चंद्रपूर - ताडोबातील वाघांच्या शिकारीसाठी आता आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीने ताडोबाच्या बफर झोनमधील एका वाघाला ठार मारले; तर दुसऱ्याला जायबंदी केले. ताडोबालगतच्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील गोंडमोहाडी कक्षात ही घटना गुरुवारी (ता. 27) रात्री उघड झाल्यानंतर वन विभागात मोठी खळबळ उडाली. या घटनेमागे मध्य प्रदेश आणि हरियानात सक्रिय असलेल्या बहेलिया आणि बहुरिया टोळीचा हात असल्याचे ठराविक बनावटीच्या फासावरून स्पष्ट झाले. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात पन्नासवर पट्टेदार वाघ आहेत. बफर झोनमध्येही त्यांचा वावर आहे. याच प्रकल्पाला लागून चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रांतर्गत गोंडमोहाडी हे गाव येते. तेथे वनसंरक्षक गस्तीवर असताना शिकारीची घटना उघडकीस आली. | संबंधित बातम्या |
devgandate@gmail.com