সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 02, 2018

सत्यपालची सत्यवाणी" हा प्रबोधनात्मक कार्यक्रम ठाणेगांव येथे संपन्न

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):
ठाणेगाव येथे काकडा आरती उत्सव मंडळाच्या वतिने कार्तिक मास निमित्य ता.कारंजा घा. जि.वर्धा येथे रेकॉर्ड गर्दी मध्ये २८ नोहें २०१८ ला रात्री ८.०० वा.जनजागृती साठी जाहीर कीर्तनाचा कार्यकम गेली ५२ वर्षांपासून आजपर्यंत महाराष्ट्रातील लोकप्रियतेचे असलेले सर्व उच्चांक मोडलेले सप्तखंजेरी चे निर्माते राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा मनोरंजनातून प्रबोधनात्मक सत्यपालची सत्यवाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गणेश शिंदे नावाच्या एका व्यसनाधीन युवकाने दारू सोडण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.त्यामुळे महाराजांनी त्याचा सपत्नीक साडी व शाल तसेच पुस्तके सप्रेम भेट देवुन सत्कार केला. कीर्तनातून सत्यपाल महाराजांनी संत तुकाराम,फुले,शाहू,आंबेडकर,गाडगे बाबा,तुकडोजी महाराज यांच्या विचाराची समाजाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे हे सांगितले.तसेच त्यांनी कीर्तनातून देशातील शेतकरी बांधव कसा सुखीहोईल,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा,संघटन,स्त्री भ्रूण हत्या,शैक्षणिक विकास,स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त ग्राम,पॉलिथीन बंदी,घनकचरा वर्गीकरण(ओला सुका),तरून तरुणीं चे निर्णय या विषयांवर जनजागृती केली.यावेळी लहान मुलामुलींना चालु घडामोडीवरील प्रश्न विचारले व उत्तर दिल्यावर त्यांना बक्षीस म्हणून गाडगे बाबा चे अखेरचे कीर्तन,सत्यानाश,

मराठामार्ग,ग्रामगीता ही पुस्तके भेट म्हणून दिली व "वाचालतरवाचाल" हा संदेश दिला.तसेच यावेळी गरजू मुलामुलींना खाऊ म्हणून काही रक्कम भेट दिली.महाराजांनी आपल्या पत्नी निसर्गवासी सुनंदाताई सत्यपाल चिंचोळकर यांच्या स्मरणार्थ -- दारू पिऊन ज्या महिलेचा पती मरण पावला अशा २ ते ३ महिलांचा व रक्तदान केलेल्या महिलांचा कीर्तनामध्ये साडी देऊन सत्कार घेतला जेणेकरून उपस्थित श्रोत्यांना दारू चे वाईट परिणाम कळतील व रक्तदान देहदान अवयवदानाचे महत्व कळावे.त्या महिलांना दारू मुळे होणारे दुष्परिणाम सांगायला लावले.तसेच म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तीचा आई वडील म्हणून शाल देऊन सत्कार केला.कार्यक्रमाला परिसरातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला त्यांच्या किर्तनाला संगीताची 
पेटीवादक गजानन चिंचोळकर ,तबला वादक रामभाऊ तांबटकर,सहकारी सुनील चिंचोळकर व चालक राजू काइंगे यांना साथ दिली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.