चंद्रपूर : देसाईगंज (वडसा) येथील लोकजागृती नाट्यरंगभूमीचा कलावंत अनिरुद्ध वनकर याला मद रिअल हिरोम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात तो डॉ. आमटेंचा सहकारी म्हणून भूमिका वठवेल.
रविवारपासून चित्रपटाच्या चित्रीकरणास हेमलकसा येथे प्रारंभ झाला. झाडीपट्टीतील हिरो असलेले अनिरुद्ध वनकर हे नाट्य निर्माता, लेखक, दिग्दर्शक व उत्कृष्ट कलावंत असल्याने त्यांच्या नाटकाला विदर्भातील रसिकांची पहिली पसंती असते. श्री. वनकर यांना सुप्रसिद्ध कलावंत नाना पाटेकर यांच्या समवेत काम करण्याची संधी आता स्वजिल्ह्यातच उपलब्ध झाली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम अशा जिल्ह्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त आता मागील दोन दिवसांपासून बॉलिवूडमधील मंडळींचे मुंबई महामायानगरीतून विशेष अशा हेलिकॉप्टरने आगमन होत असल्याने जिल्ह्यातील बालगोपालासंह आबालवृद्धांनाही आकाशाकडे बघण्याचा मोह राहवत नाही अशी स्थिती दिसत आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच हा चित्रीकरणाचा उपक्रम होत असल्याने दक्षिण व पूर्व विदर्भातील कलावंत जगताचे लक्ष या ङ्कद रिअल हिरोङ्क या चित्रपटाकडे लागले आहे. भामरागडच्या शेजारीच हेमलकसा या अतिदुर्गम भागात जंगल परिसरात गेल्या जवळपास चाळीसेक वर्षांपासून आमटे परिवार लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्यासाठी झटत आहेत. डॉ. बाबा आमटेंपासून हे कार्य सुरूच आहे.
कधी काळी वीज, शिक्षणासह आरोग्याच्या सुविधाही न पोहोचल्याने वानरांसारखे प्राणी मारून खाणाèया आदिवासींना या आमटे दाम्पत्याने माणसाप्रमाणे जगायला शिकविले. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. सारा परिसर बदलून टाकला.
जे आदिवासी कधीकाळी प्राणी मारून खात, तेच आता बिबट्या, अस्वल, मगरी, मोर, हरणे, सांबर, शेकरू, कासव, विविध प्रकारचे साप उपचारासाठी इथे आणू लागले. हे छोटे मोठे प्राणी आता या ठिकाणी रमले आहेत. आमटे परिवाराचे जणू सदस्यच बनले आहेत. परिवारातही छोटी मुले सुद्धा त्यांची काळजी घेताहेत. ही मंडळी जवळपास येत असल्याचे जाणवताच, भेटीसाठी उतावीळ बनल्याप्रमाणे धावतच येतात. आणि वातावरणात एक आगळेच चैतन्य निर्माण होते.
या अनुभवाने भारावलेल्या डॉ. समृद्धी पोरे यांनी डॉ. प्रकाश आमटे ङ्कद रिअल हिरोङ्क या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गायकवाड यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांबरोबरच अनिरुद्ध वनकर सारख्या झाडीपट्टीतील नावाजलेल्या कलावंतांसह अन्य शंभरावर कलावंतांना या चित्रपटात भूमिका करण्याची संधी लाभणार आहे.