सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - गावातील नाटकाच्या रंगमंचावर अभिनय साकारणाऱ्या कलावंताला कधीतरी चंदेरी दुनियेत काम करण्याचे स्वप्न असते; मात्र ते पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुंबईवारी करूनही पदरी निराशाच येते. तथापि, गुणी कलावंत खचत नाही. असाच एक कलावंत आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटांतून प्रेक्षकांपुढे येत आहे. झाडीपट्टीच्या प्रेक्षकांवर छाप पाडणारा अनिरुद्ध वनकर याला यंदा तीन चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.
यंदा त्याला तीन चित्रपटांत संधी मिळाली आहे. "ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते अनिल पत्याणे असून, कथा आणि दिग्दर्शन प्रकाश पांचाळ यांचे आहे. या चित्रपटात आनंद अभ्यंकर, डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, मंजूषा गाडगे, शांता तांबे, अभिषेक कुळकर्णी आदी कलावंतांसोबत अनिरुद्ध वनकर काम करीत आहे. हा चित्रपट मुंबई शहरातील एका सत्य घटनेवर आधारित असून, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या बॉम्बस्फोट प्रकरणावर याचे चित्रीकरण आहे.
प्रतिक्रिया
devidas sampat dange
Thursday, June 30, 2011 AT 12:45 AM (IST)
Tags: drama, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - गावातील नाटकाच्या रंगमंचावर अभिनय साकारणाऱ्या कलावंताला कधीतरी चंदेरी दुनियेत काम करण्याचे स्वप्न असते; मात्र ते पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुंबईवारी करूनही पदरी निराशाच येते. तथापि, गुणी कलावंत खचत नाही. असाच एक कलावंत आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटांतून प्रेक्षकांपुढे येत आहे. झाडीपट्टीच्या प्रेक्षकांवर छाप पाडणारा अनिरुद्ध वनकर याला यंदा तीन चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.
महाविद्यालयाच्या स्टेजवर भीमगीते सादर करून आपल्या गोड गळ्याचा सूर ऐकविणारा अनिरुद्ध 15 वर्षांपूर्वी नाटकांत आला. झाडीपट्टीत त्याचे नाव गाजले. खेड्यातील प्रत्येक मुलाच्या तोंडात त्याचे नाव आहे. त्याने गायिलेली गाणी आजही ग्रामीण भागात सीडी प्लेअरद्वारे ऐकवली जातात.
झाडीपट्टीच्या रंगभूमीत नाट्यकलावंत, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक अशी पंचरंगी ओळख निर्माण करणारा अनिरुद्ध वनकर आता चित्रपटसृष्टीतही झळकू लागला आहे. त्याने झाडीपट्टीच्या रसिकांना अनेक नाटकांतून अभिनयाची चुणूक दाखविली; मात्र त्याचे स्वप्न होते ते एखाद्या चित्रपटात काम करण्याचे. "सह्याद्री'वरील "तिसरा डोळा' या मालिकेत त्याला काही भागांत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर "कुलस्वामिनी' या मालिकेतही संधी मिळाली. सध्या सह्याद्रीवर सुरू असलेल्या "अग्निपरीक्षा' मालिकेत अनिरुद्ध खलनायकाची भूमिका साकारत आहे. यंदा त्याला तीन चित्रपटांत संधी मिळाली आहे. "ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते अनिल पत्याणे असून, कथा आणि दिग्दर्शन प्रकाश पांचाळ यांचे आहे. या चित्रपटात आनंद अभ्यंकर, डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, मंजूषा गाडगे, शांता तांबे, अभिषेक कुळकर्णी आदी कलावंतांसोबत अनिरुद्ध वनकर काम करीत आहे. हा चित्रपट मुंबई शहरातील एका सत्य घटनेवर आधारित असून, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या बॉम्बस्फोट प्रकरणावर याचे चित्रीकरण आहे.
प्रतिक्रिया
devidas sampat dange
शाब्बास अनिरुध्द. तुझी चिकाटी हेच तुझ्या यशाचे गमक आहे.