সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 10, 2015

महाऔष्णिक वीजकेंद्रात आग


चंद्रपूर, : चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्रातील विस्तारित प्रकल्पाच्या एका संचातील कूलिंग टॉवरमध्ये आज, सोमवारी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीमुळे आकाशात आणि शहरातील काही भागांवर अक्षरश: काळी छाया पसरली. अग्निशमन दलाने आग एका तासात आटोक्‍यात आणली. आजच्या घटनेमुळे या नव्या प्रकल्पाच्या वीजनिर्मितीस आणखी विलंब लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्र दोन हजार 240 मेगावॉट क्षमतेचे आहे. येत्या काही दिवसांत याची क्षमता आणखी एक हजार मेगावॉटने वाढणार आहे. याच विस्तारित प्रकल्पाच्या पाचशे मेगावॉटच्या दोन संचांचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात या संचातून वीजनिर्मिती होण्याची शक्‍यता आहे. निर्माणाधीन नवव्या क्रमांकाच्या संचाच्या कूलिंग टॉवरमध्ये सोमवारी सकाळी 8.50 च्या सुमाराला आग लागली. बीजीआर कंपनी 180 मीटरच्या कूलिंग टॉवरचे बांधकाम करीत आहे. यामध्ये गरम पाणी थंड करण्याकरिता साधारणत: 13 मीटर उंचीवर पातळ "पीव्हीसी' शीट ठेवलेली असते. या शीटच्या एका कोपऱ्यात ही आग लागली. त्यामुळे कूलिंग टॉवरमधून काळ्या धुराचे प्रचंड लोळ बाहेर निघायला सुरुवात झाली. शहरातील कुठल्याही भागातून हे दृश्‍य दिसत होते. त्यामुळे शहरवासींमध्ये एकच खळबळ उडाली. नेमके झाले काय, याची माहिती सुरुवातीला अर्ध्या तास कुणालाच कळली नाही. त्यामुळे अफवाही जोरात पसरल्या होत्या. दरम्यान, वीजकेंद्राच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. पाच अग्निशमन बंब बोलाविले आणि एका तासाच्या आत ही आग विझविली. मात्र, तोपर्यंत शहरातील अनेक वॉर्डांत हा धूर पसरला होता. तुकुम, बापटनगर, सुमित्रानगर, नगेशनगर या भागात सर्वत्र काळा धूर पसरला होता. पीव्हीसी शीटचे दहा टक्के नुकसान झाले. त्याची भरपाई आता बीजीआर कंपनीकडून करण्यात येणार आहे. या आगीमुळे वीजकेंद्राला कोणताही आर्थिक भुर्दंड बसलेला नाही. प्रकल्पाच्या प्रगतीवरसुद्धा कोणताही परिणाम होणार नाही, असे वीजकेंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे यांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.