সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, March 17, 2011

30 एप्रिलला आदिवासी साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा

Thursday, March 17, 2011 AT 12:30 AM (IST)
Tags: tribal sahitya sammelan, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - आदिवासी साहित्य परिषदेच्या वतीने 30 एप्रिल ते दोन मेपर्यंत तीनदिवसीय आदिवासी साहित्य संमेलन शहरात आयोजित करण्यात आले असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बाळकृष्ण रेणके राहणार आहेत.
संमेलनाचे उद्‌घाटन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य परिषदेचे सचिव नेताजी राजगडकर, केंद्रीय राज्यमंत्री अगाथा संगमा, खासदार मारोतराव कोवासे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, "टिंग्या' चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक रोहित नागभिडे, आमदार रामरतन राऊत, रांची विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रामदयाल मुंडा, झारखंडच्या कवयित्री निर्मला पुतुल, महिपाल भुरिया, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, माजी खासदार नरेश पुगलिया उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष प्रेमदास मेश्राम आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात तीन परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन होईल. "आदिवासी काल, आज आणि उद्या' यावर मोहन हिराबाई हिरालाल, देवाजी तोफा, माजी आमदार हिरामण वरखडे, माजी आमदार सुखदेव उईके, चित्रकार विष्णू सलामे, रवी कुलसंगे, महिपाल भुरिया, नागेश चौधरी, अशोक पवार, गुजरातचे जितेंद्र वसावा, लटारू मडावी, सुरेश टेकाम आदी मान्यवर सहभागी होतील. आनंद धुर्वे आणि भारत सलाम यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येईल.
एक मे रोजी "शोध तंट्याभिल्लांचा' यावर प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांचे भाषण होईल. कवयित्री उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात निर्मला पुतुल (झारखंड), बिटिया मुस्मू (दुमका), गोसा पेंटर, हरिराम मीना (राजस्थान), डॉ. नीलकांत कुलसंगे (पुणे), वीरसिंग पाडवी, विश्राम वळवी, डॉ. विनायक तुमराम, प्रब्रह्मानंद मडावी, वामन सेडमाके, सुनील कुमरे सहभागी होतील. या कार्यक्रमाचे संचालन प्रभू राजगडकर करतील.
"आदिवासी भाषा व बोलींचे भवितव्य' या विषयावर परिसंवादात मोतीरावण कंगाली, सीताराम मंडाले, पुष्पा चौधरी सहभागी होतील. "आदिवासी स्त्री' यावर प्रतिभा शिंदे, डॉ. अर्चना मसराम, माधुरी मडावी, उल्का महाजन, सगुणा तलांडी सहभागी होतील. समारोपीय कार्यक्रमाला समाजसेविका मेधा पाटकर उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी वीरसिंग पाडवी राहतील. संबंधित बातम्या


प्रदूषणग्रस्त आठ उद्योगांची बॅंक गॅरंटी जप्त

पोलिस अधीक्षकांनी मागितली माफी

खापरखेड्याच्या विद्युत केंद्रातील ट्रान्सफॉर्मरला आग

चंद्रपुरात रिमझिम पाऊस

दुष्काळाच्या छायेत नाट्य"रंग' हरविले



Thank you.

Your Comment will be published after Screening.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.