आजपासून प्रारंभ : धम्मचक्र अनुवर्तन सोहळा
चंद्रपूर: येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक, देश-विदेशातील अभ्यासकांचे प्रबोधन यावेळी होणार आहे. त्यासाठी येथील दीक्षाभूमी सज्ज झाली आहे.
समारंभस्थळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ उपलब्ध ठेवण्यात येणारआहे. बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्ममय आनंदाची रुजवण, जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण, धम्मसंबंधित उपयुक्त वस्तुंचे स्टॉल, श्रीलंकेतील बोधीवृक्षाच्या शाखेचे दीक्षाभूमीवरील रोपणातून बहरलेल्या बोधीवृक्षाचे दर्शन हे या समारंभाचे खास वैशिष्ट आहे.
संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. दीक्षाभूमीस्थळी तथागत गौतम बुद्ध व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र उभारण्यात आले आहे.
या समारंभाची जवळपास यारी पूर्णतयारी झाली असून येणार्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभादरम्यान १५ ऑक्टोबरला दुपारी ३वाजता वाहनासह मिरवणूक निघेल. १६ ऑक्टोबरला सकाळी १0 वाजता डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक निघणार आहे. यात बौद्ध बांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) अनुयायांचे जत्थे दाखल धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यासाठी धम्मभूमी परिसरात सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. पुस्तके, मूर्ती व इतर अनेक साहित्यांच्या दुकानांचे स्टॉल लावण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकाही या कामी लागली असून परिसरात स्वच्छता बाळगली जात आहे. सोहळ्यासाठी देशभरातून बौध्द अनुयायांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे. त्यांच्या व्यवस्थेकडे आयोजक सातत्याने लक्ष देऊन आहेत. याशिवाय बाहेरगावावरून आलेल्या बौध्द अनुयायांसाठी सामाजिक संघटनांनी भोजन व पाण्याची व्यवस्था केली आहे. यासाठीही स्टॉल उभारण्यात आले आहे. एकूणच सोहळ्यासाठी धम्मभूमी सज्ज झाली आहे.

- ■ १५ ऑक्टोबरमिरवणूक- दुपारी ३ वाजताधम्म ध्वजारोहण-दुपारी ३.३0 वाजता धम्मसमारंभ उदघाटन-दुपारी ३.४५ वाजतापरिसंवाद-सायंकाळी ६ वाजताजागर भीम संगराचा-रात्री ८ वाजता
- ■ १६ ऑक्टोबरडॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक-सकाळी १0 वाजतासामूहिक बुध्दवंदना/धम्मप्रवचन-दुपारी १२.३0 मुख्य समारंभ-सायंकाळी ५ वाजताभीमा तुला ही वंदना-रात्री ९ वाजता