डॉ. प्रतिमा इंगोले यांचे प्रतिपादन
| ||
राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
| ||
चंद्रपूर- दि.२0 : अलिकडे समाज स्वास्थ बिघडत असल्याचे आपल्या अवतीभवती घडणार्या घटनांवरून दिसून येते. महिलांवरील अत्याचार वाढत आहे. सामाजिकदृष्टया ही बाब निश्चितच चांगली नाही. पुरुषांच्या डोळ्यातील विकार नाहिसा करायचा असेल तर ठिकठिकाणी नवी मुक्ताई निर्माण झाली पाहिजे, अशी गरज सुप्रसिध्द कथालेखिका व कादंबरीकार डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केली.
सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे येथील सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलनाचे आज दुपारी ११.३0 वाजता थाटात उद््घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद््घाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. स्वागताध्यक्ष म्हणून किशोर जोरगेवार, शोभाताई पोटदुखे, प्राचार्य जे.ए. शेख, सुर्यांश संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख, सुरेश तालेवार व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी प्रतिभा इंगोले पुढे म्हणाल्या, अनेक पुरुष व्यासपिठावर स्त्रीमध्ये शक्ती आहे असे आवर्जुन सांगतो. मात्र त्याच्या घरीच परिस्थिती वेगळी असते. ती बदलली पाहिजे. समाजातील दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचे सार्मथ्य साहित्यातच आहे आणि असेच साहित्य निर्माण झाले पाहिजे.स्त्रीची सृजणशक्ती हीच मोठी शक्ती आहे. आपली भूमीही सृजणशिल आहे. त्यामुळे बहिणाबाईंनी दोघांनाही आपल्या कवितेत सारखे लेखले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, साहित्यात थकवा दूर करण्याचे ताकद असते. म्हणूनच पूर्वी आजी जात्यावर चार-चार तास दळण दळताना ओव्या म्हणायची. साहित्य आनंद देते, चिंतामुक्त करते, करमणूक करते, मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्कार देण्याचेही काम साहित्यच करते. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक एकाग्र राहू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारे साहित्य निर्माण करावे. |
Sunday, April 21, 2013
Saturday, April 20, 2013

देश घडविण्याचे काम साहित्यातून व्हावे
by खबरबात
आमदार सुधीर मुनगंटीवार ; राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उदघाटन
चंद्रपूर- दुरचित्रवाहिन्यांवर सध्या सुरु असलेल्या मालिकांमुळे समाज स्वाथ्य बिघडत असून, साहित्यिकांनी देश घडविण्याचे काम साहित्यातून करावे, असे आवाहन भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवार दि. 20 रोजी थाटात पार पडले. मान्यवराच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि माता जीवाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी मंचावर भाजपचे आमदार सुधीर मुन्गंतीवार, सम्मेलनध्याक्ष प्रसिद्ध लेखिका व कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले, स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार व सूर्यांश संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख, शोभाताई पोटदुखे, सुरेश तालेवार, विदर्भ साहित्य संघाचे कायकारीणी सदस्य डॉ.जाकीर षेख यांचीही उपस्थिती होती.
शनिवार दि. 20 व रविवार 21 एप्रिल2013 आयोजन प्रसिद्ध लेखिका व कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले यांचे अध्यक्षतेत सरदार पटेल महाविद्यालयात करण्यात आलेले आहे.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, साहित्यात थकवा दूर करण्याची ताकद असते. म्हणूनच पूर्वी आजी घरी काम करताना ओवी म्हणायची. त्यामुळे पहिल्या साहित्यिक महिलाच होत. जेव्हा आई काम करताना गाणी म्हणते, तेव्हा तिचा कामावरील थकवा दूर होतो. त्यासाठी कोणतीही ओषधं घेण्याची गरज पडली नाही. त्यातूनच साहित्यात एकाग्रतेने काम करण्याची जिद्द मिळते, असेही आमदार सुधीर मुन्गंतीवार म्हणाले. स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार म्हणाले, स्त्री षिक्षणापासून सुरु झालेला स्त्रीचा स्वंयभू प्रवास लक्षात घेता 21 व्या शतकाकडे वाटचाल करणारी स्त्री आज स्त्रीशक्तीच्या रुपात वावरतांना दिसते.अनेक क्षेत्र तिने काबीज केले आहे. तिला हे यश मात्र सहजासहजी प्राप्त झाले नाही, तर जिद्द, चिकाटी, संघर्श, कश्ट, प्रायत्न यांची सतत सोबत करीत तिला हे यषोषिखर गाठता आले आहे. तिच्या या प्रवासाचा नागर-ग्रामीण भागातील अलक्षित स्त्रियांना जवळून परिचय घडावा तसेच स्त्री जाणिवंाच्या विविध पैलूवर सशक्त चर्चा करता यावी याकरीता चंद्रपूरातील महाराश्ट्रातील सामाजिक,साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत स्त्री-पुरुशांच्या विचारांची देवाण-घेवाण या संमेलनामागची प्रेरणा आहे. चंद्रपूर शहरात स्त्री साहित्य संमेलन आयोजित केल्याचे म्हणाले.
संमेलनातील कार्यक्रमात विविध विशयावर तीन चर्चासत्र तसेच दोन कविसंमेलन / कथाकथन / सांस्कृतिक कार्यक्रम / अभिरुप न्यायालयाचा समावेश आहे.

राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उदघाटन
by खबरबात
चंद्रपूर- सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवार दि. 20 रोजी थाटात पार पडले. यावेळी मंचावर भाजपचे आमदार सुधीर मुन्गंतीवार, सम्मेलनध्याक्ष प्रसिद्ध लेखिका व कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले, स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार व सूर्यांश संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख, शोभाताई पोटदुखे, सुरेश तालेवार, विदर्भ साहित्य संघाचे कायकारीणी सदस्य डॉ.जाकीर षेख यांचीही उपस्थिती होती.

Thursday, April 18, 2013

शिवसेनेच्या चंद्रपूर जिल्हाप्रमुखांवर तडीपारीची कारवाई
by खबरबात
- बाळू धानोरकर यांच्यावर ६ जिल्ह्यात प्रवेशास मनाई
चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांना मागील निवडणुकीत उत्तम लढत देणारे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना चंद्रपुरसह ६ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या तडीपारीने चंद्रपुर जिल्हयातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये हा आदेश जारी करण्यात आला होता मात्र त्याला धानोरकर यांनी गृहविभाग स्तरावर आव्हान दिले होते. अंतिम निर्णय नुकताच जाहीर झाला असून धानोर्कारांच्या तडीपारीवर गृह विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
बाळू धानोरकर यांचेवर दाखल असलेले २००६ पासूनचे अनेक गुन्हे यासाठी गृहीत धरण्यात आले आहेत. ही कारवाई २ वर्षांसाठी करण्यात आली आहे. बाळू धानोरकर यांच्याविरोधात एकूण २३ गुन्हे न्याय प्रविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यात दरोडा, सरकारी कामात अडथळे, हल्ला, मारहाण , जीवे मारण्याच्या धमक्या, दारुंबंदी , सरकारी मालमत्तेचे नुकसान यासारखे गुन्हे समाविष्ट आहेत. वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर व चंद्रपुर या ६ जिल्ह्यात हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. चंद्रपुर जिल्ह्यात गेले १० वर्षे भद्रावती ही एकमेव नगर परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे. या पालिकेत पुढील ४ महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. त्यासोबतच वर्षभरात विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर ही एक राजकीय घटना असल्याचेही बोलले जात आहे. जिल्हा प्रमुख तडीपार तेही ६ जिल्ह्यातून होण्याची पूर्व विदर्भाच्या शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
या तडीपारीच्या आदेशासह गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील शिवसेना आपल्या पद्धतीने चालविणा-या बाळू धानोरकर यांच्या विरोधातील गट सक्रिय झाला आहे. आता धानोरकर यांची पद मुक्ती निश्चित असल्याने नव्या जिल्हा प्रमुखपदासाठी मोर्चेबांधणी सुरु होणार आहे. या गटातटांच्या लढाईत कोण बाजी मारतो याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

किटाळीच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात ५० वर्षीय महिलेचा बळी ,
by खबरबात
चंद्रपूरच्या जंगलात सलग आठवा मृत्यू -
२२ दिवसातील आठवा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा हल्ला झालाय. शहरापासून जवळच असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील किटाळी या गावात शेतीकामासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्यावर तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गेल्या २२ दिवसाच्या आत वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांची संख्या आता ८ वर पोचली आहे.
बिबट्याच्या हल्ल्याची ताजी घटना शहरालगतच्या किटाळी गावातील आहे. हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर आहे. सकाळी १० च्या सुमारास ५० वर्षीय गोपिका काळसर्पे हि महिला गावातून आपल्या शेतीकामासाठी निघाली होती. काही दूरवर जंगलात गेल्यावर बिबट्याने या महिलेवर थेट हल्ला केला. या भागात गस्तीवर असलेल्या इको-प्रो या वन्यजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही वेळ आधीच या महिलेला जंगलात जाण्यास रोखले होते. मात्र तिने यास नकार दिला. या महिलेचा ओरडा ऐकून वनविभाग व वन्यजीव सदस्य आवाजाच्या दिशेने धावले. या सदस्यांनी महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. व थेट चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात नेले. इकडे लोकांनी या हत्येनंतर सततच्या घटनांना संतापून रस्ता रोको केला. काही काळाने हा बिबट्या याच भागात एका पाईप मध्ये बसून असलेला आढळून आला. लोकांनी या दिशेने चाल केली. लोकांचा गलका वाढल्यावर हा बिबट्या सर्वांदेखत पळून गेला. या घटनेने लोकांचा रोष आणखी वाढला. त्यांनी मिळेल त्या साधनाने जंगलाला आग लावणे सुरु केले.यात सर्वप्रथम बिबट्याला पकडण्यासाठीची जाळी भक्ष्यस्थानी पडली. लोकांचे उग्र रूप पाहून वन विभागाच्या कर्मचा-यांनी पळ काढला. तब्बल ४ तास वन विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळी पोचला नाही.
सध्या किटाळी भागातील जंगल ग्रामस्थांनी लावलेल्या आगीमुळे राख होत आहे.सध्या जंगल व त्यातील वन्यजीव यांना वाचविण्यासाठी या भागात भीतीपोटी एकही अधिकारी ,वन्यजीव सदस्य उस्थित नाही. हल्ल्याची सलग मालिका सुरु असताना वरिष्ठ अधिकारी जंगलात पोचत नाहीत त्यामुळेच रोषात भर पडत आहेत. आता वन्यजीव संघटना या समस्याग्रस्त बिबट्याला गोळ्या घालून संपविण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे.

बिबट हल्ल्यात आणखी १ ठार
by खबरबात
वन्यजीवाच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी जाण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली असून, २५ दिवसात आठवी घटना गुरुवारी घडली. ताडोबा जवळील किटली येथे गोपिका काळसर्पे वय ५० असे मृत महिलेचे नाव आहे.
Wednesday, April 17, 2013

बिबट मृत्यू : दोन जणांना ताब्यात घेतले
by खबरबात
चंद्रपूर- पाइपमध्ये
निमूटपणे बसलेल्या अवघ्या चार महिन्यांच्या बिबट्याच्या बछड्याची गावकऱ्यांनी
जाळूनहत्या केली . या घटनेत एका बछड्याचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला
आहे .जखमी बछड्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी आणण्यात आले. या घटनेमुळे
वन्यजीवप्रेमींच्यावर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात
घेण्यात आले.
गोंदिया
- चांदाफोर्ट रेल्वे मार्गावर रेल्वेखाली येऊन वाघिणीच्या एका बछड्याचा मृत्यू तर
एक गंभीरजखमी झाला . या घटनेला ४८ तास उलटत नाही तोच सावलीजवळील व्याहाड - ब्रह्मपुरी
मार्गावरीलनिफंद्रा बसस्थानकाजवळ घडलेल्या या घटनेने सारेच अवाक् झाले आहेत . निफंद्रा
बसस्थानकाच्याबाजूला आईपासून दुरावलेले बिबट्याचे दोन बछडे लपून बसले होते . आसपासच्या
लोकांना हेमाहिती होताच त्यांनी याठिकाणी एकच गर्दी केली . काही उत्साही लोकांनी
पाइपच्या दोन्ही बाजूकापड आणि इतर कचरा टाकून बंद केल्या आणि दोन्ही बाजूंना आग
लावली . सायंकाळी सुमारेसाडेपाचच्या सुमारास ही घटना घडली . दरम्यान , कुणीतरी
पोलिसांना या घटनेची माहिती दिली .पोलिस घटनास्थळी पोहोचताच लोकांनी घटनास्थळावरून
पोबारा केला . एका बछड्याचा जागीचमृत्यू झाला होता तर एकाला वाचवण्यात पोलिसांना
यश आले . त्यांनी या घटनेची माहितीवनविभागाला दिली. मुख्य वनसंरक्षक बी . एस . के
. रेड्डी ,
सहाय्यक
वनसंरक्षक राजीव पवार व त्यांची चमू घटनास्थळी पोहोचली . अंदाजे चार ते सहा
महिन्यांचे हे बछडे असून , जखमी बछड्याला चंद्रपूर येथील डॉ . कडूस्कर यांच्याकडे
उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे रेड्डी यांनीसांगितले. या घटनेनंतर मादी बिबट या
परिसरात गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे तिचाही या परिसरात शोध
घेतला जात आहे.
जन्मदात्याने पोटच्या दोन मुलांना ठार मारले
by खबरबात
भंडारा- पत्नीशी झालेल्या वादातून संतप्त जन्मदात्याने पोटच्या दोन मुलांना मंगळवारी दुपारी गावानजीकच्या तलावात फेकून ठार मारल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा घडली असून, आज (बुधवार) उघडकीस आली आहे.
पोलिसांनी बुधवारी सकाळी सहा वाजता तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या घटनेची माहिती होताच परिसरातील गावांतील नागरिकांची तलावाच्या काठावर मोठी गर्दी जमली. आरुषी जितेंद्र नेवारे (वय दीड वर्षे) व आयुष जितेंद्र नेवारे (वय तीन वर्षे) अशी मृत बालकांची नावे आहेत. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी आरोपी पिता जितेंद्र नेवारे याला अटक केली आहे.
मध्यप्रदेशातील राणी मोहगाव (जि. बालाघाट) येथील मूळचा रहिवासी असलेला जितेंद्र सुरजलाल नेवारे (वय 28) याचे गर्राबघेडा येथील सुरेखासोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांनंतर जितेंद्र रोजगाराच्या शोधात सासुरवाडी बघेडा येथे आला. तो वर्षभरापासून तेथेच एका वीटभट्टीवर मजुरीचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यावरून पती-पत्नीचे दोन-चार दिवसांनंतर भांडण होत होते. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास जितेंद्र दारूच्या नशेतच मुलांना आणण्यास अंगणवाडी केंद्रात गेला. आरुषी व आयुष या चिमुकल्यांना सोबत घेऊन तो तलावाकडे गेला. दुपारी एकच्या सुमारास त्याने चिमुकल्यांना तलावात फेकून दिले. त्यानंतर तो घरी परतला. मात्र, त्याच्यासोबत मुले दिसली नसल्याने सुरेखाने शोध घेऊन गोबरवाही पोलिसांत तक्रार केली. कुटुंबीय व पोलिस रात्रभर चिमुकल्यांचा शोध घेत होते. मात्र, मद्यपी जितेंद्र काहीच सांगत नव्हता. अखेर बुधवारी पहाटे त्याने मुलांना तलावात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले.
दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसरच्या सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी या आरोपी पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करीत आहेत.

१४ वर्षीय मुलीचा मृत्यू
by खबरबात
21 दिवसात 7 बळी
चंद्रपूर- पासून सुमारे १८ किमीवरील अंतरावर असलेल्या पायली भटाळी गावातील प्रीती बंडू काटकर ही मुलगी सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या शेतात गेली होती. तिथे एका रानटी प्राण्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरातील हा सातवा बळी असून सततच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची कुणकुण लागताच सगळे गावकरी शेतावर धावले. वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली.
ताडोबा येथील प्रथम झोनमधील चोरगाव येथे एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडे सात ते साडे आठच्या दरम्यान, सिंधुबाई पांढरी कोटरंगे ही महिला आपली मुलगी निलीमा सोबत मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष ५८९ मध्ये मोहफुले गोळाकरण्यासाठी गेली. आपले काम करत असताना बेसावध असणा-या दोघींवर एका बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात निलीमा ही जागीच ठार झाली तर तिची आई सिंधूबाई गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर परिसराती नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बुधवारी आडेगाव येथील घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण ठार झाले होते, तेथून हा परिसर केवळ तीन किमी अंतरावर आहे. त्या घटनेनंतर एक बिबट जेर बंद झाला होतापण गेल्या १६ दिवसात बिबट व वाघाच्या हल्यात ठार झालेल्यांची संख्या आता सहावर जाऊन पोहोचली आहे. वन्य प्राण्यांचे वाढलेले हल्ले लक्षात घेऊन वन विभागाचे कर्मचारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांची सतत गस्त आहे. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या दोघांचा जीव घेणाèया हल्लेखोर बिबट्याला गुरुवारी वनविभागाने जेरबंद केले.चंद्रपूरलगत असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अडेगाव येथील तुकारामधारणे हे आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी अगरझरीला आले होता. परत जात असताना झाडाखाली मोहङ्कुले पडलेली दिसली. ती वेचण्यासाठी तो झाडाखाली जाताच त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना अगरझरी आणि अडेगावच्या लोकांना माहीत झाल्यावर लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याच अडेगावातील मालाबाई मुनघाटे ही ६५ वर्षीय वृद्ध महिलाही घटनास्थळाकडे येत होती. घटनास्थळापासून ५० मीटर अंतरावर ती असतानाच झाडावर चढलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. ती जोरानेqकचाळली. घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर ती असल्याने लोकांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तिचा बळी घेतला होता. लोकांची गर्दी बघून बिबट्याने जंगलात धूम ठोकली. एकाच रस्त्यावर दोन तासांच्या अंतराने एकाच बिबट्याने दोघांचा बळी घेतल्याने लोकांमध्ये मोठा असंतोष पसरला होता. त्यामुळे वनाधिकाèयांनी बिबट्याची शोधमोहिम राबवून जेरबंद करण्यासाठी पावले उचलली. गुरुवारी वनाधिकारी राऊत यांनी पिंजरा लावलेल्या ठिकाणी पाहणी केली असता, बिबट जेरबंद झाल्याची बाब उघडकीस आली.
तारीख : गाव : तालुका : मृताचे नाव
२४ मार्च : पालेबारसा : सावली : अनसूया शेंडे
६ एप्रिल सादागड, सावली : धृपदाबाई गजानन मडावी
१० एप्रिल : आगरझरी : मूल : तुकाराम धारणे आणि मालनबाई मुनघाटे
११ एप्रिल : पाथरी : सावली : ललिता आनंदराव पेंदाम
१२ एप्रिल : चारगाव : भद्रावती :निलिमा कोटरंगे
१७ एप्रिल : पायली भटाळी गावातील प्रीती बंडू काटकर

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलीचा बळी
by खबरबात
चंद्रपूर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरातील हा सातवा बळी असून सततच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूरपासून सुमारे १८ किमीवरील अंतरावर असलेल्या पायली भटाळी गावातील प्रीती बंडू काटकर ही मुलगी सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या शेतात गेली होती. तिथे एका रानटी प्राण्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची कुणकुण लागताच सगळे गावकरी शेतावर धावले. वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण असून प्राण्यांच्या हल्ल्यापासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सोनं खरेदीसाठी घाई-घाई
by खबरबात
चंद्रपूर : सोन्याच्या भावात मंगळवारी (ता. १६)
मोठी घसरण झाल्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांनी सराङ्कात मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत
सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव २६ हजार ५००, तर
दुपारनंतर २६ हजार ८०० रुपये एवढा होता. सोन्याच्या भावामध्ये गेल्या पंधरा
महिन्यांत झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. लग्नसराईचे दिवस असतानाच सोन्याने
ङ्कभाव खाणेङ्क सोडल्याने लग्नघरांतील मंडळीच नव्हे तर, इतरही घरांमध्ये सोनेखरेदीसाठी ‘लगीनघाईङ्क
सुरू झाली आहे. त्याचवेळी सोन्यात गुंतवणूक करणारे चिंतेत आहेत. मात्र जाणकार २४ हजारापर्यंत
घसरण झाल्यानंतर सोनं स्थिरावण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
युरोपातील एका बड्या
वित्तसंस्थेने त्यांच्याकडील सोने बाजारात विक्रीसाठी काढल्याने जगभरातील सोन्याचे
भाव कोसळले आहेत. दहा ग्रॅम सोन्याच्या दरात सोमवारी एक हजार २०५ रुपयांची घट झाली
असून, भाव २७ हजार २०० रुपयांवर होता. हाच दर २९ डिसेंबर
२०११ रोजी होता. गेल्या दीड वर्षातील ही सर्वांत मोठी घसरण आहे. ऐन लग्नसराईच्या
मोसमात सोन्याचे भाव उतरत असल्याने वधूपित्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. येत्या
काही दिवसांत घसरण कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे
सराङ्का व्यापारी सुभाष qशदे यांनी सांगितले. सोन्यासोबत
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, ५०
हजार रुपये दर होता. एक एप्रिल रोजी दहा ग्रॅम सोन्याचे दर ३० हजार ३० रुपये होते, तर एक किलो चांदी ५३ हजार ९०० रुपयांवर होती. गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या
दरात दोन हजार ८१०, तर चांदीच्या दरात पाच हजार ४०० रुपयांची
घसरण झाली आहे.
चंद्रपूर मनपाच्या पाणी पुरवठा कार्यालयाची केली नासधूस-तोडफोड
by खबरबात
राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्या उद्दामपणाचे किस्से चर्चिले जात असताना चंद्रपूर शहरात मात्र एक अनोखी घटना उजेडात आली आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शहरातील पाणी पुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. रात्री उशिरा झालेल्या या घटनेत ३ राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता. यातील विशेष बाब म्हणजे तोडफोड करून झाल्यावर या निर्ढावलेल्या कार्यकर्त्यांनी इथे उपस्थित कंपनीच्या कर्मचा-याला चक्क visiting card दिले.
चंद्रपूर शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी मनपाने उज्ज्वल construction कंपनी या खाजगी कंपनीकडे दिली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. शहराच्या काही भागात पाणी पुरवठ्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी येत आहेत. आता त्यावर काही उपाय योजना होत आहेत कि नाही हा प्रश्नच असला तरी त्याची शक्यता कमीच आहे. म्हणूनच कि काय काही राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा जलभवन परिसरात असलेल्या या कंपनीच्या कार्यालयात पोचून कार्यालयाची प्रचंड नासधूस केली. या वेळेस कार्यालयात केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता. मनसोक्त धुडगूस घालुन शिवीगाळ केल्यावर त्यांनी उपस्थित कर्मचा-याला चक्क आपले visiting card दिले. त्यावर संदीप यासलवार ,नेता ,शहर सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस लिहिले आहे. कार्ड वर शरद पवार व अजितदादा यांचे फोटो आहेत. काही वेळातच हे राष्ट्रवादी कार्यकर्ते घटना स्थळावरून पसार झाले. तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धुडगूस मोहीम फत्ते झाली होती.
राज्यातल्या शहरोशहरी -नाक्या नाक्यावर नागरिकांशी अनेकदा असामाजिक तत्वांची गाठभेट होते. त्यांचे कारनामेही चर्चिले जातात. मात्र दंडेली, धुडगूस , तोडफोड , संपत्तीचे नुकसान तेही visiting card सह. काय चाललय हे. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कार्यकर्ते कुणाचा आदर्श ठेवत आहे हे ही तपासण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या सत्ताधारी नेत्यांनी सांगितलेली कामेही प्रशासन ऐकत नाही कि कार्यकर्ते उन्मत्त झालेत हा प्रश्नच आहे. राष्ट्रवादीच्या या visiting card वाल्या गुंडांवर पोलिसांनी गुन्हे तर नोंदविले आहेत. मात्र आबांची पोलिस राष्ट्रवादीचा व्यापक विचार ठेवते कि नेत्यांना वठणीवर आणते याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यात दुष्काळाचे प्रश्न आ वासून पडले असताना स्वतःहून नव्या समस्या निर्माण करणारे हे कार्यकर्ते कुठला आत्मक्लेश स्वीकारणार हे बघावे लागेल.