সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, August 12, 2010

ग्रामपंचायत निवडणुकांचा भार लिपिकांच्या खांद्यावर

अग्रोवन मुख्य पान


Thursday, August 12, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: agro, chandrapur, grampanchyat election
चंद्रपूर - नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांसारखी 45 अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लिपिकांना निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडावी लागत आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्‍यांतील 651 ग्रामपंचायतींच्या निवडणुका तोंडावर असून, हा भार लिपिकांना पेलावा लागत आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पंचवार्षिक कालावधी पूर्ण होणाऱ्या 651 ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यांत होऊ घातल्या आहेत. पहिल्या (22 ऑगस्ट) व दुसऱ्या टप्प्यात (5 सप्टेंबर) अनुक्रमे 325 आणि 326 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी अधिकारी सांभाळतात; मात्र तब्बल 45 पदे रिक्त असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
उपजिल्हाधिकारी जाधव यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी एम. एच. सोनगावकर यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. त्यामुळे हे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. अतिक्रमण विभागाचे उपजिल्हाधिकारी बावणे यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी महिन्याभरापासून नवीन नियुक्ती करण्यात आली नाही. भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. येथेही एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. उपजिल्हाधिकारी पदाच्या सहा जागा रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाज हाताखालच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. तहसीलदारांच्या सहा जागा रिक्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, सामान्य प्रशासनातही रिक्त जागा आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांचा कारभार प्रभारी तहसीलदारांच्या खांद्यावर आहे. नायब तहसीलदारांच्या सर्वाधिक 33 जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील कामकाज खोळंबले आहे. मोठ्या तालुक्‍यात नायब तहसीलदारांच्या चार, तर छोट्या तालुक्‍यात तीन जागा मंजूर आहेत. ब्रह्मपुरी तालुका वगळता बहुतांश तालुक्‍यांत केवळ एक ते दोन नायब तहसीलदार कार्यरत आहेत. ब्रह्मपुरीत नायब तहसीलदारांची चार पदे मंजूर असून, ती भरण्यात आली आहेत. चंद्रपूरसारख्या जिल्ह्याच्या मुख्यालयी केवळ सात जागा मंजूर असून, त्यापैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत. मूल तालुक्‍यात चारपैकी दोन, सावलीत दोन, राजुरा, कोरपना, जिवती येथे तीन, गोंडपिंपरी एक, पोंभुर्णा दोन, बल्लारपूर दोन, सिंदेवाही तीन, नागभीड दोन, चिमूर, भद्रावती, वरोरा येथे प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत. या रिक्त पदांचा कार्यभार लिपिकवर्ग सांभाळत असून, निवडणुकीच्या कामाचा बोजा त्यांच्यावर आला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरणे सुरू आहे; मात्र लिपिकांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात न आल्याने अनेक चुका होण्याची भीती राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

http://www.agrowon.com/

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.