সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 13, 2015

चांडक मेडिकलला आग; ५० लाखांचे नुकसान

चंद्रपूर, - जटपूरा गेट लगत चांडक मेडीकलमध्ये मंगळवार, १३ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीच ५० लाखांची औषधी व उपकरणे जळून खाक झाली. ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील मुख्य गांधी चौक ते जटपूरा गेट मार्गावर चांडक मेडिकल आहे. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मेडीकल उघडण्याच्या अगोदर अचानक या दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच संचालक मोहन चांडक यांनी दुकानाकडे धाव घेतली व महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलालासुद्धा माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अवघ्या एक ते दिड तासात ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत मेडिकलमधील ५० लाखांच्या वर औषध जळून खाक झाले होते. चांडक मेडिकल हे शहरातील सर्वात जुने व मोठे मेडिकल आहे. त्यामुळे या मेडिकलच्या दुकानात औषधांचा साठासुद्धा भरपूर प्रमाणात असतो. तसेच जिल्हाभरातील रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, आरोग्य विभाग, महानगरपालिकेला सुद्धा औषध पुरवठा केला जातो. त्यामुळे दुकानातील दुसरा मजल्यावर सर्वत्र औषधांचा साठा आहे. या आगीत हा सर्व साठा तसेच वैद्यकीय उपकरणे जळून खाक झाली. या आगीत किमान ५० लाखांची औषधी जळून खाक झाल्याची माहिती चांडक यांनी दिली

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.