CHANDRAPUR: An agitated leopard trapped in a wire snare mauled an ACF involved in the rescue operation on the outskirts of village Pardi in Gondpipri tehsil on Tuesday morning. The ferocious beast managed to snap the wire of the trap and fled with the noose still around its waist, leaving the injured forest officer behind. Injured ACF Harishchandra Kamble is reported to be out of danger.
चंद्रपूर) - जंगली जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात रानडुक्कर अडकले. त्यानंतर या रानडुकराची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्याही या फासामध्ये अडकला. तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांतरही बिबट्याला वनविभागाला जेरबंद करता आला नाही. उलट बिबट्याला पकडण्यासाठी आलेला एक वनकर्मचारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला. ही थराथरक घटना गोंडपिंपरी तालुक्यातील पारडी शेतशिवारात आज (मंगळवार) घडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील तोहोगाव येथे पहाटे चार वाजताच्या सुमाराला गावाजवळून बिबट्याच्या डरकाळ्या गावकऱ्यांना ऐकू येण्यास सुरवात झाली. गावकऱ्यांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला. तेव्हा दिसलेले दृश्य त्यांच्यासाठी धक्कादायक होते. रानडुकराच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या फासात अडकलेला होता. सुरवातीला रानडुक्कर फासात अडकले. त्याची शिकार करताना बिबट्यावर फास आवळला होता. दरम्यान बिबट्याच्या हल्लात रानडुक्कर ठार झाले होते. यानंतर लाठी येथील वनसंरक्षक संजय कोवे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तोपर्यंत पारडी, वामनपल्ली, लाठी, सरांडी, वेजगाव, वेडगाव या गावांत घटनेची माहिती पोचली. या गावातील गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती लाठीचे ठाणेदार गौंड यांना मिळताच सहकाऱ्यांसोबत ते घटनास्थळी पोचले. बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही सुरू झाली. बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन प्रथम देणे गरजेचे असताना वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी बिबट्याला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्या अधिकच चवताळला. कांबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर बिबट्या फासासह शेताच्या दिशेने पसार झाला. चवताळलेला बिबट्या जंगलात न जाता शेताच्या दिशेने गेल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.