সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 27, 2011

250 कोटींच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री येणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, March 27, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: chandrapur, ajit pawar, vidarbha

चंद्रपूर - तीन वर्षांत चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी अर्थसंकल्पात 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निधीतून कामांचे नियोजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार येत्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपुरात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी पत्रपरिषदेत दिली.
वीजप्रकल्पांमुळे बाधित झालेल्या आणि प्रदूषणाची गंभीर समस्या असलेल्या शहरात विकासकामे राबविण्यासाठी पंचशताब्दी वर्षानिमित्त 250 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. यातून प्रदूषणनियंत्रण, पिण्याच्या पाण्याची योजना, जडवाहतुकीसाठी बायपास, शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविणे, बगीचे आणि खेळासाठी मैदाने, बाबूपेठ आणि वरोरा नाका रेल्वे उड्डाणपूल, ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण, पडोली ते राजुरा बायपास मार्ग कोसरा, दाताळा, शिवणी येथून तयार करणे, वर्धा आणि इरई नदीवर तीन ते चार ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारे, रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. जाहीर निधीपैकी 25 कोटी रुपये चालू वर्षात घोषित करण्यात आले, अशी माहिती वैद्य यांनी दिली. पत्रपरिषदेला मोरेश्‍वर टेमूर्डे, शोभाताई पोटदुखे, वामनराव झाडे, दीपक जयस्वाल यांची उपस्थिती होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.