সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 20, 2018

21 डिसेंबरला भंडा-यात प्रसारमाध्यम कार्यशाळा


नागपूर/ भंडारा 20 डिसेंबर 2018 केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय भंडारा यांच्‍या सहकार्याने, शुक्रवार दिनांक 21 डिसेंबरला स्थानिक हॉटेल रॉयल प्लाझा येथे ग्रामीण प्रसारमाध्‍यम कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे सकाळी 11 ते सायंकाळी 5.15 या कालावधीत आयोजन करण्‍यात आले आहे.
भंडाराचे जिल्हाधिकारी श्री. शांतनू गोयल (भा.प्र.से.) या कार्यशाळेचे उद्घाटन करतील तर कार्यशाळेचे विशेष अतिथी माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे प्र. संचालक श्री. अनिल गडेकर, याप्रसंगी बीजभाषण करतील.या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत होईल.

उद्‌घाटन सत्रानंतर पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत तीन तांत्रिक सत्रामध्ये 6 व्याख्याने होणार आहेत. दुपारी 12 ते 1.45 दरम्यान होणा-या प्रथम तांत्रिक सत्रामध्ये ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी संवादासाठी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची भूमिका’ या संदर्भात महामेट्रो नागपूरच्या कार्पोरेट कम्युनिकेशन विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्री. अखिलेश हळवे मार्गदर्शन करतील. भंडा-याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. अभिषेक नामदास ‘आपत्ती व्यवस्थापनात प्रसार माध्यमांची भूमिका’ यासंदर्भात मार्गदर्शन करतील. ‘विकास संवादामध्‍ये ग्रामीण पत्रकारांची भूमिका : स्‍थानिक वृत्‍त - राष्‍ट्रीय दृष्टिकोन’ या विषयावर नागपूर येथील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत फिल्ड आऊटरिच ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी डॉ. मनोज सोनोने मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी 2.30 ते 3.45 दरम्यान होणा-या दुस-या तांत्रिक सत्रात , भंडाराचे जिल्हा माहिती अधिकारी श्री रवी गिते, हे‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी वृत्तपत्र व समाज माध्यमांची भूमिका या विषयावर व्याख्यान देतील. ‘ग्रामीण विकासामध्ये वृत्तांकनाचे महत्व’ यावर वर्धा येथील दै. लोकमतचे प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर मुंडे विवेचन करतील. शेवटच्या तांत्रिक सत्रामध्ये पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहाय्यक संचालक श्री शशिन्‌ राय ‘विकास-संवाद आणि पत्र सूचना कार्यालय’ या विषयावर सादरीकरण करतील.
सायंकाळी ४.४० ते ५.१५ दरम्यान प्रतिसाद- संकलन व कार्यशाळेचा समारोप होईल.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.