पौराणिक मधुपुरीचे झाले मोहपा
गावाची प्राचीन माहिती
प्राचीन काळी येथे दंडकारण्य होते. मोहपा परिसराला वनशील मधुवन म्हणत. येथूनच गरुडाने श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवी मध नेला. त्यामुळे ब्रह्मदेवाने इथे नगर वसेल, त्याला मधुपुरी हे नाव पडेल, त्या गावाजवळून वाहणाऱ्या नदीला मधुगंगा अशी हाक लोक देतील, अशी आकाशवाणी केली, अशी आख्यायिका "मधुपुरी महात्म्य' या ग्रंथात आहे. प्राचीन काळी या गावाला मधुपुरी असे नाव होते. कालांतराने मोहपा असे नाव पडले. कृष्ण काळातील मधुपुरी, तसेच मधुवन हा आसमंतातील प्रदेश व रामायणकालीन श्रीराम प्रभूंचे रामगिरी हे पावन क्षेत्र, ऋषिमुनींची तपोभूमी असलेला हा परिसर आहे.
ब्रिटिश, भोसल्यांची राजवट
मोहपा येथे ब्रिटिश काळात प्रशासकीय व्यवस्था सुरू झाली. 1890 ते 1905 पर्यंत मुकदम रूल, ऑक्टोबर 1905 ते ऑगस्ट 1948 पर्यंत सनिटेशन कमिटी, सप्टेंबर 1948 ते फेब्रुवारी 1953 पर्यंत ग्रामपंचायत होती. त्यानंतर 1953 पासून नगर परिषद अस्तित्वात आली. मोहपा येथे भोसल्यांची राजवट होती. 1857 चे वंगभंग होमरूल, 1902 चे असहकार आंदोलन, 1908चा स्वातंत्र्य संग्राम, 1930-32 ची कायदे भंगाची चळवळ, 1941 चा वैयक्तिक सत्याग्रह, 1942 चे भारत छोडो आदी आंदोलनांत येथील तरुणांनी सहभाग घेतला होता.
रथोत्सव
मोहपा येथ दरवर्षी श्रीराम मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध 14ला कृष्ण रथोत्सव आणि चैत्र शुद्ध 11ला श्रीराम रथोत्सव होतो. सर्वप्रथम रथ मंदिराच्या मुख्य दारातून निघून गावाला प्रदक्षिणा घालतो. यावेळी हजारो भक्तांची गर्दी उसळलेली असते. टाळ-मृदुंगाचा गजर, तरुण-तरुणी एकसारखे पोशाख परिधान करून रथाच्या समोर नृत्य करतात.
भवानी देवी
मधुगंगा नदीच्या किनाऱ्यावर सुमारे 300 वर्षांपूर्वीचे माता भवानी देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी दूरदुरून भाविक माता भवानीच्या भेटीला नवरात्रीत येतात. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने भाविकांची वर्षभर गर्दी असते. ही देवी भवानी तुळजापूरच्या मातेचे रूप असल्याचे सांगितले जाते. येथील नागरी जीवन आल्हाददायक आणि परमेश्वराच्या सहवासात आहे.
दृष्टिक्षेपात
लोकसंख्या - एकूण 6987
क्षेत्रफळ - 5.182 हेक्टर
राष्ट्रीयीकृत बॅंका - 2
नगर परिषद सदस्य - 19
वॉर्ड - 17, प्रभाग 4
पोलिस चौकी - 1
माध्यमिक विद्यालये - 3
कुंटुंबे - 637
जिल्हा मध्यवर्ती बॅंक - 1
महाविद्यालय - 1
कनिष्ठ महाविद्यालय- 1
आरोग्य केंद्र - 1
वीज उपकेंद्र - 1
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - 1
टपाल कार्यालय - 1
पशुवैद्यकीय रुग्णालय - 1
संगणक प्रशिक्षण केंद्रे - 4
व्यापारी संकुले - 5
मंदिरे - 5
दर्गा - 1
मशीद -1
बुद्धविहार - 1
अंपग विद्यालय - 1
समाजभवन - 2
क्रीडा संकुल - 1
बगीचे - 2
व्यायाम शाळा - 1
समस्या यांना सांगा
खासदार कृपाल तुमाने - 9823288322
आमदार सुनील केदार - 9422108360
नगराध्यक्ष समसुदीन शेख - 8421323167
उपनगराध्यक्ष माधव चर्जन - 8308999106
मुख्यधिकारी विद्याधर अंधारे - 07588886005
पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड -7774004565
आरोग्य अधिकारी स्मिता उके - 9922660705
पशुवैद्यकीय अधिकारी बी. डी. कोऱ्हाड -9881409165
ट्रामा सेंटर व्हावे
गावातील व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी, तर नागरिक बाजारपेठेत येतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. परिसरात नेहमी अपघात घडतात. त्यामुळे शस्त्रक्रिया व उपचारासाठी नागपूरलाच हलवावे लागते. शासकीय रुग्णालयात अद्यायावत सुविधा नाहीत. रुग्णवाहिकेला चालक नाही. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. येथे ट्रामा सेंटर सुरू झाल्यास गैरसोय दूर होईल.
मटण मार्केट उघड्यावर
आठवडी बाजारात लाखो रुपये खर्च करून मटण विक्रीसाठी संकुलाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतरही येथील मटण व्यापारी संकुलाच्या बाहेर दुकाने थाटतात. त्यामुळे या परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
गावातच गॅस एजन्सी हवी
मोहप्यासह परिसरातील गावांतील नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. कळमेश्वरला अशोक गॅस एजन्सी आहे. मात्र वेळेवर सिलिंडर उपलब्ध होत नाही. ग्राहकांकडून अधिकचे पैसेही आकारण्यात येतात. त्यामुळे गावातच गॅस एजन्सी देण्याची गरज आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे "अप-डाऊन'
शासकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहिल्यास विकासाची गती वाढेल. मात्र, अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे नगरविकासाकडे दुर्लक्ष होत आहे. शालेय शिक्षक गावात मुख्यालयी राहत नसल्याने अनेक उपक्रम राबविणे अशक्य होत आहे.
प्रवासी निवारा
गळबर्डी येथून पिपळा, सावनेर, खुमारी, मांडवी, मोहगाव येथे जाण्यासाठी बसगाड्या आहेत. त्यासाठी प्रवासी गळबर्डी येथे उभे असतात. त्यामुळे येथे प्रवासी निवारा व्हावा. अनेक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी थांबतात. मात्र, निवारा नसल्याने मुलींची गैरसोय होते.
पशुवैद्यकीय दवाखाना
तेलकामठी, तिष्टी, पिपळा हे तिन्ही पशुवैद्यकीय दवाखाने राज्यस्तरीय असून, येथे पशुधन पर्यवेक्षकाचे पद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे मोहपा पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो. तेलकामठी, तिष्टी, सुसुंद्री, कोहळी, पिपळा येथे मोठ्या संख्येने पशुधन आहे.
पोलिस ठाणे व्हावे
कळमेश्वर पोलिस ठाण्याअंतर्गत मोहपा येथे चौकी आहे. त्यात 30 गावांचा समावेश आहे. परिसरात मोहपा शहर, सुसुंद्री, सवंद्री, कोहळी, मोहळी, डोरली, पारडी, चाकडोह, खैरी, खुमारी, मोहगाव, वाढोडा, बुधला, पिपळा (किनखेडे) ही मोठी गावे आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस चौकीवर कामाचा ताण पडत आहे. चौकीत एकूण सहा पोलिसांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांवर आळा घालण्यात अपयश येत आहे.
मधुगंगा झाली गटारगंगा
मोहपा गावाच्या अगदी मध्य भागातून मधुगंगा नदी वाहते. कधीकाळी स्वच्छ पाणी वाहून नेणारी नदी आता गटारगंगा झाली आहे. गावातील, बाजारातील सांडपाणी, केरकचरा, प्लास्टिक नदीत टाकण्यात येते. नदीच्या आजूबाजूला गुटख्याची दुकाने असल्याने नदीच्या पात्रात प्लास्टिकचे साम्राज्य वाढले आहे.
डुकरांचा त्रास
डुकरांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. येथील राजीव गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावर डुकरांचा हैदोस असतो. त्यामुळे खेळाडूंना त्रास सहन करावा लागत आहे.
बैल बाजार
मोहपा येथील बैल बाजार प्रसिद्ध आहे. श्री भगवती विश्वेश्वरीची चैत्र शुद्ध 1 ते चैत्र पौर्णिमा यात्रा भरत होती. यानिमित्त 15 दिवस बैल बाजार भरायचा. आता दर बुधवारी बैल बाजार भरतो.
बाजारात वाहनतळ
मोहप्यात दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. आसपासच्या गावांतील नागरिक येथे येतात. मात्र, येथे वाहनतळ नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
उद्यानाकडे दुर्लक्ष
गावातील लहान मुले व वृद्धांच्या मनोरंजनासाठी किसन फागोजी बन्सोड उद्यान आहे. मात्र, त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने बागेला अवकळा आली आहे. येथे खेळण्याची कोणतीही साधने नाहीत. नगर परिषदेकडून नूतनीकरणाची गरज आहे.
नागरिकांच्या अपेक्षा
गरिबांना हक्काची मालकी घरे देण्याला प्राधान्य आहे. कार्यरत पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेऊन मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. भविष्यात मोहपा शहरात भुयारी गटार योजनेची निर्मिती करून शहर स्वच्छ करण्यात येईल. हिंदू स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक मेपासून टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येईल.
- समसुदीन शेख, नगराध्यक्ष, मोहपा
मोहपा शहरातील रस्ते खराब झाले आहेत. शहरातील मुख्य रस्त्याचा विकास व चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. मोहपा शहर स्वच्छ ठेवून, शहरात लवकरच हायमास्ट दिवे लागतील. शहरातील उद्यानाचे सौंदर्यीकरण, लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल.
- माधव चर्जन, उपनगराध्यक्ष, मोहपा
स्थानिक नगर परिषद पदाधिकारी विकासापेक्षा राजकारणाला प्राधान्य देतात. त्यामुळे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून त्यांनी विकासकामांना प्राधान्य द्यावे. मधुगंगा नदी सफाई अभियान सुरू व्हावे. त्यामुळे मोहपा शहर रोगराईमुक्त होईल.
- इमेश्वर यावलकर, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक
मोहपा येथील पोलिस ठाण्याची मागणी फार जुनी आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस चैकीत जवळपास तीस गावांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या कायदा व सुव्यवस्था हाताळताना गैरसोय होते. मोहपा शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाची दुरवस्था झाली आहे.
- श्रीकांत येणूरकर, विरोधी पक्षनेते, न.प. मोहपा
शहराच्या मानाने ग्रामीण भागातील विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडत आहेत. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू व्हावीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी टंकलेखन व लघुलेखन यासारख्या गोष्टी आत्मसात कराव्यात. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा केंद्रे व त्यात अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात यावी.
- संगीता प्रसाद पाध्ये
सुजल निर्मल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही ती सुरू झाली नाही. एकात्मिक वस्ती दुरुस्ती व विकास योजनेअंतर्गत अजूनही मुख्य रस्ता पूर्णत्वास गेलेला नाही. नगरात अतिक्रमण वाढलेले आहे. नगराचा सिटी सर्व्हे पाच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला. तोसुद्धा पूर्ण झाला नाही. नगर परिषेदेने 2014 ते 2017 करिता मालमत्तेचे मूल्य निर्धारण करून नव्याने केलेली करआकारणी रद्द करावी.
- ऍड. सागर कौउटकर
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
मोहपा येथील न. प. मालकीच्या महात्मा फुले समाजभवनाचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल. मधुगंगा नदी स्वच्छ करण्याची गरज आहे. युवकांकरिता व्यायामशाळा व क्रीडांगणाचा विकास करण्याची गरज आहे.
- दिलीपराव आनडे, नगरसेवक
गावाच्या पूर्वेकडे दलित दफनभूमी आहे. पण तिथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. दलित दफन भूमीचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- पंजाबराव चापके, नगरसेवक
रखडलेली घरकुल योजना पूर्णत्वास नेणे आव्हान आहे. गरिबांना हक्काचे घर मिळवून देणे ही जबाबदारी आहे. गरिबांकरिता घरकुल देऊन परिसराच्या सौंदर्यीकरणाची कामे पूर्ण केली जातील.
- रशीद शेख, नगरसेवक
मोहपा शहरातील आठवडी बाजाराचा विकास करण्याची गरज आहे. भाजीपाला व धान्य विक्रेत्यांसाठी ओटे हवेत. बैल बाजाराचा विकास करण्यात आला असता तरी शेतकऱ्यांसाठी निवारा, पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग आदी सुविधा उपलब्ध व्हाव्यात.
- कृष्णाजी ढोके, नगरसेवक
पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा योग्य व काळजीपूर्वक वापर केला पाहिजे.
- श्रावण भिंगारे
अध्यक्ष, तालुका सरपंच संघटना