Wednesday, February 20, 2013

नागपूरमध्ये 25, 26 ला ऍडव्हान्टेज विदर्भ परिषद
by खबरबात
नवी दिल्ली - खनिजसंपदा, पर्यटन, कृषी, पायाभूत सुविधा याबाबत विदर्भाच्या क्षमतेकडे उद्योगविश्वाचे लक्ष वेधण्यासाठी ऍडव्हान्टेज विदर्भ-2013 परिषद होणार आहे. नागपूर येथे 25 आणि 26 फेब्रुवारीला होणाऱ्या या परिषदेत देशभरातील प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यातून किमान 15 हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात अपेक्षित आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज येथे केले.
या परिषदेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्या शिवाय टाटा, महिंद्र, सिंघानिया, जिंदाल आदी उद्योगक्षेत्रातील बड्या कंपन्यांचे प्रतिनिधीही परिषदेला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मोघे यांनी दिली. तीन वर्षांपूर्वी नागपूर शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त "ऍडव्हान्टेज विदर्भ' परिषद घेण्याची कल्पना राबविण्यास प्रारंभ झाला. चुनखडी, कोळसा, डोलामाईट यांसारख्या खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या विदर्भात उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. "मिहान' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाचे कामही 90 टक्के पूर्ण झाले आहे, असेही मोघे यांनी या वेळी सांगितले. विदर्भातील गोरेवाडा व्याघ्र प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पांढरकवडा, भंडारा, गोंदिया या भागात आढळणाऱ्या पट्टेदार वाघांचे संरक्षण करण्यासाठी 1900 हेक्टर क्षेत्रातील प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
Tuesday, February 19, 2013

बल्लारपुरात महिला डॉक्टरची आत्महत्या
by खबरबात
बल्लारपूर : बामणी येथील डॉ. अनुराधा रवींद्र साळवे यांनी मंगळवारी (ता. १९) गळङ्कास
लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
महिला डॉक्टरचे पती गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक
आहेत. काही दिवसांपूर्वीच कार अपघातातून हे कुटुंब बचावले होते. बामणी गावातील सुसंस्कृत,
सुस्वभावी कुटुंब म्हणून
सर्वांना ते परिचित होते. असे असतानाही डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याने सर्वत्र
हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत डॉ. अनुराधाला साडेतीन वर्षांचा आदित्य नावाचा मुलगा
आहे. सकाळी मुलाची शाळेची तयारी त्यांनी करून दिली. सासरे विनायकराव यांनी आदित्यला
शाळेत सोडून दिले. पती रवींद्र आणि त्यांची
आई विश्रांती घेत होते. सासरे विनायकराव आदित्यला शाळेत सोडून आल्यानंतर घरगुती रुग्णालयाचा
दरवाजा बराच वेळ उघडल्या गेला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी आजूबाजूच्या
नागरिकांनी बोलवून दरवाजा तोडला, तेव्हा अनुराधाचा देह पंख्याला लटकलेला दिसला. आत्महत्येचे कारण
अद्यापही कळले नसून, पोलिस तापस करीत आहेत.

तीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार आणि खून
by खबरबात
भंडारा : जिल्ह्यातील लाखनी गावात तीन सख्ख्या बहिणींचे मृतदेह सापडले होते. पण या मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या झाल्याचं वैद्यकीय अहवालात उघड झालं आहे.
नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राजेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. पण याप्रकरणी अजून कुणालाही पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या तीनही बहिणी 14 फेब्रुवारी रोजी शाळेत गेल्या होत्या. मात्र त्या बहिणी घरी परतल्या नाहीत. अखेर 16 तारखेला त्यांचे मृतदेह एका विहिरीत सापडले. त्यानंतर केलेल्या वैद्यकीय अहवालात या मुलींवर बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राजेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. पण याप्रकरणी अजून कुणालाही पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या तीनही बहिणी 14 फेब्रुवारी रोजी शाळेत गेल्या होत्या. मात्र त्या बहिणी घरी परतल्या नाहीत. अखेर 16 तारखेला त्यांचे मृतदेह एका विहिरीत सापडले. त्यानंतर केलेल्या वैद्यकीय अहवालात या मुलींवर बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च करा
by खबरबात
पालकमंत्री संजय देवतळे
चंद्रपूर दि.19- जिल्हा नियोजन समितीने मंजूर
केलेला निधी यत्रणांनी शंभर टक्के खर्च करावा अशा सुचना पालकमंत्री संजय देवतळे
यांनी दिल्या. याच बैठकीत विविध यत्रणांनी
सादर केलेल्या पुनर्विनियोजन प्रस्तावास समितीने मंजूरी प्रदान केली. बचत साफल्य भवनात झालेल्या या बैठकीस खासदार हंसराज अहिर, जिल्हा परिषद अध्यक्ष
संतोष कुमरे, आमदार नाना शामकुळे, अतुल देशकर, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, मनपा
आयुक्त प्रकाश बोखड, अप्पर जिल्हाधिकारी व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी
सी.एस.डहाळकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा
नियोजनच्या नाविण्यपूर्ण योजनेतुन जिल्हयातील विविध विकास कामासाठी निधीची तरतूद
करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी कुस्ती व
कबड्डीच्या मॅट घेण्यासाठी 1 कोटी 31 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. कुपोषित
मुलांची श्रेणीवाढ करण्यासाठी आधुनिक उपकरणे घेण्याच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात
आली. दस्ताऐवजाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी देण्याचे समितीने
मान्य केले. अपंग अधिकारी, कर्मचारी यांना
आधुनिक उपकरण देणे, आधुनिक पध्दतीने रेशन कार्ड तयार करणे व वन्य प्राण्यांचे
संरक्षण करणे तसेच मनुष्य जिवित हानी
टाळण्यासाठी वनविभागाला निधी देण्याचे समितीने मान्य केले आहे. जिवती, पोंभूर्णा व भिसी येथील पशुसंवर्धन
दवाखान्याला श्रेणी 2 मधून श्रेणी 1 मध्ये आणण्याचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला
व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
चंद्रपूर
जिल्हयाच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधरण 2012-13 करीता 130 कोटी नियतव्यय
मंजूर करण्यात आला असून 131 कोटी एवढा निधी अर्थसंकल्पीत झालेला आहे. शासनाकडून 96
कोटी 92 लाख 91 हजार एवढा निधी बिडीएसवर उपलब्ध झाला असून 89 कोटी 91 लाख निधी
वितरीत करण्यात आला आहे. यंत्रणाकडून
विविध योजनावर एकूण 7 कोटी 83 लाख 11 हजार एवढी बचत कळविण्यात आली असून
यंत्रणेच्या मागणीनुसार बचतीच्या मर्यादित तितक्याच निधीचा पुनर्विनियोजन प्रस्ताव
सादर करण्यात आला असून त्यास समितीने मंजूरी
प्रदान केली.
सन
2012-13 या वर्षाकरीता अनुसूचित जाती
उपयोजनेसाठी 49 कोटी 98 लाख निधी अर्थसंकल्पीत झाला. त्यापैकी 38 कोटी 1 लाख 79 हजार रुपयाचा
निधी उपलब्ध झाला असून तो यत्रणांना
वितरीत करण्यात आला. यंत्रणांकडून विविध योजनांवर 3 कोटी 35 लाख 13 हजार एवढी बचत कळविण्यात
आली.
आदिवासी
उपयोजनेसाठी 116 कोटी 30 लाख 92 हजार
नियतव्यय मंजूर असून 112 कोटी 28 लाख 19 हजार रुपयाचा निधी अर्थसंकल्पीत झालेला
आहे. शासनाकडून 91 कोटी 51 लाख 9 हजार
एवढा निधी बिडीएस प्रणालीवर उपलब्ध झाला असून तो यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. यत्रणांकडून विविध योजनांवर एकूण 13 कोटी 68
लाख 42 हजार रुपयाची बचत कळविण्यात आली असून यंत्रणेच्या मागणीनुसार बचतीच्या
मर्यादित तितक्याच निधीचा पुनर्विनियोजन प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास
समितीने मंजूरी प्रदान केली. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी
एम.एम.सोनकुसरे यांनी केले तर आभार सहाय्यक समाज कल्याण आयुक्त मंगेश वानखेडे
यांनी मानले.
Monday, February 18, 2013
चंद्रपुरात चेतले सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञ!
by खबरबात
*३ हजाराच्यावर विद्याथ्र्यांचा सहभाग
चंद्रपूर, १८ फेब्रुवारी
स्वामी विवेकानंद सार्धशती समारोहानिमित्त चंद्रपुरातील विविध शाळांतल्या जवळपास ३ हजारापेक्षा जास्त विद्याथ्र्यांनी एकाच वेळी सामूहिक सूर्यनमस्कार घातले आणि हे महायज्ञ चेतले गेले. या ऐतिहासिक उपक्रमाला विद्याथ्र्यांचा लाभलेला कमालीचा उत्साह आणि त्यांची शिस्त बघून उपस्थित मान्यवरही भारावले.
स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती व शारीरिक शिक्षक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या भव्य पटांगणावर सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, वक्ते प्रशांत आर्वे, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार हंसराज अहिर, आमदार नाना श्यामकुळे, स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य रेखा दरबार, अश्विनी दाणी, अशोक भालेराव, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक वसंतराव थोटे, नगर संघचालक अॅड. रवींद्र भागवत, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, रमेशचंद्र बागला, अभिषेक येरगुडे, प्राचार्य प्रदीप गर्गेलवार, अनुप पाठक, घनश्याम दरबार, पंकज अग्रवाल, राजेश नायडू, अमित उमरे, समितीचे जिल्हा संयोजक नितीन हिरूरकर, नगर संयोजक दीपक देशमुख, शारीरिक शिक्षक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष राजू वनकर, सचिव उमेश पंधरे प्रभृती उपस्थित होते.
भव्य पटांगणावर उपस्थित हजारों विद्याथ्र्यांनी एकाच वेळी मोठ्या शिस्तीत सूर्यनमस्कार घातले. यावेळी सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि त्यापासून होणारे फायदे सांगितले जात होते. सूर्यनमस्कार घातल्यानंतर मान्यवरांनी उपस्थित विद्याथ्र्यांना मागदर्शन केले.
खा. हंसराज अहिर यांनी, उत्तम शिक्षण घेत असतानाच शारीरिक शिक्षणही विद्याथ्र्यांनी घ्यावे, जेणेकरून या देशाची युवा पिठी सुद्दढ आणि बलशाली होईल, असा सल्ला विद्याथ्र्यांना दिला. तर राजेंद्र वैद्य म्हणाले, स्वामी विवेकानंद सार्धशती निमित्त आयोजित सूर्यनमस्कार महायज्ञाचे हे आयोजन विद्याथ्र्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, विद्याथ्र्यांनी केवळ आज एकदा सूर्यनमस्कार घालून थांबू नये, तर ही उत्तम सवय यापुढेही कायम ठेवावी. घनश्याम राठोड यांनीही यावेळी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात केली. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक रवी जोगी यांनी केले. संचालन राम मोहरील यांनी, तर आभार प्रदर्शन भारती नेरलवार यांनी केले. अनंत डेहनकर यांनी वैयक्तीक गीत म्हटले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिवाकर थोटे, विजय यंगलवार, लोकेश सोरते, कपीश उजगावकर, श्रीराम देशमुख, प्रसाद घट्टूवार, राहूल ताकधर, किशोर किरमिरे, वासुदेव कोहपरे, वैभव थोटे, शुभम दयालवार तसेच स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती व शारीरिक शिक्षण शिक्षण महासंघाच्या कार्यकत्र्यांनी परीश्रम घेतले.

by खबरबात
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनरल कामगार सेल च्या विदर्भ प्रमुख हर्शल कुमार चिपळूनकर ची हकालपट्टी

माती गौण खनिज उत्खननाच्या 317 प्रस्तावांना मान्यता
by खबरबात
चंद्रपूर दि.18- माती या गौण खनिज उत्खननासाठी
जिल्हयातील 317 प्रस्ताव पर्यावरण खात्याच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले
होते. या सर्व प्रस्तावांना राज्यस्तरीय
पर्यावरण समितीने 12 फेब्रुवारी 2013 रोजी मान्यता दिली असून ती 31 मे 2013 पर्यंत
असणार आहे.
चंद्रपूर
जिल्हयातील एकूण 317 माती या गौण खनिजाचे प्रस्ताव मुंबई येथे पाठविण्यात आले
होते. त्यात चंद्रपूर 23, बल्लारपूर 14,
गोंडपिपरी 07, पोंभूर्णा 05, सावली 37, मुल 40, भद्रावती 32, वरोरा 20, चिमूर 25,
ब्रम्हपूरी 35, सिंदेवाही 25, नागभिड 43, राजूरा 10 व कोरपना 01 अशा 317
प्रस्तावाचा समावेश आहे. या गौण खनिजाचे
उत्खननाच्या प्रस्तावांना राज्यस्तरीय पर्यावरण समितीने 31 मे 2013 पर्यंत मान्यता
दिली आहे. माती गौण खनिज उत्खननाच्या सर्व्हे क्रमांकाची सविस्तर माहिती www.chanda.nic.in या संख्येत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामधूनच माती या गौण खनिजाची परवानंगी देण्यात
येणार आहे. त्याबाबतच्या
अटी व शर्ती याची सुध्दा सविस्तर माहिती संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

खेडी येथे बोरवेलचे काम अर्धवट करून कंत्राटदार पसार
by खबरबात
सावली - तालुक्यातील खेडी येथे आमदार अतुल देशकर यांचे निधींतर्गत मंजुर बोरवेलचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने गावकÚयांनी अडविल्यामुळे अध्र्यावर सोडुन गाडी परत गेली.
सावली तालुक्यातील खेडी येथे ब्रम्हपुरी निर्वाचन श्रेत्राचे आमदार अतुल देशकर यांचे स्थानिक निधीमधुन स्मशानभुमीत बोरवेलचे काम मंजुर झाले. दिवसभरात गाडी येणार म्हणुन सरपंचासहीत ग्रापंचायत पदाधिकारी वाट पहात
होते. परंतु पि. आर. बोरवेल्सची गाडी मात्र रात्रो 8 वाजताचे सुमारास आली. बोरवेल्सचे काम सुरू करण्यात आले परंतु याकरीता वापरण्यात येणारे पाईप निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे सरपंच परशुराम मर्लावार, उपसरपंच प्रविण गावडे, ग्रा.पं.सदस्य विजय कोरेवार, शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष मारोती कंकलवार,विकास कटकमवार, सुनिल मंगाम, सोमा ओगुवार, सुकरू कंचावार, पुरूषोतम नेरडवार यांनी अंदाजपत्रकानुसार पाईप टाकण्यास सांगुन काम बंद केले. याबाबत फोनवर कंत्राटदारासोबत बोलणे झाले असता सकाळी चांगले पाईप टाकुन देण्याचे मान्य केले परंतु त्याठिकाणी कोणीच नसल्याचे पाहुन काम अर्धवट सोडुन रात्रोच गाडीसह पसार झाले. त्यामुळे चांगले पाईप टाकुन बोरवेल्सचे काम करावे अशी मागणी गावकÚयांनी केली आहे.
सावली तालुक्यातील खेडी येथे ब्रम्हपुरी निर्वाचन श्रेत्राचे आमदार अतुल देशकर यांचे स्थानिक निधीमधुन स्मशानभुमीत बोरवेलचे काम मंजुर झाले. दिवसभरात गाडी येणार म्हणुन सरपंचासहीत ग्रापंचायत पदाधिकारी वाट पहात
होते. परंतु पि. आर. बोरवेल्सची गाडी मात्र रात्रो 8 वाजताचे सुमारास आली. बोरवेल्सचे काम सुरू करण्यात आले परंतु याकरीता वापरण्यात येणारे पाईप निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे सरपंच परशुराम मर्लावार, उपसरपंच प्रविण गावडे, ग्रा.पं.सदस्य विजय कोरेवार, शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष मारोती कंकलवार,विकास कटकमवार, सुनिल मंगाम, सोमा ओगुवार, सुकरू कंचावार, पुरूषोतम नेरडवार यांनी अंदाजपत्रकानुसार पाईप टाकण्यास सांगुन काम बंद केले. याबाबत फोनवर कंत्राटदारासोबत बोलणे झाले असता सकाळी चांगले पाईप टाकुन देण्याचे मान्य केले परंतु त्याठिकाणी कोणीच नसल्याचे पाहुन काम अर्धवट सोडुन रात्रोच गाडीसह पसार झाले. त्यामुळे चांगले पाईप टाकुन बोरवेल्सचे काम करावे अशी मागणी गावकÚयांनी केली आहे.
Sunday, February 17, 2013

महिलांचा सत्तेतील सहभाग तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा-खा. सुप्रिया सुळे
by खबरबात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यास महिलांचा उदंड प्रतिसाद
qसदेवाही, दि.१७ (प्रतिनिधी):
महिलांचा सत्तेतील सहभाग हा समाजातील तळागाळातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महत्त्वाचा ठरला असून त्यातून संपन्न आणि समृद्धीची नवी कृतीशील जाणीव निर्माण झाली आहे. सत्ताकारणातील निर्णय प्रक्रीयेतील सहभाग महिलांच्या वैचारिक अधिष्ठानाचे नवे पर्व ठरले आहे, असे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
qसदेवाही येथील सर्वोेदय महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीच्या महिला मेळाव्याला खा. सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला १५ हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या. खा.सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, देशाच्या विकासात्मक वाटचालीत महिलांच्या कर्तृत्त्वाचा अग्रक्रमाने विचार केला जात आहे, हे अभिमानास्पद आहे. संघटीतपणातून आपले हक्क, प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सक्षमीकरणाचा प्रभावी वापर केला आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण आज वाढले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणातही त्यांनी आघाडी घेतली आहे. कर्तृत्त्वाची यशोशिखरे ती qजकत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच जबाबदारी व प्रामाणिकपणे जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, याची प्रचिती मला गावोगावी महिलांशी संवाद साधतांना येत आहे. महिलांनी आज आपल्या स्वयंभू विचाराचा उपयोग मतदानाच्या माध्यमातून करावा. संघटीतपणातून विकास साधता येतो. यावर महिलांचा विेशास आहे, हे नाकारुन चालणार नाही. २१व्या शतकातील सर्वच क्षेत्रातील वास्तववादी आव्हानांचा स्विकार करण्यासाठी महिलांनी सज्ज व्हावे. महिला बचत गट हे अर्थकारणाचा समर्थ पर्याय त्यांना मिळाला असून त्यामाध्यमातून समृद्धीचा कृतीशील विकासात आपल्या भगिनींनी सामावून घ्यावे व त्यांच्या भल्याचा विचार करावा. मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न मी जाणून घेतले असून ते सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील अनेक नोकरीच्या संधी युवती व महिलांना देण्याबरोबरच qसचनाखाली आलेल्या जमिनी मालकांना न्याय देण्यासाठी मी शासन पातळीवर प्रयत्न करेन.
मा.ना. बबनराव पाचपुते म्हणाले की, महिलांनी हाती आलेल्या सत्ताकारणाचा उपयोग हा जनतेशी मूलभूत प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी केला आहे, हे आपण सर्वांनी मान्य केले आहे. उत्कृष्ट प्रशासन आणि अधिकारांचा प्रभावी वापर करण्याची अभ्यासू शैली महिलांमध्येच उपजत असते. कुटुंबाची सेवा करणारी माऊली देशाच्या सत्तेचा सांभाळ ही तितक्याच जबाबदारीने आणि सामूहिक विचारातून करत आहे, हे तिने सिद्ध केले आहे. समाजातील विघातक शक्तीचा नायनाट करण्यासाठी पुरुषांनीही तिला साथ देण्याची गरज आहे.
मा.ना. अनिल देशमुख म्हणाले की, महिलांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्यात जाऊन समस्या जाणून घेण्यासाठी मा.खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रगतीशील विचारांची चळवळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचा सहभाग हा हाती आलेल्या संधीचे लोकाभिमुख विकासात कसे रुपांतर करता येते याचा आदर्श वस्तुपाठ आहे. शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे रेशqनगचे परवाने महिला बचत गटांना दिले जात असून अन्नधान्याचा अत्यंत विेशासार्हतेने पुरवठा करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. येथून पुढेही शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यात येणार आहे.मा.ना. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, महिलांच्या कल्याणाचा विचार घेऊन मा.ना. शरद पवार यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्याला मूर्तरुपात आणून महिलांना उत्कर्षाची नवी दिशा दिली आहे. आई जगाला प्रेरणेचा आणि सेवेचा संदेश देते आणि जगाला उद्धारत असते. महिला मेळावा म्हणजे qजकण्याची लढाई असून भविष्याचा वेघ घेण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे.
मा.ना. फौजिया खान म्हणाल्या की, महिलांचे प्रश्न हे समाजाच्या मानसिकतेशी व समाजरचनेशी जोडलेले असतात. तीच समाजाची मानसिकता बदलण्याचे काम महिलांच्या संघटीत प्रयत्नातून निश्चित होऊ शकेल. त्यासाठी त्यांनी सशक्त आणि प्रबळ होण्याची गरज आहे. शिक्षण आरोग्य विषयक प्रश्नांविषयी जागरुकता आणि अत्याचाराचा प्रतिबंध यावर महिलांनी लक्ष द्यावे व शासनाच्या योजनांचा अधिकारवाणीने लाभ घ्यावा.
मा.आ. विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, लोकसंख्या वाढीमुळे समाजातील प्रश्नांची समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी प्रबोधनात्मक विचार रुजवण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण हा प्रभावी मार्ग असून त्यातून प्रश्नांची सोडवणूकहोऊ शकते. स्त्री-भ्रुण हत्या, हुंडाबंदी, महिलांच्या महिलांच्या अधिकाराची जाणीव याविषयी विचारमंथन होणे व त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. महिलांनी ‘शिका व संघटीत व्हाङ्क हा विचार आपल्यात रुजवावा व हक्कांसाठी जागरुक रहावे.मा.सौ. सुरेखाताई ठाकरे म्हणाल्या की, समाजातील दाहक प्रश्नांचे स्वरुप जाणून घेऊन त्यावर निश्चित तोडगा काढण्यासाठी विकासाची वाट शेवटच्या तळागाळातील भगिनी पर्यंत नेण्यासाठी मा.खा. सुप्रिया सुळे यांनी महिला मेळाव्याच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून चळवळ उभारली आहे. सामान्य माणूस हा केंद्रqबदू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शेतकरी व दुर्बल घटकांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर युवती व महिला अशा अर्धीशक्तीच्या हक्कांसाठी ही जाणीव यात्रा आहे. त्यातून सर्वांना न्याय मिळवून देण्याचे धोरणाचाच हा भाग आहे, असेही सौ. ठाकरे म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाèयांनी मनोगते व्यक्त केलीत. त्यात राजेंद्र वैद्य, संदिप गड्डमवार, सौ.संचिता मेश्राम, सौ. ज्योती रंगारी, सौ. संगिता आगलावे, सौ. शहजादी अन्सारी, सौ. लता ठाकरे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सौ. अनुराधाताई जोशी म्हणााल्या की,‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारीङ्क या न्यायाने तिने आज जगाला आपल्या कर्तृत्त्वाने नवा विचार कृतीतून दिला आहे. स्त्री वर्गाला उभारी देण्याचे काम समाजसुधारकांनी केले आहे. त्यात मा.ना. शरद पवार यांचे कार्य काळाच्या पुढचे आहे, त्यांचे विचार आपल्याला दिशा देणारे आहे. चंद्रपूरमध्ये पक्षाला कार्यालय हवे आहे औद्योगिक क्षेत्रात महिलांना संधी मिळावी व बेरोजगारी कमी करावी. ग्रामीण व शहरी रुग्णालयात उपचारासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महिलांचे विविध विषय शासनाच्या माध्यमातून तातडीने सुटावेत व काही कायदे नव्याने दुरुस्त करावे याकरीता सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. त्याचे वाचन सौ. कनिजा शेख यांनी केले. (या बातमीसोबत ठरावाची प्रतही आपणास ई-मेल करीत आहोत). या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सुषमा वानखेडे यांनी केले. महिला मेळाव्याच्या आधी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात हुंडा विरोधी नाटीका, पथनाट्य इत्यादी सादर करण्यात आले. त्याला महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास मा.ना. बबनराव, मा.ना. अनिल देशमुख, मा.ना. लक्ष्मणराव ढोबळे, मा.ना. फौजिया खान, मा.खा.सुप्रियाताई सुळे, मा.आ.विद्याताई चव्हाण, मा.सौ. सुरेखाताई ठाकरे, राजेंद्र वैद्य, संदिप गड्डमवार, विेशास ठाकूर, रमेश बंग, सौ. वैशाली नागवडे, सौ. शोभाताई पोटदुखे यांच्यासह सुमारे १५ हजार महिला उपस्थित होत्या.
Saturday, February 16, 2013

पालकमंत्री ना.संजय देवतळे यांचा दौरा
by खबरबात
पालकमंत्री ना.संजय देवतळे यांचा दौरा
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
राज्याचे पर्यावरण, सांस्कृतिक कार्यमत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय देवतळे हे दिनांक १८ व १९ फेब्रुवारी २०१३ रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सोईनुसार वरोराकडे प्रयाण करुन वरोरा येथे मुक्काम राहील. त्यानंतर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा.वरोरा येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर शासकीय विश्रामगृह येथे १०.३० वा.आगमन व राखीव वेळ राहील. त्यानंतर बचत साफल्य भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील आणि बैठक संपल्यानंतर चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
००००
ना.श्रीमती फौजीया खान यांचा दौरा
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
राज्याच्या सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण व अल्पसंख्याक विकास (औकाफसह) राज्यमंत्री ना.श्रीमती फौजीया खान हया दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०१३ रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायं.५ वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर येथे रात्रो ७.२० वा.शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहील.
दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा.शासकीय विश्रामगृह येथे राखी व असून दुपारी १२.०० वा.सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेस महिला मेळाव्यास उपस्थित राहतील आणि सायं.४ वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
२२ रोजी जिल्हा नियोजन समिती निवडणूक
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
जिल्हा नियोजन समिती सदस्यांची निवडणूक २२ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. सदर निवडणूक ग्रामीण निर्वाचन क्षेत्र, मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र व लहान नागरी निर्वाचन क्षेत्र अशा निर्वाचन क्षेत्रात होणार असल्याचे निर्वाचन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
ग्रामीण मतदार संघामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे सर्व निर्वाचित ५७ सदस्य मतदार असणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. मोठे नागरी मतदार संघासाठी चंद्रपूर महानगर पालिकेतील सर्व ६६ सदस्य मतदार आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात मतदान केंद्र आहे. तर लहान नागरी मतदार संघासाठी नगर परिषद भद्रावती, वरोरा, मूल, ब्रम्हपूरी, बल्लारपूर व राजूरा येथील निर्वाचित सदस्य मतदार आहेत. यासाठी तहसील कार्यालय चंद्रपूर येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे असे निर्वाचन अधिकारी सी.एस.डहाळकर यांनी कळविले आहे.
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
राज्याचे पर्यावरण, सांस्कृतिक कार्यमत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय देवतळे हे दिनांक १८ व १९ फेब्रुवारी २०१३ रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सोईनुसार वरोराकडे प्रयाण करुन वरोरा येथे मुक्काम राहील. त्यानंतर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा.वरोरा येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर शासकीय विश्रामगृह येथे १०.३० वा.आगमन व राखीव वेळ राहील. त्यानंतर बचत साफल्य भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील आणि बैठक संपल्यानंतर चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
००००
ना.श्रीमती फौजीया खान यांचा दौरा
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
राज्याच्या सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण व अल्पसंख्याक विकास (औकाफसह) राज्यमंत्री ना.श्रीमती फौजीया खान हया दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०१३ रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायं.५ वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर येथे रात्रो ७.२० वा.शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहील.
दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा.शासकीय विश्रामगृह येथे राखी व असून दुपारी १२.०० वा.सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेस महिला मेळाव्यास उपस्थित राहतील आणि सायं.४ वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
२२ रोजी जिल्हा नियोजन समिती निवडणूक
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
जिल्हा नियोजन समिती सदस्यांची निवडणूक २२ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. सदर निवडणूक ग्रामीण निर्वाचन क्षेत्र, मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र व लहान नागरी निर्वाचन क्षेत्र अशा निर्वाचन क्षेत्रात होणार असल्याचे निर्वाचन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
ग्रामीण मतदार संघामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे सर्व निर्वाचित ५७ सदस्य मतदार असणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. मोठे नागरी मतदार संघासाठी चंद्रपूर महानगर पालिकेतील सर्व ६६ सदस्य मतदार आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात मतदान केंद्र आहे. तर लहान नागरी मतदार संघासाठी नगर परिषद भद्रावती, वरोरा, मूल, ब्रम्हपूरी, बल्लारपूर व राजूरा येथील निर्वाचित सदस्य मतदार आहेत. यासाठी तहसील कार्यालय चंद्रपूर येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे असे निर्वाचन अधिकारी सी.एस.डहाळकर यांनी कळविले आहे.
बंडू धोत्रे यांना संघर्ष सन्मान पुरस्कार
by खबरबात
यावेळी बंडू धोतरे म्हणाले, निसर्गाचा नियम आपण फॉलो करत नाही म्हणून आपल्याला समस्यांना तोंड द्यावे लागते. आज वाघ दुर्मिळ होत असून त्यांना वाचविण्याची गरज आहे. वाघ वाचविण्यासाठी चंद्रपूरबरोबरच राजकीय पातळीवरदेखील प्रयत्न करणार आहे. चंद्रपूर येथील कोळसा खाणीला आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेला विरोध वाघ वाचविण्याचाच एक प्रयत्न होता.
Bandu Dhotre conferred with Sangharsh Sanman
by खबरबात
PUNE: Environment activist Bandu
Dhotre and Nilesh Chhadwelkar, who beat the challenges associated with
disability and became entrepreneurs, were conferred with Sangharsh
Sanman awards by senior social activist Dr Narendra Dabholkar, on
Sunday.
These awards are given every
year to those, who struggle in their life for a cause, in memory of
Muktangan Rehabilitation Centre’s founder, Dr Anita Awachat .
The
awardees Bandu Dhotre and Nilesh Chhadwelkar shared their journey in a
candid chat with psychiatrist Dr Anand Nadkarni, while Dr Anita
Awachat’s niece Rasika Bhagwat on the occasion spoke about her aunt.
Bandu
Dhotre, who is an environment activist and runs an NGO Ecopro in
Chandrapur, has been consistently working for protection of the
environment, particularly the wildlife. Owing to the decreasing number
of tigers, Dhotre said he would focus on the conservation of tiger
habitats in Vidarbha region and also inculcate a sense of conservation
among school students. Similarly, Chhadwelkar also shared how he
overcame the challenge of disability and started his own outsourcing
company.
Activist Dr Narendra Dabholkar
said it is high time everyone worked for an alcohol-free society.
“Awareness, precaution and medication are the steps to achieve an
alcohol-free society. Unless we do away with the prestige attached to
addiction, it is difficult to have an addiction-free country,” Dabholkar
said.
Dr Anita Awachat, who was
suffering from cancer, had worked till the last day of her life for an
addiction-free society. February 10 is observed as Memorial Day to
commemorate her.

