सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 19, 2011 AT 07:03 PM (IST)
Tags: Gadchiroli, cobra, crpf, naxalites
गडचिरोली - येथील कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत "कोब्रा' या विशेष दलाचे 3 जवान शहीद झाले असून सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, या चकमकीत किती नक्षलवादी ठार झाले याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास खोब्रोमेंढा जंगलात नक्षलवादी आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये भीषण धुमश्चक्री उडाली. यात कोब्राचे 3 जवान शहीद झाले असून सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, चकमकीनंतर नक्षलवादी ठार झालेल्या सहकाऱ्यांचे मृतदेह सोबत घेऊन जात असल्याने किती नक्षलवादी ठार झाले याचा आकडा कळालेला नाही.
शहीद झालेल्या जवानांमध्ये महेंद्र सिंग (पंजाब) याचा समावेश असून इतर दोन जवानांची नावे कळु शकली नाहीत. जखमी जवानांची नावे खालीलप्रमाणे - अरुणकुमार मार्कंडे (राहुरी, जिल्हा नगर), सतीश शिंदे (जळगाव), अशोक कावरे (भंडारा), राजेश पटेलिया (गुजरात) आणि योगेशकुमार प्रसाद (दिल्ली) .