दस-याच्या रावणपूजेवर घेतला आक्षेप : आदिवासींच्या भावना दुखावल्या
चंद्रपूर : पाथरी पोलिस ठाण्यात रुजू झाल्यापासून वादग्रस्त ठरलेले ठाणेदार घुघुल यांची मुजोरी अद्यापही कायम आहे. यापूर्वी अनेकदा तक्रारी झाल्या. वरिष्ठ अधिका-यांनी समज दिली. मात्र, या ठाणेदाराच्या वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नाही. दारुबंदीसंदर्भात आंदोलन करणा-या श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांना अपमानीत करणे, अवैध दारू, जुगार व्यावसायिकांकडून हप्ता वसुली आणि तक्रारकत्र्यांना धमकाविण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत. सावली तालुक्यातील मेहा (बूज) येथील एका महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणातही आरोपींना अभय देण्याचे काम या ठाणेदारांनी केले. शिवाय गावकèयांनी पोलिस पाटलाविरुद्ध निलंबनाची मागणी केल्यानंतर बनावट अहवाल तयार करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप ठाणेदार घुघुल यांच्यावर आहे.
ठाणेदाराकडून आदिवासींचा अवमान
आदिवासी समाजाकडून भगवान रावणाची पूजा दस-याच्या दिवशी केली जाते. यंदा सावली तालुक्यात सम्राट रावण यांच्याबद्दल जनजागृती करणारी पत्रके वाटण्यात आली. मात्र, अनुसूचित जमातीविरोधी असलेल्या पाथरी येथील ठाणेदार घुघुल यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेऊन आदिवासींच्या भावना दुखावल्या. याप्रकारामुळे आदिवासी समाज अपमानीत झाला असून, त्यांच्यावर अॅक्ट्रासिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा जागतिक गोंड सगा मांदी संघटनेने दिला आहे.
दसरा उत्सव हा आदिवासी समाजबांधवांचा मोठा उत्सव असून, या दिवशी मोठ्या प्रमाणात राजा रावण यांची पूजा अर्चना करण्यात येते. यानिमित्त संभाजी कुमरे, महानंदा टेकाम, मारोती उईके यांनी काही पत्रके कार्यक्रमास्थळी वाटप केली. सम्राट राजा रावण त्यांच्याबद्दल समाजात जागृती व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर पाथरी येथील ठाणेदार घुग्घुस यांनी सामदा येथील शाळेचे शिक्षक पी. डी. कुमरे यांना त्यांच्या शाळेत जाऊन धमकावले आणि पोलिस ठाण्यात तातडीने हजर होण्याची सूचना केली. रावणाची पूजा केल्याप्रकरणी ठाणेदारांनी जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकारामुळे आदिवासीबांधवांची मने दुखावली आहेत. त्यामुळे ठाणेदारांवर अॅक्ट्रासिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मानिक सोयाम, धीरज शेडमाके, मनोज आत्राम, मधू मेश्राम, बंडू मडावी, जोतिराव गावळे, मुक्तेश्वर मसराम, अशोक कुळमेथे, पुरुषोत्तम कुमरे यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.