वरोरा - तालुक्यातील युवा शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जानेवारीला घडली. शेगाव पोलिस ठाणे हद्दीत येणार्या आबमक्ता (वडगाव) येथील युवा शेतकरी मोरेश्वर निमदेव ठावरी (२८) याच्याकडे पाच एकर शेती होती. वडील म्हातारे असल्याने शेतीचे कामकाज मोरेश्वर सांभाळत होता. मागील तीन वर्षांपासून सतत शेतात नापिकी असल्याने मोरेश्वर विवंचनेत होता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. शेतातील झाडाला मोरेश्वरने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळल्याने शेगाव पोलिसात कळविण्यात आले. मृतकाचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोर्डा घोन्सा येथे नुकताच जुळला होता. मृतकावर बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. शेगाव पोलिसांनी शवविच्छेदनाकरिता मृतदेह वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Thursday, January 01, 2015
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য