সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 08, 2013

गोमती पाचभाईला अटक

राजुरा : मनी ट्री या कंपनीने शहरातील विविध स्तरातील गुंतवणूकदारांना सुमारे सव्वा करोड रुपयाने गंडा घातला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संचालकांचे अटकसत्र सुरू केले असून या प्रकरणात आता गुंतवणूकदारही अडचणीत येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांकडे हा पैसा आला कुठून, याचाही तपास पोलिसांनी हाती घेतला आहे.
गोमती पाचभाई यांच्या अटकेने अनेक खुलासे होणार असल्याचे संकेत असून तिच्याकडून एजंट म्हणून काम करणारे गुंतवणूकदार आणि त्यांना वेळोवेळी दिलेले कमिशन, सोन्याचे शिक्के यासह अनेक बाबी उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
राजुरा येथील मनी ट्री फायनान्स कंपनीने गुंतवणूकदाराना आकर्षित करुन या कंपनीने गुंतवणूकदाराना आकर्षित करुन या कंपनीचे संचालक कार्तिक डोनीवार आणि विनायक कुकडे यांनी५९ गुंतवणूकदारांकडून २ करोड २१ लाख ८२हजार रुपये घेतले. मात्र मुदतीनंतर ते परत करण्यासाठी टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी राजुरा पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या दोनही संचालकांना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
राजुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी ट्री फायनान्स कंपनीमध्ये अशोक वैद्य तीनलाख, बी. के. घाटे एक लाख, रमेश मोहितकर पाच लाख, विजय सुर्तेकर १८ लाख, बाळू गोंगले आठ लाख २0 हजार, दशरथ धवने पाच लाख, कल्पना पायघन दोन लाख, माया ढोके चार लाख ५0 हजार, स्वप्नील गोवर्धन एक लाख, प्रकाश चहारे एक लाख, सुभाष पावडे एक लाख, रामदास कोंगरे एक लाख, दिवाकर चौधरी दोन लाख, नामदेव चóो तीन लाख, गजानन भोयर तीन लाख, रोशन वाघमारे एक लाख १0 हजार, रंजित गोवर्धन तीन लाख ५0 हजार, चंद्रशेखर करमनकर दोन लाख, अनिल चौखुनडे एक लाख, श्यामला चौखुंडे एक लाख ५0 हजार, कैलाश पारखे ९ लाख ५0 हजार, मधुकर ढवस दोन लाख, दत्तात्रय साळवे दोन लाख, बाळकृष्ण कोटरंगे तीन लाख, सुधाकर कातकर तीन लाख, राजेश्‍वर नारावार चार लाख, मुर्लीधर निमकर दोन लाख, अरविंद ताजने सहा लाख ६0 हजार, वंदेश फुलझेले तीन लाख, ज्योती गहलोत तीन लाख, गजानन घिवे चार लाख, सुजित पोलेवार तीन लाख ५0 हजार, महादेव पडवेकर एक लाख, चारुशिला बुरान पाच लाख, मिलींद देवगडे सहा लाख ५0 हजार, ज्ञानेश्‍वर हिरादेवे आठ लाख, गौतम जुलमे चार लाख, भिमराव उपरे सात लाख, दिलीप निरांजने एक लाख, राजकुमार चिंचोलकर दोन लाख , संदीप लोनगाडगे सात लाख ५0 हजार, अनिल इंदूरकर पाच लाख, वामन जुल्मे सात लाख १0 हजार, गणपत पाटील दोन लाख, अशोक डेरकर ९ लाख ५0 हजार, अलोक खोब्रागडे तीन लाख ५0 हजार, बंडू बावणे सहा लाख, सुजाता जुल्मे एक लाख ६0 हजार, रवीशंकर गायकवाड तीन लाख, अमित कुंभारे एक लाख, अविनाश वाघमारे ९ लाख, चंद्रशेखर बदकुले पाच लाख, सिद्धार्थ राहुलगडे एक लाख, क्रिष्णा खंडाळे एक लाख, सुधाकर मांडवकर एक लाख, सुरज राहुलगडे एक लाख, लटारू चहारे एक लाख, सुरेश गिरडकर एक लाख, प्रितम घटे एक लाख २0 हजार रुपये गुंतविले आहेत. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.