सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 13, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: chandrapur, officer, vidarbha
चंद्रपूर - ग्रामीण भागांतील मजुरांना मुबलक काम मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी तालुके दत्तक घेतले आहेत. जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्याकडे सिंदेवाहीची जबाबदारी आहे.
राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 305 कामांवर 24 हजार 168 मजूर कामाला आहेत. दरम्यानच्या काळात रोजगार हमी योजनेनुसार कामेच उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मजुरांनी केल्या. शिवाय स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून कामाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. या कामात गती यावी आणि मजुरांना नियमित काम उपलब्ध व्हावे, यासाठी मुख्य सचिवांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना तालुके दत्तक घेऊन जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रोजगार हमीच्या कामासाठी अधिकाऱ्यांना तालुके दत्तक दिले आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांकडे सिंदेवाही तालुका आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे यांच्याकडे मूल, उपजिल्हाधिकारी दामोधर नाने यांच्याकडे गोंडपिंपरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नामदेव वटी यांच्याकडे पोंभूर्णा, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे कोरपना, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राठोड यांच्याकडे ब्रह्मपुरी, वरोऱ्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी उमेश काळे, नागभीडची उपविभागीय अधिकारी संदूरवार, राजुरा मेश्राम यांच्याकडे, तर सावलीची जबाबदारी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर यांच्याकडे आहे. तालुक्याचे पालक या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना कामाची पाहणी करणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून कामाला मान्यता मिळवून देणे, तांत्रिक मान्यता घेणे आदी कामे आहेत. जिल्ह्यात सध्या 305 कामे असून, यात पांदण रस्ते, साठवण तलाव, कृषी विहीर पुनर्भरण, मजगी शेततळे, जलसंधारण आणि सिंचन विभागातील कामे करण्यात येत आहेत.
कामांत गती
मागील आठवड्यापर्यंत कोरपना तालुक्यात एकही काम नव्हते. मात्र, तालुका दत्तक दिल्यापासून कामात गती आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभू राजगडकर यांनी दोनदा बैठका घेऊन दोन कामे सुरू केली आहेत. शिवाय सिंदेवाही, ब्रह्मपुरीतही गती आली आहे.