मनोज चिचघरे/पवनी भंडारा:
पवनी तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय धानोरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव अशोक पिल्लेवान यांचे अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक अशोक पारधी यांचे प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षिका छाया सोनडवले, शारीरिक शिक्षक राजकुमार नागपूरे, सहाय्यक शिक्षक रवींद्र मोहरकर, शिक्षकेतर कर्मचारी डी. डी. कांबळे व हिरालाल रामटेके उपस्थित होते. विद्यार्थी - विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श दृष्टीसमोर ठेवून अभ्यास करावा. प्रज्ञा, शील, करूणा ही त्रिसूत्री जीवनात अवलंबून आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा असे विचार मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी - विद्यार्थीनींनी गीत सादर करुन श्रद्धांजली अर्पण केली.