সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 20, 2014

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

इको-प्रोची मागणी-
चंद्रपूरः जिल्हयातील वनक्षेत्रालगतच्या गावात बिबट-मानव संघर्षा दरम्यान पकडण्यात आलेल्या बिबटयांना छोटया ‘ट्रॅप केज’ मधुन मोठया पिंज-यात ठेवण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी वनविभागाकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्हयातील बिबट-मानव संघर्ष दरम्यान वेळोवेळी या संघर्षास कारणीभुत असणाÚया बिबटयाना पिंजरे लावुन पकडयात येतात. यापुर्वी 2013 उन्हाळयात बफर क्षेत्रात आणि चंद्रपूर वनविभाग अंतर्गत किटाळी-भटाळी येथे बिबट-मानव संघर्ष निर्माण झाल्यानंतर 5 बिबटयांना पकडण्यात आले होते. त्यापैकी उपद्रवी असणारे 3 बिबटयांना कायमस्वरूपी पिंजरा जेरबंद करून ठेवण्यात आलेले आहे. यावर्षी सुध्दा मामला, अडेगांव येथील दोन बिबटयांना जेरबंद करण्यात आलेले आहे. सदर बिबटयांचा हल्लात मनुष्यहानी झाल्याने यांना परत निसर्गमुक्त करण्यात येणार नाही आहे.
अशाप्रकारे ताडोबा बफर अंतर्गत 3, ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत 2, चंद्रपूर वनविभाग अंतर्गत 1 व एफडीसीएम अंतर्गत 1 असे एकुण 7 बिबट पिंजरा जेरबंद आहेत. यांना ज्या पिंजÚयात जेरबंद करण्यात आलेले आहे त्याच पिंजÚयात ठेवण्यात आलेले आहे. सदर पिंजरे हे बिबट पकडण्यासाठी वापरात येणारे ‘ट्रॅप केज’ असल्याने यात बिबटयांचा हालचालीवर मर्यादा येतात. एनटिसीए च्या मार्गदर्शक सुचनेनुसार एखादया बिबटयास 1 महीन्यापेक्षा अधिक काळ किंवा कायमस्वरूपी बंदीस्त ठेवण्यात येणार असल्यास त्यासाठी वेगळी व्यवस्था करणे गरजेचे आहे. सदर बिबटयांना मोठया पिंजÚयात स्थानातरीत करण्याच्या मागणीकरीता इको-प्रो तर्फे यापुर्वी सुध्दा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. एप्रील 2014 निवेदन सुध्दा देण्यात आलेले होते.
याबाबत 27 जुन 2014 च्या जिल्हा व्याघ्र कक्ष समीतीच्या बैठकीत मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी सदर मुददा ठेवला असता याबाबत समीती अध्यक्ष तथा पोलीस अधिक्षक यांनी सर्व वनविभागांना असे मोठे पिंजरे तयार करण्याचा सुचना दिलेल्या आहेत. परंतु, अदयाप मोठे पिंजरे तयार करण्याच्या दृष्टीने कुठलीच कार्यवाही न झाल्याने इको-प्रो संस्थेच्या बैठकीत याबाबत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतचे पत्र क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर, महाव्यवस्थापक, वनविकास महामंडळ, चंद्रपूर, उपसंचालक, बफर व विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांना देण्यात आलेले आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.