारंभ तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व सामूहिक बुद्ध वंदनेने झाला. वंदनिय भदन्त धम्मप्रिय थेरो यांच्या हस्ते या समारंभाचे रितसर उद््घाटन झाले.
याप्रसंगी मारोतराव खोब्रागडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भदन्त पाल्लेगम विजिया थेरो म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय होण्यासाठी चिताची शुद्धी आवश्यक आहे आणि ही चिता शुद्धी विपश्यनाद्वारा प्राप्त होते. याप्रसंगी भदन्त विनय बोधीप्रिय थेरो म्हणाले, मनुष्य जीवन सुखमय होण्यासाठी पंचशीलाचे पालन करणे अनिवार्य आहे. जेणेकरून मनुष्याला सुगती प्राप्त होईल. भदन्त संघकिर्ती म्हणाले, आपण फक्त नावाने बौद्ध आहोत. काया, वाचा, मनाने बौद्ध झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त दलित समाजाला दारिद्रय़ातून व अगतिकतेतून बाहेर काढण्यासाठी बुद्धाचा धम्म दिला. भदन्त पद्माबोधी म्हणाले, या देशात निर्माण झालेल्या दहशतवादाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद उत्तर देऊ शकते. संघकिर्ती यांनी बुद्धाचा धम्म माणसाच्या उन्नतीसाठी असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर परिसंवाद झाला. संचालन डॉ. भगत तर आभार डॉ. विजया गेडाम यांनी मानले.