সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 30, 2012

मनपातील ग्रंथपालाला 'डायरेक्ट टू होम सर्विस'

चंद्रपूर। नळ असूनही पाणी नसल्याने तहान भागविण्यासाठी शहरातील अनेक नागरिक आजही वणवण भटकंती करीत आहे. मात्र नोकरीने मनपाच्या ग्रंथालयात ग्रंथपाल असलेल्या आणि जलतरणपटू म्हणून कोचिंग घेणार्‍या एका कर्मचार्‍याच्या घरी पाणीपुरवठा करणार्‍या संस्थेची खास मेहरबानी दिसून येत आहे. 'डायरेक्ट टू होम सर्विस' मिळत असल्याने या कर्मचार्‍याच्या इमारतीवरील टाकीपर्यंत मुबलक पाणी मिळत आहे.
एका राजकीय पक्षाशी जवळीकता साधून बसलेला हा कर्मचारी पालिकेच्या हुतात्मा स्मारक वाचनालयात ग्रंथपाल आहे. ग्रंथपाल म्हणून काम बजाविण्यासाठी वेळ नसला तरी वर्षभर जलतरणपटू म्हणून व्यावसायिक कोचिंग घेण्यासाठी भरपूर सवड आहे. त्यामुळे विविध सामाजिक, क्रीडा, वाचनालयाच्या समितीवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचार्‍याचे निवास पठाणपुरा मार्गावरील जैन भवनाच्या मागे असून टोलेजंग इमारत आहे. पाण्यासाठी घरी बोअरवेल किंवा विहीर अशी कोणतीही खासगी व्यवस्था नाही. असे असतानादेखील तीन मजली इमारतीवर नळाचे पाणी जाते कसे, हा संशोधनाचा विषय आहे. यासंदर्भात शहानिशा केली असता गौडबंगाल दिसून आले. मनपाच्या खासगी संस्थेमार्फत येणारे पाणी नळाद्वारे येते. मात्र ते पाणी माठ, गुंड, बादलीत भरण्याची कोणतीही गरज भासत नाही. कारण मनपाच्या कर्मचार्‍यांनीच भूमिगत व्यवस्था करून दिली आहे. त्यामुळे नळाद्वारे आलेले पाणी मोटारपंपाच्या माध्यमातून तीन मजलीवर चढते. हा प्रकार गुन्ह्यास पात्र आहे. मात्र भूमिगत व्यवस्थेमुळे कुणालाच काही कळत नाही. पाण्यासाठी घरी खासगी व्यवस्था नसताना देखील त्यांच्या घरात सांडेपर्यंत पाणी उपलब्ध असते. या कर्मचार्‍याला कुणाची तरी मेहरबानी आहे, हे सुद्धा यावरून दिसून येत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.