সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 24, 2010

तरुणांनी केली 300 कुष्ठरोगीबांधवांची कटिंग-दाढी

Tuesday, August 24, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: social work, youth, malnutirican, chandrapur, vidarbha
सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - साठ वर्षांच्या कालवधीमध्ये आनंदवन येथे बाबा आमटे यांनी कुष्ठरोगीबांधवांना येथे आणले. त्यांना स्वत: केस कापणे, दाढी करून देणे, अंघोळ घालून देत असत. ते त्यांना नवीन कपडे घालून देत असत. तेव्हा त्यांच्याजवळ कोणीही यायला तयार नव्हते. लोकांमध्ये आता सुद्धा काही प्रमाणात गैरसमज आहे. अशातच चंद्रपूर नाभिक समाजातील युवकांनी तेथे जाऊन 300 कुष्ठरोगीबांधवांची कटिंग-दाढी करून दिली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर, सलून असोसिएशन चंद्रपूरतर्फे आनंदवन येथे मोफत कटिंग- दाढीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्‌घाटन साधनाताई आमटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री. प्रभू होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे श्‍याम राजूरकर, मनोज पिंजदुरकर, अशोक गोलगुंडेवार, विलास बडवाईक, दत्तू कडूकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात नगाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश एकवनकर यांनी केले. मान्यवरांच्या मनोगतानंतर रुग्णांच्या कटिंग-दाढी कार्यक्रमाला सुरवात झाली. यात मूकबधीर विद्यालय, अंध विद्यालय, अपंग विद्यालय, संधी शाळा, दवाखाने आदी ठिकाणी विद्यार्थी व रुग्णबांधवांची जवळपास 300 लोकांची कटिंग- दाढी करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अरविंद नक्षिणे, राजू कडवे, राजू कोंडस्कर, रोशन चातके, पांडुरंग, चौधरी, विठ्ठल चौधरी, रवि वानकर, नीलेश चल्लीवार, विजय कोंडस्कर, नानाजी कडूकर, रत्नाकर वानकर, पुरुषोत्तम घुमे, दीपक, चिंतामणी मांडवकर, संतोष अतकरे, मालचंद्र शेंडे, सुनील नक्षणे, दीपक नक्षणे, प्रकाश चांदेकर, सुभाष निंबाळकर यांनी सहकार्य केले.


60 वर्षांत आनंदवनात कटिंग-दाढीचा कार्यक्रम कधीही झाला नाही. चंद्रपूरच्या नाभिक समाजातील युवकांनी येथे येऊन रुग्णबांधवांची कटिंग- दाढीचा कार्यक्रम राबवून खूप मोठे धाडस केले आहे.


- साधनाबाई आमटे, ज्येष्ठ समाजसेविका

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.