সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 21, 2018

वन्यजीवप्रेमिच्या घरातच सापडला बिबट शिकारी

मानद वन्यजीवरक्षकचा मुलगा निघाला बिबट्याचा मुख्य आरोपी



बिबट शिकारप्रकरणी तीन ताब्‍यात
गोंदिया,दि.२१ः : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केळवद केशोरी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २३३ मध्ये १५ डिसेंबरला बिबट्याची गोळी झाडून शिकार करण्यात आली. या प्रकरणी वनविभागाने तीन आरोपीना ताब्यात  घेतले असून यातील मुख्य आरोपी माजी मानद वन्यजीवरक्षकांचा मुलगा भीमसेन डोंगरवार हा आहे.तर  हेमराज मेश्राम (रा. सुरबन) व मानसिंग नैताम‘ (रा. गंधारी) यांना ताब्यात घेतले आहे.या तिघांनाही २७ पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे
केळवद केशोरीच्या जंगलात १५ डिसेंबरला दोन ते अडीच वर्षांचा बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती होताच वनविभागाच्या अधिकाèयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या वेळी बिबट्याच्या चारही पायाचे पंजे कापून शिकाèयांनी नेल्याचे दिसले.  उत्तरीय तपासणीत बिबट्याची बंदुकीतून गोळी झाडून शिकार केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे वनविभागापुढे शिकाèयांना शोधून काढण्याचे आव्हान होते.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच वनविभागाने हेमराज मेश्राम याला सुरबन येथून तर, मानसिग नैताम याला गंधारी येथील घरून ताब्यात घेतले. या दोघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी भिमसेन डोंगरवार यांचे नाव सांगितले.त्यानंतर वनअधिकारीांनी भिमलेनला धाबेपवनी येथून रात्रीला ताब्यात घेतले.क्याच्याकडून बंदूक व भाला जप्त करण्यात आला.
दरम्यान वनविभागाने आरोपी पकडल्यानंतरही जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रक देऊन चौकशी सूरू असून आरोपी पकडल्यावर माहिती देऊ असे सांगितल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तर वन परिक्षेत्र अधिकारी दर्शना पाटील यांना माहितीकरीता भ्रमणध्वनी केले असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सविस्तर माहिती कळू शकली नाही.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.